होंडासिटी विकून सायकल घेणारी "गौरी जयराम" : एक साहसी व्यक्तिमत्व

0

ही गोष्ट आहे गौरी जयरामची, जिला कुठे जायचं यापेक्षा नवीन काहीतरी शोधून प्रवासाची मजा घेणं जास्त आवडतं. प्रवासाची मनापासून आवड आणि धोका पत्करण्याची तयारी असल्याने गौरी एका नावेतून दुसऱ्या नावेत स्वार होतांना क्षणभराचाही विचार न करता निर्णय घेते आणि म्हणूनच ती म्हणते, "हे सगळं मला कुठेतरी घेऊन जाईन किंवा मग हे सगळं मी कुठेतरी नेऊन ठेवेन." गौरीने जागतिक अॅडवेंचर (adventure) कंपनीची स्थापना केली, जी लोकांना अॅडवेंचर हॉलीडे संदर्भात मार्गदर्शन करते. जागतिक प्रवासाचा भरपूर अनुभव असल्याने तिने जग बघण्याची इच्छा असणाऱ्या भारतीय पर्यटकांवर लक्ष्य केंद्रित केलं. जे तिच्यासारखे ट्रेकिंग, सायकलिंग आणि मॅरेथाॅनसाठी जागतिक टूरच्या शोधात असतात, त्यांचा शोध तिने घेतला. तिने ह्या धाडसी प्रकल्पाची सुरुवात २०१३ मध्ये केली.

उद्योजिकेचं जीवन

गौरी म्हणते, "स्वतः चालू केलेली एखादी गोष्ट चालवणं म्हणजे रोलरकोस्टर राइड प्रमाणे अर्थात अनपेक्षित बदलांना सामोरे जाण्यासारखे आहे. दिवसाचे २४ तासही कामासाठी अपुरे पडतात, शिवाय आर्थिक ताळमेळ साधनं कठीण असतं. तिला वाटतं एखादी नवीन गोष्ट सुरु करतांना भारतातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे गुणवत्ता असणारे कर्मचारी मिळवणं. ती म्हणते, "आम्हाला भरपूर लोक मिळतात पण अपेक्षित गुणवत्ता आणि कौशल्य असणारे खूप कमी असतात. दुसरी आणखी एक अडचण म्हणजे लोकांना साहसी यात्रेबाबत माहितच नसते. लोक आमच्याकडे डिस्नेलॅण्डला साहसी सहल किंवा मग काही क्षणांसाठी साहसी सहल आहे का ? असं विचारतात, असं काही विचारलं की डोकं भिंतीवर आपटून घ्यावसं वाटतं" .

जीवन एक प्रवास

भारतीय वायूदलातील पायलटची मुलगी असल्याने गौरीने सतत भटकंती केलीये. फौजी वडिलांच्या कृपेने ती पाच दिवसांची असतांनाच तिला पहिला प्रवास घडला. वयाची ११ वर्ष तिने मुंबईत पदवी शिक्षण घेण्यासाठी आणि २० व्या वर्षी पहिली नोकरी मिळेपर्यंत घालवली. एअर मॉरिशस साठी रिजनल मॅनेजर म्हणून काम करत असतांना तिचं लग्नं झालं आणि ती चेन्नईला स्थायिक झाली. आई झाल्यावर तिने नोकरी सोडून उद्योग जगतात उडी घेतली. तिने शुन्य गुंतवणूक करून २००१ साली कामाला सुरुवात केली. तिची सुरुवातच तिने साठवून ठेवलेल्या सुट्ट्यांपासून केली. जरी सुरुवातीला सगळं सुरळीत चाललं होतं तरी गौरीला वाटत होतं की ब्रान्डला ओळख नाहीये आणि म्हणून मर्यादा येतायेत. नेमकी तेव्हाच म्हणजे २००५ मध्ये एका मोठ्या जागतिक प्रशिक्षण कंपनीकडून तिला दक्षिण आशियातील सगळ्यात उच्च ठिकाणाची माहिती करून देण्यासाठीची संधी चालून आली. अगदी मोहून टाकणारी अशी ती संधी होती जी साहजिकच तिने स्वीकारली आणि मग सलग साडेआठ वर्ष काम केलं. ह्या प्रदीर्घ कालावधीनंतर तिने पुन्हा दुसऱ्यांदा स्वतःचं काम सुरु करून जोखीम पत्करायचं ठरवलं.


स्वतःचा शोध

"माझ्या चाळीसाव्या वाढदिवशी एक प्रकारचा अध्यात्मिक शोध घेत मी माझ्या गरजा कमी करून जीवनानुभव घेण्याचं ठरवलं. "मी माझी होंडासिटी विकली आणि सायकल घेतली", गौरी सांगते. तिला कळत नव्हतं की ती नोकरीला कंटाळली की आयुष्याला, तिला सगळं काही मिळवून आता काहीच राहिलं नसल्याची जाणीव होत होती. मग उत्साही राहण्यासाठी तिने कामाच्या चौकटीपलीकडे जाऊन घराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तिने मग धावायला, लिहायला सुरुवात करून पुस्तक देखील प्रकाशित केलं आणि मग मॅरेथाॅन स्पर्धा परिसरात सहली आयोजित करायला सुरुवात केली. त्याच वर्षी ती जोर्डनला मृतसमुद्रात(सर्वात जवळचा पृथ्वीचा भाग ) धावायला गेली तिथून परतल्यावर ती एव्हरेस्ट बेस कॅम्पसाठी नेपाळला गेली .

एव्हरेस्ट बेस कॅम्पमधे ती फक्त एक बॅग घेऊन गेली, तेव्हा तिला आयुष्यात जमवलेल्या अनावश्यक गोष्टीची जाणीव झाली आणि मग गौरी घरी परतली ते पूर्णपणे नवीन व्यक्ती होवूनच. तिच्यात बरेच बदल झाले होते. गरज नसलेल्या वस्तू वगळायला तिने सुरवात केली, त्यातच तिने तिची फॅन्सी कार विकली, नोकरी सोडली आणि पुन्हा साहसी सहलीची सुरुवात केली. तिला जीवघेणा अनुभवपण आला. १९९९ मध्ये राफ्टवरून पडून बुडता बुडता ती वाचाली . ती म्हणते, " त्या अनुभवामुळे माझ्याजवळ असलेल्या आणि राहिलेल्या गोष्टी अशी मी एक यादी बनवली".

पुरुषही बरयाच गोष्टींपासून वंचित असतात.

गौरी म्हणते "ज्या स्त्रिया योग्य जोडीदार आणि योग्य प्रोफेशन निवडतात त्यांना सगळं काही मिळतं. सफरीवर असताना सगळ्या स्त्रिया तिला नेहमी विचारतात की, मुलींची काळजी कोण घेतं ? तेव्हा तीचं साधं उत्तर असतं, "माझा जोडीदार, तो समजतो की आमच्या मुली ही त्यांची पण तेवढीच जबाबदारी आहे जेवढी की माझी. मी मान्य करते की बऱ्याच गोष्टी मी कामामुळे गमावते पण सगळेच माणसं जे हे काम करतात त्यांना देखील गमवाव्या लागतातच ना. मला नाही वाटत त्या माणसांकडेही सगळं असतंच म्हणून".

घरापासून दूर राहावं लागतं म्हणून खूप चुकल्यासारखं वाटतं असं न म्हणता ती म्हणते, "तो माझाच निर्णय आहे जो मला आनंदी ठेवतो. मला पैसा कमवायचा आहे म्हणून मी कामावर जाते असं मी मुलींना कधीच सांगत नाही तर माझ्या कामातून मला आनंद मिळतो असं मी त्यांना सांगते आणि मग मी त्यांची चांगली आई होते. त्यांना ते नक्की कळेल जेव्हा त्या स्वतःच्या आवडीचं काम करायला लागतील".

कमी सामानासह प्रवास करायला शिका

गौरीला वाटतं बऱ्याच स्त्रियांना कमी सामानासह प्रवास करायला शिकण्याने फायदा होईल. कमी सामानामुळे एक प्रकारची तणावमुक्ती, स्वतंत्रता, स्वावलंबी आणि हलकं असल्याची भावना मनी जागृत राहते म्हणून तुमची प्रवासी कागदपत्रं, चार्जर आणि मल्टीपिन हे सगळं पर्समध्येच ठेवणं नेहमी उत्तम.

गौरी उद्योजिका होऊन खूप आनंदी आहे कारण तिला मजा येते तिच्या आवडीचं काम करून आणि ते म्हणजे -- साहस .  

"नवनवीन संधी हुडकायला मला मनापासून आवडतात, त्यातूनच माझ्या उद्योगाला एक नवी दिशा, चालना मिळते. महिनाअखेरीस माझ्या टीमला पेमेंट देताना मला माझ्या जीवनाची सार्थकता झाल्याचे समाधान मिळते. मात्र माझ्या आनंदाची अतिउच्च पातळी म्हणजे सफारीला जाणे. प्रत्येक दिवस नवा आहे आणि रोजची सकाळ संधी घेऊन येते ती शिकण्याची, मोठ्ठ होण्याची आणि जोखीम स्वीकारण्याची. परिस्थिती जेव्हा कठीण असते तेव्हा मी फक्त दूरवर जाऊन भटकंती करते आणि मग सगळी जळमटं दूर होतात एकदम." गौरी सांगते.

वेबसाईट : http://www.activeholidaycompany.com

लेखिका : तन्वी दुबे

अनुवाद : शिल्पा खरे