खाद्यपदार्थ आणि रेस्टॉरंटचे पर्याय देणारं पुण्यातील ‘क्विंटो’

0

एक काळ असा होता की तुम्हाला बाहेर खायचं असेल तरी ती एक समस्या असायची...कारण कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं हे कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण तिथे अजून काय मागवायचं याची तुम्हाला खात्री असेलच असं नाही. पुण्यात राहणाऱ्या आणि द टॉस्ड सॅलॅड या फूड ब्लॉगचे लेखक साहिल खान यांना असाच अनुभव आला. साहिल खान यांचं द यॉर्कशायर हे खास अंड्यांच्या पदार्थांचं रेस्टॉरंटही आहे. साहिल खान यांना त्यांचे वाचक शहरात सर्वोत्तम बिर्याणी कुठे मिळेल?किंवा मी अमुक एका रेस्टॉरंटमधून काय मागवू ? असे प्रश्न सतत विचारायचे. त्यावेळेस त्यांना जाणीव झाली की जरी ते आणि अन्य फूड ब्लॉगर्स सातत्यानं गेली अनेक वर्ष शहरांतल्या खाद्यसंस्कृतीबद्दल लिहित आहेत, झोमॅटो आणि बर्रप हे सुद्धा जेवणाबद्दलची महिती पुरवत आहेत, तरीही लोकांना पूर्ण खात्रीशीर अशी माहिती मिळत नाहीये.

साधारणपणे याच वेळेस ह्रषीकेश राजपाठक यांनाही अशीच समस्या असल्याचं लक्षात आलं. ह्रषीकेश अन्न आणि पदार्थ (एफ अँड बी) उद्योगामध्ये खरेदीच्या प्रकल्पामध्ये सोशल मिडियावरून कार्यरत होते. ह्रषीकेश पुण्यात बे ऑफ बेंगॉल हे रेस्टॉरंटही चालवतात. त्यांनी आयआयटीमधून संगणकशास्त्रातलं पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि त्यांना पर्सिस्टंट टेक्नॉलॉजी या कंपनीत डेटा मायनिंग आणि मशिन लर्निंग या विभागातला पाच वर्षांचा अनुभवही आहे. या दोघांच्या एका मित्रानं त्यांची ओळख करून दिली आणि त्यांना एकत्र काम करायला सुचवलं.


क्विंटोची टीम
क्विंटोची टीम

याचा मूळ गाभा तोच राहिला असला तरी गेल्या काही वर्षांमध्ये आमचा या समस्येकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. अगदी संशोधनापासून ते सामाजिक शोध मॉडेलच्या प्रयोगापर्यंत आणि सध्याच्या हॉटेलमधल्या सुविधांपर्यंत सगळं काही बदललं आहे, असं २७ वर्षांचे साहिल सांगतात.

क्विंटोनं फूड आणि रेस्टॉरंट्स सुचवण्यासाठी ऑटोमॅटेड चॅट तयार करण्यासाठी एआय या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यांनी याला सिरी असं म्हटलंय. सध्या ते पुणे आणि मुंबईत कार्यरत आहेत आणि आयओएस आणि एँड्रॉईड सेवा असलेल्या मोबाईलवर हे ऍप उपलब्ध आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या उत्पादनाची सुरुवात झाली. त्यांना बाजारातला प्रतिसाद लक्षात घेऊन यावर्षीच्या फेब्रुवारीमध्ये पुन्हा विचार करण्यासाठी थांबावं लागलं. १६ नोव्हेंबरला त्यांनी त्यांच्या उत्पादनाची दुसरी आवृत्ती काढली. नैसर्गिक भाषा प्रोग्रॅमिंग ( NLP) आणि स्क्रॅच इंजिनवरच्या सूचना लक्षात घेण्यासाठी त्यांना त्यावर बराच वेळ खर्च करावा लागला.

जेव्हा त्यांनी सुरुवातीला सर्च आणि डिस्कव्हरी हे व्यासपीठ सुरु केलं तेव्हा त्यांना आणखी विस्तृत आणि नेमकेपणानं माहिती सांगण्यासाठी ग्राहकांकडून विचारणा झाली. यूजर्सना अडचणी येत होत्या पण ऍपच्या विविध व्हर्जन्सवर अंतिम निर्णय झाल्याशिवाय त्यांना ती समस्या सोडवता येत नव्हती, असं साहिल सांगतात.

यात आणखी काही चाळण्या लावल्या असत्या तर शोध घेताना मी टू अर्थात याचाही शोध घ्या असा पर्याय आला असता. त्यामुळे हे दोघेही त्याच्या विरुद्ध होते. आम्हाला मोबाईल ऍपवर आधारित मॉडेल हवं होतं. त्यात चॅटवर आधारित मॉडेल चांगलं काम करू शकेल असं तेव्हा आम्हाला जाणवलं, असं साहिल सांगतात.

यातूनच क्विंटोची संकल्पना पुढे आली. क्विंटो हे तुम्हाला काय काय खायला- प्यायला आवडतं हे सगळं जाणणाऱ्या जिगरी दोस्ताप्रमाणे आहे.

यूजर्स काय शोध घेतात हे समजण्यासाठी क्विंटो एनएलपी प्रणाली वापरतं आणि काही काळानंतर मशीन समजून घेऊन वैयक्तिक सूचनाही करतं.

आमचे आयओएस आणि अँड्रॉइड ऍप्स स्थानिक पातळीवर तयार केलेले आहेत, असं साहिल सांगतात. आपण काय खातोय, काय खाल्लं आणि त्याविषयी लोक जे विचार व्यक्त करतात त्याची माहिती डाटा मायनिंग आणि संपादन याच्या माध्यमातून गोळा करुन आम्ही शिफारशी करतो असं साहिल सांगतात.

१. डेक्कनमध्ये सगळ्यात चांगलं मसाला ऑम्लेट कुठे मिळेल?

२. ला प्लासिरमध्ये सगळ्यात चांगलं काय आहे?

३. सगळ्यात चांगलं चायनीज कुठे मिळेल?

४. कोरेगाव पार्कमध्ये बारचे कोणकोणते पर्याय आहेत?

असे प्रश्न घेऊन ग्राहक क्विंटोला संपर्क साधतात.

चांगले पदार्थ आणि रेस्टराँट्स शोधण्यासाठी एखादा कायमचा आराखडा तयार करण्यापेक्षा लोक ज्या नैसर्गिक पद्धतीने बोलतात तसंच ऍप तयार केल्याचा दावा ही टीम करतेय. यासाठी मोठ्या प्रमाणातील व्यक्तिगत माहितीचं संपादन करुन डाटाबेस करण्याचं काम सुरू असल्याचं साहिल सांगतात.

उत्पन्न वाढीसाठी कमिशनवर आधारित सामूहिक मॉडेल तयार करण्याचा टीमचा प्रयत्न आहे. त्यात सर्व डीलीव्हरी ऍप्स, खाद्य पदार्थ विक्री करणारी दुकानं आणि रेस्टॉरंट्स हे क्विंटोचा भाग असतील. त्यामुळे एखाद्याने पदार्थ किंवा रेस्टॉरंट्स याबद्दल माहिती दिली तर लगेचच त्याबद्दल माहिती देता येईल. पण कमिशन किती असेल कोण ते काम करले ते ठरायचं आहे. सेवा पुरवठादाराकडे जाण्यापूर्वी ग्राहकाला योग्य ती शिफारस आणि निर्णय घेण्यास मदत कशी करता येईल यावर लक्ष केंद्रित केल्याचं टीम सांगते. त्यामुळे क्वींटोच्या माध्यमातून लोक ऑर्डर देऊ शकता किंवा त्याना हव्या त्या रेस्टॉरंटमध्ये टेबल बुक करु शकतात.

फासोसचे संस्थापक आणि सीईओ जयदीप बर्मन यांनी गेल्या जुलैमध्ये एका विशिष्ट रकमेची गुंतवणूक केली आहे. टीमला अजून आपल्या उत्पादनातून उत्पन्न सुरू झालेलं नाही. क्विंटोला अँड्राईड ऍप स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअरवर ३.९-४ गे रेटिंग आहे. आतापर्यंत हे ऍप पाच हजारवेळा डाऊनलोड झालंय. सध्या दिवसाला १००-१२० लोक चौकशी करत असल्याचा दावा ते करतात.

टीमने सध्या पुणे आणि मुंबईवर लक्ष केंद्रित केलंय तसंच प्रत्येक वापरकर्त्याला शिफारस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

खाद्यपदार्थ तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक स्पर्धक आता उतरले आहेत. पण या क्षेत्रात सध्या निधीची कमतरता जाणवते आहे. त्यामुळे व्यवसाय, उत्पन आणि टिकून राहण्यासाठी इथे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

खाद्य पदार्थ क्षेत्रात सुरूवातीला खूप शक्ती लागते, असं अनेकांना वाटतं. दिवसाला तीनशे ऑर्डर पूर्ण करणं शक्य होतं, पण त्याच्या पलीकडे आकडा गेला तर अडचणी येतात तसंच प्रचंड स्पर्धेच्या या क्षेत्रात ग्राहक मिळवणंही कठीण असतं. या क्षेत्रात काम करणारी फूडपांडा ही कंपनी प्रत्येक ग्राहकावर सरासरी ४०० ते ५०० रुपये खर्च करते अशी सूत्रांची माहिती आहे.

एकट्या एप्रिल महिन्यात अन्न तंत्रज्ञान क्षेत्रात सात करारांच्या माध्यमातून ७४ कोटी अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. तर ऑगस्टमध्ये गुंतवणूकीचा हा आकडा ५ करारांच्या माध्यमातून १९ कोटींपर्यंत खाली आलाय. तर सप्टेंबरमध्ये दोन करारांच्या माध्यमातून हा आकडा आणखी खाली आलाय. थेट संपर्क तंत्रज्ञान आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हळूहळू प्रगती होतेय. पण अजून त्यांचं मॉडेल अजून बाजारात सिद्ध व्हायचं आहे.

लेखक- सिंधू कश्यप

अनुवाद – सचिन जोशी