सर्व कठीण प्रश्नांची उत्तरे देणारे ‘लाइट’!

1

मोठे मोठे दावे तर खूप ऐकायला मिळतात, पण जेंव्हा मी ‘लाइट’ ऍपचा वापर केला तेंव्हा मला त्यात तथ्य दिसून आले. भारतीय तज्ञ ज्यांना ‘बे एरिया’ मध्ये काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी विकसित केलेला ‘लाइट’ नावाचा ऍप नवा विक्रम रचताना दिसतो आहे. हा ऍप रिलायंस इंडस्ट्रीज आणि मायक्रोसॉफ्ट वेंचर्सव्दारे संचालित जेन नेक्स्ट इनोवेशन हब मध्ये तयार करण्यात आला आहे. या ऍपच्या अनावरणानंतर आम्हाला संजीव नायर ( तंत्रज्ञ आणि डिझाइनच्या क्षेत्रात दोन दशकांचे अनुभवी) यांचा मेल आला, त्यांच्याकडे आम्हाला दाखवण्यासाठी काहीतरी रोचक होते.

कोर टिमचा भाग, संजीव देखील ‘लाइट’ ऍपच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. आणि या ऍपची ‘टॅगलाइन’ ‘गोइंग बियॉन्ड सर्च’ नुसार आपल्या लक्षात येते की, शोधापलिकडे जाऊन माहिती मिळवणे हेच यातील मुख्य लक्ष्य आहे. लाइट एनएलपी(प्राकृतिक भाषा संसाधन), मशीन लर्निंग आणि मँन-मशिन हायब्रिड तंत्रावर तयार करण्यात आलेले एक आंन्सरिंग इंजन आहे. आपल्या मनात अनेक प्रश्न आहेत की हे काय आहे? आपण ‘लाइट’ला एखादा प्रश्न विचारा आणि तो काहीवेळातच तुम्हाला असे उत्तर देईल जसे की तुम्ही त्याच्यासोबत गप्पा मारत आहात. ‘लाइट’ तुम्हाला सरळ आणि स्पष्ट उत्तरे देईल. होय, (गूगल सहित) याच पध्दतीने अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत आणि जागतिक पातळीवर कॉर्पोरेटस् समर्पित संघांनी यात प्रभावीपणाने प्रगती केली आहे. पण ‘लाइट’ने यापेक्षा काहीतरी वेगळे करून दाखवले आहे.


मी ‘लाइट’चा उपयोग केला आणि त्याचा अनुभव परिणामकारक होता. मी अनेक प्रश्न केले ज्यात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेसिंगचा समावेश असेल, जसे ‘सध्याच तापमान काय आहे?’ ‘झाडाची मुळे किती मजबूत असतात?’ असे काही प्रश्न, सारी उत्तरे समाधानकारक होती.

हे कार्य कसे करते?

संजीव सांगतात की, “ आपण कोणत्याही प्रकारचे कितीही शब्द किंवा प्रश्न ‘लाइट’ ला विचारू शकता. तो या सा-या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मानवी संगणकीय संपर्क म्हणजेच ह्यूमन कंप्युटर इंटरेक्शन’ चा वापर करतो. ही पध्दत खूप मोठा डेटा (बिग डेटा)वर प्रक्रिया करून केली जाते, जोडली जाते (रिलेशन डेटा), त्यातून शिकले जाते(आर्टिफिशीयल इंटेलिजंस /मशिन लर्निंग) आणि मग पुन्हा माणसांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात.”

अनिमेष सेम्युअल आणि संजीव मेनन प्रकाश व्यवस्थेमागील प्रमुख व्यक्ती आहेत. अनिमेष जे सीईओ आहेत; त्यांना भारत आणि मध्यपूर्वेत सल्लागार आणि विपणनाचा अनुभव आहे. संजीव मेनन फ्लोरिडा विद्यापीठातून एमएस पूर्ण केल्यावर काही दिवस टेलिकॉम क्षेत्रात होते, मग ‘नेट यंत्रा इंक’ आणि २००१मध्ये त्यांनी व्हिओआयपी उत्पादनाची कंपनी स्थापन केली.

त्रिकूट (संजीव नायर, अनिमेष सेम्युअल, संजीव मेनन) अभियांत्रिकीच्या काळात मित्र होते, त्यानंतर पंधरा वर्षांनी भेटले. खूप विचार आणि महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवत सुरू केलेल्या कार्यातून’लाइट’ ऍपच्या रुपात समोर आले. त्याला बाजारात तीन वर्ष झाली. हे यंत्र मँन मशिन हायब्रिड तंत्रावर काम करते. ही अशी प्रक्रिया आहे, ज्यात ‘लाइट’ तो डेटा सांभाळतो जो यंत्राला समजू शकत नाही. जसे की एक मनोविज्ञानावर आधारीत प्रश्न असेल, ज्याचे योग्य उत्तर असेल किंवा एखादा असा प्रश्न ज्याचे उत्तर विचार करून दिले पाहिजे. हे एलपी तंत्रज्ञान सर्वच माणसांचा अभ्यास करून भविष्यात येणा-या प्रश्नांचे स्वत: विचार करून स्वत:च उत्तरे देण्याची सुविधा देतो. संजीव यांनी सांगितले की, “आम्ही आमच्या वापरकर्त्यांना विशेषज्ञ बनण्याची सुविधा देखील प्रदान करतो. वापरकर्ता तज्ञांप्रमाणे साइनअप करून संबंधित प्रश्नांना उत्तरे देऊ शकतो. त्याच्या उत्तरांना सिस्टम आणि आपसात तपासून बदलता देखील येऊ शकते”

‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या पध्दतीने तयार केलेल्या ‘लाइट’ ऍपचा दृष्टीकोन स्वच्छ आहे. संजीव यांनी एका ब्लॉगपोस्ट मध्ये हे अधोरेखीत केले आहे की, सध्याच्या युगात एक टक्का लोक ऑनलाइन माहितीच्या शोधात ४७५२० तास (२.२वर्ष) घालवतात. हा वेळ न्हाणीघरात घालवलेल्या वेळेपेक्षा (१.५वर्ष म्हणजेच१३१४८.७ तास)किंवा हसण्याचा वेळ (११५ दिवसांचा म्हणजे२७६०तास) यापेक्षा जास्त आहे. या आकड्यावरून स्पष्ट आहे की, आम्हाला ‘लाइट’ ऍपची किती गरज आहे.

या ऍपला बनविण्याची पहिली पध्दत एसएमएस व्दारे प्रश्न-उत्तरे अशी होती. वापरकर्ता प्रश्न एसएमएसने विचारत आणि ‘लाइट’ त्याचे उत्तर देखील संदेश देवून देत असे. या विचाराने त्याचे विपणन करण्यात आले हळुहळू ऍप दररोज सुमारे शंभर प्रश्नांची उत्तरे देऊ लागला.

आत्मविश्वास वाढत गेल्यावर आणि इंटरनेट तसेच स्मार्टफोनच्या प्रवेशानंतर इंटरनेटवर वापरण्यायोग्य ऍपचे रूप देण्यास सुरूवात झाली. विकसन आणि आरेखन यात एक वर्ष लागले, आणि आज मुंबईस्थित पंधरा कर्मचारी असलेल्या कंपनीने ऍपला इंटरनेट-स्मार्टफोनवर उपलब्ध करून दिले आहे. सर्वच कर्मचा-यांचा अनुभव ‘लाईट’ साठी नवी दालने उघडणारा आहे, त्याची वाढ पाहता असे वाटते की, लवकरच कंपनी नफा मिळवेल. १५मार्च रोजी या कंपनीच्या ऍपची सुरूवात झाली तेंव्हापासून आतापर्यंतची कहाणी आधुनिक आणि प्रभावी राहिली आहे. “ आम्ही लवकरच अधिक वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो आहोत.” संजीव म्हणाले. तसे तर आताच ऍपच्या यशाचे गुणगान करणे घाईचे होईल, मात्र ज्या प्रकारचा डेटा यातून मिळतो आहे, याचे यश फार दूर नाही.

मी स्वत: या ऍपचा वापर माझ्या मोबाईलवर करत आहे. खरेतर साधारण सर्च मला आजही वेगऴा करावा लागतो जसे गाणी, खेळ,किंवा सिनेमा. मात्र मी ‘लाइट’ला देखील खूप प्रश्न विचारते आणि माझा आजवरचा अनुभव खूपच चांगला आहे.

लेखक : जुबीन मेहता

अनुवाद : किशोर आपटे