रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर राजन यांचे शिक्षक गेल्या ३२ वर्षांपासून आदिवासींना देत आहे ज्ञानाचे धडे

0


आलोक सागर, यांनी आयआयटी दिल्ली इथून इंजिनियरिंग केल्यानंतर अमेरिकेच्या नामांकित ह्यूसटन यूनिवर्सिटी मधून पीएचडी पूर्ण केले. गेल्या ३२ वर्षांपासून मध्‍यप्रदेशातील एका छोट्या गावात आदिवासी मुलांना ते शिक्षण देत आहे. त्यांच्या बद्दल एवढेच जाणून घेणे पुरेसे नाही, कारण त्यांनी स्वतः बद्दल कधीच कोणाला सांगितलेले नाही. त्यांचे नाव सध्या चर्चेत यायचे कारण म्हणजे बैतुल जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या निवडणुकीत तेथील स्थानिक अधिकाऱ्यांना त्यांचे वागणे संशयास्पद वाटले. त्यांना तेथून सोडून जायला देखील सांगितले तेव्हा आलोक सागर यांनी त्यांनी घेतलेल्या शिक्षणाची मोठी यादीच अधिकाऱ्यांना सांगितली. त्यांनी सांगितलेल्या शिक्षणाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली तेव्हा ते सारे खरे असल्याचे सिद्ध झाले. एवढे शिक्षण घेऊनही अगदी साधे राहणीमान जगणाऱ्या आलोक सागर यांच्याबद्दल जाणून घेऊन तेथील अधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेतले. आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन.

मुळचे दिल्लीत राहणारे आलोक सागर गेल्या ३२ वर्षांपासून बैतुल जिल्ह्यात आदिवासींच्या कल्याणासाठी संघर्ष करत आहे. ते भौरा तहसीलच्या एका छोट्याश्या गावात झोपडीत राहून आदिवासी मुलांना शिक्षण देत आहे तसेच जंगलं हिरवीगार रहावीत  हे ध्येय उराशी बाळगून त्यांचे अविरतपणे कार्य सुरु आहे. त्यांनी आतापर्यंत ५०,०००हून अधिक झाडं लावली आहेत.आपल्या शिक्षणाचा उपयोग इतरांप्रमाणे केवळ पैसे कमवण्यासाठी व्हावा असे त्यांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. त्यांचे जीवन इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेले आहे. त्यांच्याकडे अंगात घालण्यासाठी फक्त तीन कुर्ते आहे, एक सायकल आहे. त्यांना अनेक भाषा बोलता येतात. त्यांच्या या शिक्षणाचा उपयोग ते आदिवासींच्या उन्नतीसाठी करत आहे.

एका वृत्तपत्राशी बोलतांना त्यांनी सांगितले की, “देशाच्या प्रगतीसाठी लोकांनी तळागाळात जाऊन काम करणे गरजेचे आहे. भारतात आज एकीकडे लोकांना वीज, पाणी यासारख्या मुलभूत सोयी मिळण्यासाठी झगडावे लागत आहे, दोन वेळ अन्नासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे तर दुसरीकडे लोक मोठाल्या पदवी घेऊन आपली बुद्धिमत्ता सिद्ध करण्यात व्यस्त आहेत.

सौजन्य : थिंक चेंज इंडिया