एग्रोस्पा.... शेतातील पिकांसाठी पाण्याची बँक

एग्रोस्पा.... शेतातील पिकांसाठी पाण्याची बँक

Wednesday December 16, 2015,

3 min Read

गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळाचं सावट आहे. पावसानं महाराष्ट्रातच नव्हे तर अर्ध्याअधिक देशात पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. दोन-एक वर्षांतून एकदा अवर्षण ही खूप मोठी समस्या म्हणून पुढे येत आहे. याचा सर्वाधिक परिणाम भोगावा लागतोय तो शेतकऱ्यांना. भेगा पडलेल्या जमिनी सर्वत्र दिसतायत. पाणी नसल्यानं अशा जमिनींवर शेती तर सोडून द्या पण साधं गवतही उगवत नाही. अवर्षणाची परिस्थिती वारंवार येत असल्यानं आता पुढच्या काळात शेतीसाठी पाणी ही मोठी समस्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उद्भवणार आहे. यामुळे जो काही थोडा फार पाऊस पडतोय ते पाणी शेती करण्यासाठी सचोटीनं वापरण्याशिवाय गत्यंतर नाही.

image


इस्त्राईलसारख्या देशात शेती संदर्भातल्या संशोधनावर मोठा भर दिला जातोय. यातूनच जमिनीतली ओल कायम ठेवण्यासंदर्भात अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संशोधनानंतर उपाय सापडला. पावसाच्या लहरीपणाचा विचार करता कमी पावसात उपलब्ध झालेलं पाणी शेतीत साठवता येईल का यासाठी हे संशोधन सुरु झालं होतं. काही अरासायनिक घटकांचा वापर करुन कोरडवाहू शेती वापरता येण्यासाठी सॉईल एडिटिव्हजचा उपाय तिथल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढला. सॉईल एडिटिव्हजमुळे जमिनीतला ओलावा दीर्घकाळ टिकतो. यामुळे अत्यल्प पावसातही काही पिकं हमखास घेता येतात. अकोल्याच्या चंदनगिरी हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सॉईल एडिटिव्हजचं एग्रोस्पा या नावानं महाराष्ट्रात वितरण करतेय.

image


चंदनगिरी हर्बल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ते व्यवस्थापकीय संचालक संजय चंदनगिरी यांना आपल्या शेती संदर्भातल्या प्रयोगादरम्यानच इस्त्राईलच्या सॉईल एडिटिव्हजची माहिती मिळाली. त्यांनी अगोदर वापरुन त्याची खात्री करुन घेतली आणि त्यानंतर इस्त्राईलहून ते आणून संपूर्ण महाराष्ट्रात त्याचं वितरण करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

एग्रोस्पामुळं नक्की काय होतं?

एग्रोस्पा स्वत:च्या वजनापेक्षा ३०० पट पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असणारे सॉईल एडिटिव्हज आहे. सोयाबीन कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हरभरा, गहू, सर्व प्रकारचा भाजीपाला, बागायती पिके, कांदा, हळद, उस, केळी, संत्रा इत्यादी फळझाडे आणि कोरडवाहू सर्व पिकांसाठी फायदेशीर आहे. एग्रोस्पामुळं ५० टक्के पाण्याची बचत होते. हे बुरशी आणि शेवाळाची वाढ होऊ देत नाही. चिबड किंवा चोपन (क्षारयुक्त) जमिनीसाठी हे अत्यंत उपयुक्त आहे. शिवाय ते जमीन चिबडू देत नाही. एग्रोस्पा काही काळानंतर जमिनीत पूर्णत: विरघळून जातो. जमिनीतून वाहून जाणारे पाणी एग्रोस्पा साठवून ठेवतो. तसंच यामुळं बाष्पीभवनही कमी होते.

किती असावं एग्रोस्पाचं प्रमाण?

सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिकांसाठी प्रती एकर २ किलो.

भाजीपाला, बागायती पिके हळदसाठी प्रती एकर २-३ किलो.

उस, केळी, द्राक्ष, मोसंबी, निंबू, पपई, संत्रा आदी सर्व प्रकारच्या पळझाडांना आणि फूलशेतीला प्रती एकर २ ते ३ किलो.

शेती पिकांसाठी पेरणीच्या वेळेस बि-बियाण्यासोबत किंवा इतर वेळेला खत किंवा मातीत मिसळून केव्हाही वापरता येते. शिवाय फळबागांना बांगडी पध्दतीनं जमिनीच्या खाली ४ ते ६ इंच खोल मातीत किंवा खतात मिसळून वापरता येते.

image


संजय चंदनगिरी यांनी सांगितलं की आपल्याकडे शेतकरी आपल्या जमिनीबाबत खूपच भावूक असतात, शिवाय कुठल्याही प्रकारचे प्रयोग करण्यास फारसे उत्सुक नसतात. पण संजय यांनी शेती प्रदर्शनातून एग्रोस्पासंदर्भात जनजागृती केली आहे. याचाच परिणाम म्हणून हजारो शेतकऱ्यांनी आता एग्रोस्पाला आपलंसं केलंय. यामुळे लाखो हेक्टर जमिनीच्या पाण्याची बँक म्हणून एग्रोस्पा काम करत आहे.