हुंड्याच्या मागणी पासून वाईट चालीरितीपर्यंत, बिहार मधील महिलांनी विवाहाला दिला नकार!

हुंड्याच्या मागणी पासून वाईट चालीरितीपर्यंत, बिहार मधील महिलांनी विवाहाला दिला नकार!

Sunday May 07, 2017,

2 min Read

आमच्या समाजात आम्ही महिलांना काय शिकवतो? की त्या पुरूषांच्या अर्धागिनी आहेत, आणि त्यांनी राहावे. त्यांच्या विरोधात त्यांनी जावू नये, आणि त्यांनी सहनशिलतेने काही गोष्टीशी तडजोड करावी. हे अधिक प्रकर्षाने तुम्ही अधोरेखीत करू शकाल जेंव्हा असा कुणी माणूस तुमचा नवरा किंवा प्रियकर असेल. पण बिहार मधील महिलांनी आता हे बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

कायद्यात याबाबत तरतूद असूनही, वधूच्या वडिलांकडून हुंडा मागितला जातो, त्यांनंतर लग्नाला होकार दिला जातो. बिहार मधील महिला आता हुंडा घेणा-यांशी लग्नच करणार नाहीत. कुसूम कुमारी ज्या पश्चिम चंपारण्य जिल्ह्यात राहतात, त्यांचा विवाह यूपीच्या अजयकुमार यांच्याशी निश्चित झाला. याबाबतच्या वृत्तानुसार, लग्न ठरल्या पासून अजयच्या वडिलांनी वधूच्या वडीलांना बिरान चौधरी यांना पाच हजार रूपयांची मागणी सुरू केली. तरी चौधरी यांनी आधीच वीस हजार रूपये दिले होते. आणि उर्वरित पैसे लग्नाच्या दिवशी देण्याचे मान्य केले होते.

नव-याकडची मंडळी लग्नाला तयार होत नव्हती, त्यांना तातडीने पैसे हवे होते. हे सारे पाहून कुसूम यांनी सांगितले की त्यांना अश्या माणसाशी लग्नच करायचे नाही. मात्र त्या नंतर अजय यांच्या कुटूंबियानी माघार घेत पैसे मागणार नसल्याचे वचन दिले तरी त्या त्यांच्या निर्णयावर कायम राहिल्या. जे पालकांना पैश्यासाठी त्रास देतात त्यांच्याशी लग्नच नको असा त्यांचा पवित्रा होता.


Image: Ayoti

Image: Ayoti


अशाच प्रकारची घटना बाघा येथेही घडली. एका वधूने तिच्या माहेरच्या लोकांबद्दल अपशब्द उच्चारलेले ऐकले. त्याला वधूच्या कुटूंबियानी हरकत घेतल्यावर त्यांना डांबून ठेवण्यात आले, त्यांनतर पोलिस आले आणि त्यांनी हा प्रश्न सोडविला. त्यांनी विवाह पुढे ढकलला आणि दोन्ही कुटूंबाना चर्चा करण्यासाठी बोलावले. पण वधूने सांगितले की तिला अशा वाईट चालीच्या नव-यांसोबत लग्नच करायचे नाही. या दोन घटनातून हेच दिसून आले की, महिला शहाण्या होत आहेत, आणि त्यांच्या भविष्याचा त्या निर्णय घेताना विचार करू लागल्या आहेत. स्वत:चे हित अहित त्यांना समजू लागले आहे. 

(थिंक चेंज इंडिया )