आत्मा: भारतातल्या शिक्षण क्षेत्राला सामर्थ्यवान बनवणारी चळवळ

ह्रदयात करूणा आणि डोळ्यांमध्ये उद्याची स्वप्नं बाळगून दुसऱ्यांसाठी काही करावं या प्रेरणेनं भारतात आलेल्या दोन परदेशी तरूणींची ही कथा. खरं तर भारतातल्या मागासलेल्या शिक्षणव्यवस्थेचे रूप पाहून व्यथित झालेल्या या दोन तरूणींनी त्याला सुंदर रूप देण्यासाठी केलेली ही धडपड आहे. सर्व प्रगतीचे मार्ग हे शिक्षण क्षेत्रातच लपलेले आहेत, आणि ते मोकळे करून उदयाच्या पिढीचं उज्ज्वल भविष्य घडवावं यासाठी या दोन तरूणींनी आपल्या सहका-यांच्या मदतीनं दिलेलं योगदान प्रशंसनीय असच आहे. त्या दोन तरूणी म्हणजे ऑस्ट्रेलियाची हेली (ली) बोल्डिंग आणि नेदरलँडची अँड्रिनी व्हॅन डॉक. आणि त्यांनी स्थापन केलेली संस्था म्हणजेच ‘आत्मा’...

आत्मा: भारतातल्या शिक्षण क्षेत्राला सामर्थ्यवान बनवणारी चळवळ

Friday August 28, 2015,

5 min Read

भारतातल्या शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून स्वयंसेवी संस्था स्वस्त आणि उच्च गुणवत्ता असलेले उपाय करण्याचा प्रयत्न करत आहेत. या स्वयंसेवी संस्था शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यात अत्यंत कुशल आहेत मात्र, दुसरीकडं संस्थात्मक व्यवस्थापकीय सहकार्य नसल्यानं त्यांना म्हणावं तितकं प्रभावी काम करता येत नाही. काही स्वयंसेवी संस्थांना दीर्घकालीन धोरणात्मक योजनांची गरज आहे, तर काहींना नव्या मानवी संसाधन प्रक्रियांची गरज आहे. या सोबतच त्यांना या क्षेत्रात इतर संस्थांच्या सहकार्यानं एकत्रितपणे काम करण्याचीही गरज आहे.

आत्माच्या संस्थापिका  हेली बोल्डिंग आणि संचालिका मेरी एलन मॅटसुई

आत्माच्या संस्थापिका हेली बोल्डिंग आणि संचालिका मेरी एलन मॅटसुई


आत्मा, मुंबईत काम करणारी एक स्वयंसेवी संस्था. आत्मा ही एक अशी संस्था आहे जी, स्वयंसेवी संस्थांची क्षमता वाढवते आणि शैक्षणिक संस्थेसाठी स्वयंसेवक असलेला कर्मचारी वर्ग पुरवून ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करते. याबरोबर, भारतातल्या शिक्षण क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थांमध्ये सहकार्य वाढवून त्यांना एकत्रितपणे काम करता यावं म्हणून अनुकूल असं वातावरण तयार करते. हेली (ली) बोल्डिंग आणि अँड्रिनी व्हॅन डॉक – ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँडच्या दोन तरूणी. AISEC च्या इंटर्न म्हणून काम करण्यासाठी या दोघी पहिल्यांदाच भारतात आल्या होत्या. आणि याच दोन तरूणींनी २००७ साली ‘आत्मा’ या संस्थेची स्थापना केली.

स्वयंसेवी संस्थांना व्यावसायिक मदतीची मोठी गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी भारतातल्या सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं या उद्देशानं ही संस्था स्थापन केली. मुंबईतल्या एका शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या स्वयंसेवी संस्थेत स्वयंसेविका म्हणून काम करणा-या कार्यकारी संचालिका मेरी एलन मॅट्सुई या २००८ मध्ये आत्मा या संस्थेत रुजू झाल्या. मोठी क्षमता असलेल्या आणि बदलासाठी खुल्या असणा-या, तसेच उच्च दर्जाची सेवा देणा-या भागीदार सहकारी संस्थांसोबत आत्मा ही संस्था काम करते. संस्था, त्यांचा इतिहास, यश, आव्हानं, आणि टीम मेंबर्स या अंगानं अभ्यास करून मग त्या आधारे आपल्याला हव्या असलेल्या भागीदार संस्थांचा शोध घेणं हे आत्माचं ध्येय आहे. यशस्वी भागीदारीसाठी संस्था आणि आत्माच्या कर्मचा-यांची केमिस्ट्री जुळणं अत्यंत गरजेचं आहे. मुट्सुई म्हणतात, “ फिट इज रिअली क्रिटिकल .”

भागीदार संस्था शिक्षण क्षेत्रात काम करत असताना आपण एखाद्या शाळेसाठी सेवा देतो आहोत की शिक्षण क्षेत्रात अतिरिक्त सेवा पुरवण्याबाबतचं काम करत आहोत याचा त्यांना काही फरक पडत नाही. मीमांसा, मुस्कान फाऊंडेशन, न्यू रिझोल्युशन इंडिया, अपने आप विमेन्स कलेक्टिव्ह ( AAWC), अवंती फेलोज, मासूम आणि फाऊंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ (FMCH) या संस्था आत्माच्या सध्याच्या भागीदार संस्था आहेत. आपल्या भागीदार संस्थांची निवड केल्यानंतर, संस्थेत काय सुधारणा करणं गरजेचं आहे याबाबत आत्मा शोध घेते आणि मग त्यानंतर सहमतीनं ठरवलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी भागीदार संस्थेला आपल्या स्वयंसेवकांसोबत जोडते. मॅटसुई म्हणतात, “आम्ही त्यांच्या रूचीवर विचार करत आहोत, आणि त्यांना नेमकं काय साधायचं आहे ते समजून घेत आहोत. आम्ही त्यांना मदत करतो आणि त्यांनी तयार केलेल्या कार्यक्रमावर आम्ही त्यांना काम करण्याची मोकळीकही देतो.”

इतर स्वयंसेवी संस्थासोबत आपली भागीदारी सुरू झाल्याबरोबर आपल्या प्रयत्नांना नेमकं काय फळ आलं हे पाहण्यासाठी आत्मा ही संस्था, संस्थात्मक आणि कार्यपद्धतीच्या पातळीवर भागीदारीनंतर नेमके काय बदल घडले याची तपासणी करते. सल्लामसलतीच्या प्रक्रियेतून त्यांच्या भागीदारांचं मूल्यमापनही ही संस्था करते. 

डोळ्यातली स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारे  स्वप्नदूत

डोळ्यातली स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणारे स्वप्नदूत


मॅटसुई म्हणतात की, आत्मा आपल्या प्रत्येक भागीदाराला दरवर्षी १२०० तास देते. सन २०११ - २०१२ मध्ये, आत्मानं आपल्या भागीदारांना ७९२९ तास सेवा दिली. आपल्या स्वयंसेवकांच्या हाय-टच मॉडेलच्या वेगळेपणामुळं समान क्षमता असलेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये आत्माचं मॉडेल अद्वितीय ठरलं. यामुळं संस्थेचा स्वयंसेवक कार्यक्रम त्यांच्या शैक्षणिक कार्याच्या मोहिमेत लक्षवेधी ठरला. आत्माचे स्वयंसेवक हे पूर्णवेळ, बिन पगारी प्रोफेशनल्स आणि बहुतेक कॉर्पोरेट सेक्टरमधून विकासाच्या कार्यासाठी आलेल्या व्यक्ती आहेत.

दीर्घकालीन प्रकल्पांवर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एका एका व्यवसायी तज्ञांची अभ्यासपूर्ण मदत आणि सहकार्य मिळावं यासाठी आत्मा प्रयत्नशील असते. आत्माचे स्वयंसेवक आपल्या कामाचा अनुभव घेतल्यानंतर विशेषत: भारतात किंवा आपापल्या कार्यक्षेत्रात राहतात. आत्माच्या भागीदार संस्थांनी १० स्वयंसेवकांची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे. एका स्वयंसेवकानं आपली स्वत:ची संस्था सुरू केली, तर चार स्वयंसेवकांनी आत्माचे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून काम सुरू केले. आत्मानं २९ देशांमधले तब्बल १२० स्वयंसेवकांना नियुक्त केलं आहे, तर संस्थेकडं १० कामयस्वरूपी स्वयंसेवी कर्मचारी आहेत. आपल्या भागीदारांसोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, तसेच शिक्षण क्षेत्रातल्या समस्या आणि त्या सोडवण्याच्या उपायांवर त्यांच्यात योग्य संवाद व्हावा यासाठी आत्मानं आपले भागीदार आणि इतर संस्थांना शिक्षण क्षेत्रावर परिणाम करणारे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशानं संघटितपणे काम करण्यासाठी या क्षेत्रात एकत्र आणलं.

त्यांनी अलिकडेच शिक्षणात मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर करणा-या संस्थांच्या पॅनलना महत्त्वाचं स्थान देत आपल्या भागीदारांसाठी मोबाईल टेक्नॉलॉजी चर्चासत्र आणि कार्यशाळेचं आयोजन केलं. या चर्चासत्रामुळं आत्माच्या भागीदार संस्था आणि इतर संस्थांना एकत्रही आणता येईल आणि अधिकाधिक संस्थांना समाज कार्याची प्रेरणाही मिळेल असं आत्माला वाटतं. मॅटसुई म्हणतात, “ शिक्षण क्षेत्रात काम करणा-या संस्था आणि व्यक्तींमध्ये नेटवर्क तयार करणं आणि अर्थपूर्ण संवाद घडवून आणणं याहीपेक्षा अधिक मोठं आणि व्यापक कार्य व्हावं असं मला वाटतं. खरोखरच लोक आपल्या विचारांचं, कल्पनांचं आदानप्रदान करत आहेत, शिकत आहेत, विकास करुन घेत आहेत आणि नाविण्यपूर्ण गोष्टी राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. याबरोबर इतरांनीही या गोष्टींचं अनुकरण करावं यासाठीही प्रयत्न करत आहेत.”

जागतिक स्तरावर स्वयंसेवी संस्थांची आणि सामाजिक उपक्रमांची क्षमता वाढून त्या अधिक मजबूत व्हाव्यात यासाठी आपली सेवा देणं ही आता दिवसेंदिवस लोकप्रिय झालेली गोष्ट आहे. पण आत्मा विशेषत: शिक्षण क्षेत्रात योगदान देणारी संस्था आहे आणि शिक्षण क्षेत्राशी आपली बांधलकी पूर्णपणे पाळण्यासाठी वचनबद्ध आहे. यासंदर्भात मॅटसुई म्हणतात,“ आत्मा शिक्षण क्षेत्राबाहेर काम करणा-या इतरही सामाजिक संस्थांना आपली सेवा देत असली तरीही संस्थेची शिक्षण क्षेत्रात काम करणं हीच विशेषतः आहे. आम्ही आमचं लक्ष शिक्षणावर केंद्रीत केलंय आणि भारतात उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून चऴवळ उभी रहावी यासाठी अधिकाधिक भागीदार संस्थांना एकत्र आणत आहोत.” आत्मा या स्वयंसेवी संस्थेबाबत अधिक माहितीसाठी आणि त्यांची सहकारी भागीदार संस्था किंवा स्वयंसेवक बनण्यासाठी नक्की YourStory.in pages. ला भेट द्या.