पुण्यातील दोनशे झोपडपट्ट्या झाल्या कचरामुक्त, यासाठी या सफाई सैनिकांचे मनापासून आभार!

पुण्यातील दोनशे झोपडपट्ट्या झाल्या कचरामुक्त, यासाठी या सफाई सैनिकांचे मनापासून आभार!

Wednesday March 29, 2017,

6 min Read

‘ घाणीच्या साम्राज्याशी लढा देणारे हे आमचे योध्दे आहेत.’ अहोरात्र या लढ्यात हे वीर झुंज देत आहेत, जेणेकरून शहरातील गरिबांना स्वच्छ वातावरण मिळेल.


image


दररोज सकाळी, खाकी वर्दीतील माणसांचा समूह सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत युध्दभुमीवर असतो. त्यांचे हे युध्द कुणा लष्कारा विरूध्द नाही. हे सैनिक लढत आहेत अनारोग्य पूर्ण आणि उदासिनतेने देखभाल केल्या जाणा-या सार्वजनिक स्वच्छतागृहांतील परिस्थितीशी, आणि त्यांचे सारे जीवन स्वच्छ भारत करण्यात खर्च करण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यांचा हा लढा लष्कराच्या लढ्याच्या कारणापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी महत्वाचा नाही.

स्वप्निल चतुर्वेदी, किंवा ‘पूप गाय’ त्याना ज्या टोपण नावाने संबोधले जाते, जे समग्र या संस्थेचे संस्थापक आहेत. हि संस्था जी चार वर्षांपासून शहरी गरीबांच्या सांडपाणी व्यवस्थापन या विषयात काम करते आहे. त्यांच्या सफाई सैनिक, कमांडो आणि ब्रिगेडियरच्या लढ्याबाबत सांगताना म्हणाले की, त्यांच्यामुळेच मला या आशर्चयकारक स्थितीचा अनुभव घेता येत आहे. “ हे सैनिक खूप समाधानी आहेत ते जी लढाई लढत आहेत त्यावर त्यांचे प्रेम आहे”,ते म्हणाले. त्यावर काहीच न बोलता अविश्वास दाखविल्यावर ते म्हणाले की, “ तुम्ही त्यांच्याशी बोलाल तेंव्हाच हे समजू शकेल.”

आणि तसेच झाले, ज्यावेळी गौतम कुमार स्क्रिन समोर बसले, स्काइप वरून संभाषण करण्यास सवय नसल्याने अडखळत म्हणाले की, “मॅडम मुझे बहोत खुशी मिलती है, इस काम से ” गौतम हे नियुक्त करण्यात आलेले पहिल सफाई सैनिक आहेत. आणि २०१३पासून ते स्वच्छतागृहांना चमकवत आहेत. आता त्यांना सफाई कमांडो म्हणून बढती मिळाली आहे, आणि आता इतर ९४ सैनिकांसोबत ते अशा प्रकारच्या स्वच्छता सेवा दिवसातून दोनदा देतात.

“ मला वस्ती मध्ये खूप पाठिंबा आणि प्रेम मिळते, आणि मुले माझ्याजवळ येवून इतके छान संडास कसे स्वच्छ केले अशी विचारणा करतात.” त्यांनी हसतच पुढे सांगितले. गौतम हॉटेल मध्ये काम करत होते, पण एकदा त्यांनी या लोकांसोबत बोलण्यास आणि काम करण्यास सुरूवात केली आणि त्यांना सफाई सैनिक म्हणून आदर मिळू लागला. त्यांनी त्यांचा पूर्णवेळ समग्रला देण्याचे ठरविले.


image


तुषार राजेश यांनी देखील गौतम यांच्या सोबत शौर्य दाखवत सुरूवात केली. जेंव्हा विचारणा केली की हे सारे कसे काय करतात तेंव्हा त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितले की, “ मै तो बस लगा रहता हू’, ( मी केवळ काम करत जातो)” तुषार यांनी सांगितले की ते सरकारी शौचालये स्वच्छ करण्याचे काम वयाच्या १५व्या वर्षापासून करत आहेत. आणि त्यांच्या वडीलांना हेच करताना पहात ते लहानाचे मोठे झाले आहेत. “ त्यांना मी हे करावे असे वाटत नव्हते. त्यांना मी शिकून चांगले जीवन जगावे असे वाटत होते,” असे सांगत ते पुढे म्हणाले की, “ पण मला हेच खूप आवडले आणि मी हेच करत आहे.” त्याने अभिमानपूर्वक सांगताना कोणत्याही प्रकारे लाज वाटू दिली नाही की ते जे काही करत आहेत तेच सा-या आयुष्यभर करणार आहेत.

या पराक्रमी सैनिकांनी हे कसे शक्य केले

स्वप्निल यूएस मध्ये इलेक्ट्रॉनिक अभियंता होते त्यावेळी त्यांचे भारतात येणे जाणे असे, कठोरपणे, ठामपणे सांगतात की, “ ज्यावेळी तुम्ही देशाबाहेर जाता त्यावेळी देशभक्त होवून जाता,” हसतच ते म्हणाले. ज्यावेळी ते भारतात येत त्यावेळी त्यांना जाणवते की येथे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत ज्यांच्यावर काही उपाय नाही कारण ते म्हणतात त्यानुसार, “ आपण झापड लावलेल्या घोड्यांसारखे पाहतो”.

त्यामुळे, यू एस ला परतल्या नंतर, याबाबत काहीतरी करण्याचा विचार केला, त्यांनी आरेखन आणि व्यवस्थापनात दुहेरी पदवी घेण्यास सुरूवात केली. या अभ्यासक्रमा दरम्यान त्यांचा सांडपाणी व्यवस्थापनाशी संबंध आला, आणि त्यांना जाणिव झाली की त्यांना यात काम करायचे आहे. मग त्यांनी प्रशिक्षण सोडून दिले. असे असले तरी त्यांना जाणवले की हे सारे प्रत्यक्षात करणार कसे. २००९मध्ये लगेचच हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी चांगली नोकरी आणि ग्रिन कार्ड यांचा त्याग केला आणि भारतात चांगले काही तरी करण्यास परत आले.


image


जेंव्हा समग्र सुरू झाले, स्वप्निल यांनी दोन वर्ष वेगवेगळ्या प्रकारच्या पध्दतींवर प्रयोग केले ज्यातून चांगल्या प्रकारे सांडपाणी व्यवस्थापन करता येईल. शेवटी २०१३मध्ये, त्यांना नेमका उपाय सापडला जे त्यांना जाणवले की त्यांचा या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा होता.

“ जरी येथे स्वच्छतागृहे असतील तरी लोक त्यांचा वापर करत नाहीत कारण ती स्वच्छ नसतात. आणि मालकी नसल्याने, त्यानी ती स्वच्छ का बरे ठेवावीत?” स्वप्निल यांचा या प्रश्नाकडे सामाजिक समस्या म्हणून पाहण्याचा विचार बळावला, हा मानसिकतेचा प्रश्न होता.

समग्र आता “ लोरेवार्ड ” ची सेवा देते, सवलतीच्या स्वरूपात उत्पादने जसे की सॅनिटरी नॅपकिन्स, मोबाईल टॉप- अप्स, इ- कॉमर्स आणि बँकिंग सेवा जेणे करून लोकांनी स्वच्छतागृहे वापरावी आणि स्वच्छ देखील ठेवायची सवय करावी. लोकांच्या मनोवृत्तीप्रमाणे त्यांना नेमके काय हवे आहे आणि गरज कश्याची आहे याचा नेमका वेध घेतल्याने त्यांचे डोळे उघडण्यास मदत झाली आणि सफाई सैनिक ही संकल्पना राबविण्यात आली.

सफाई सैनिक त्यांच्या आघाडीवर

“ आम्हाला याची जाणीव आहे की स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत लोकांचे खूप काही गैरसमज आहेत.” त्यांनी सांगितले की, त्यांच्या सुरूवातीच्या काळातील सा-या सफाई कामगारांनी काम का सोडून दिले. “ आम्हाला समजले की हा रोजगार नाही ज्यातून काम करून सन्मानाने पैसे कमाविता यावेत, जसे इतर अशा प्रकारच्या व्यवसायात असते. ”

स्वप्निल यांनी यावर लक्ष देण्यास सुरूवात केली की या कामगारांना सक्षम करण्यासाठी काही व्यवस्था कशी निर्माण करता येईल. “ आम्ही दुप्पट-तिप्पट काम केले आणि या कामगारांना त्याचे अनुभव सांगता यावे यासाठी मंच तयार केला, ज्यावेळी हा प्रयोग केला त्यावेऴी तो खूपच नैसर्गिक प्रकारे भावनिक होता.”


image


आणि अशाप्रकारे या कामाबाबतची नवी संकल्पना स्वच्छता सैनिक ही साकारली. वातावरण बदलत, स्वप्निल यांना त्यांच्या कामगारांच्या काम करण्याच्या पध्दतीत खूप मोठा सिध्दांतिक बदल होताना दिसला. ते केवळ ‘सफाई कामगार’ राहिले नाहीत. ते समग्र आणि भारताचे ‘स्वच्छता सैनिक’ बनले. हे घाणीशी आणि अस्वच्छतेशी युध्द होते, आणि आम्हाला जाणवले की ही माणसे आमचे सैनिकच आहेत.” त्यांनी अभिमानपूर्वक सांगितले.

सुनील गुप्ता, समग्र मधील सहकारी जे महापालिकांसोबत आणि स्थानिक राजकारण्यांसोबत काम करतात, त्यांनी देखील अभिमान पूर्वक सांगितले की, कसे हे सैनिक काम करतात. “त्यांना माहिती आहे की लोक त्यांच्यावर अवलंबून आहेत. ते स्वच्छता करतात मग ती रात्र असो किंवा दिवस. “ आम्ही नाही तर कोण?” ही त्यांची वृत्ती असते, ते म्हणाले. 


image


लष्करापेक्षा कमी नाहीत

हा बदल लक्षणिय आहे ज्यामागे संपूर्ण सैनिकांची समर्पण भावना जाणवते. या लोकांना सात दिवसांचे परिपूर्ण प्रशिक्षण दिले जाते, त्यातून त्यांना सारे काही शिकता येते स्वत:ला ओळखण्यापासून, त्यांच्या सहभागीदारांपर्यंत, आणि त्यांच्या चमूच्या शिस्तीपर्यंत, वक्तशीरपणाचे महत्व, कामाच्या दर्जा पर्यंत. “ लष्करा प्रमाणेच, आम्ही कुणालाही मागे सोडत नाही. जर कुणी नाराज असेल तर त्याला हवा तो सारा पाठिंबा देण्यास आम्ही सज्ज असतो,” त्यांनी सांगितले.

या सैनिकांना संघटीतपणे केल्या जाणा-या या कामाचा अभिमान आहे, आणि समाजाकडून त्यांना आदर, समान वागणूकही दिली जाते. “ त्यांच्या चेह-यांवरील आंनद ज्यावेळी समाजातील लोक त्यांना धन्यवाद देतात त्यावेळी तो अमूल्य असा असतो,” सुनिल सांगतात. स्वप्निल यांनी यावर जोर दिला की त्यांना काम करण्याचे भावनिक स्वातंत्र्य देखील दिले जाते, जेथे त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळते.

“ एकही माणूस गेल्या आठ महिन्यात आम्हाला सोडून गेला नाही,” ते म्हणाले, समग्रच्या गळतीच्या प्रमाणात साठ वरून चाळीस आणि आता शुन्य टक्के पर्यंत यश आले आहे. हे वेगळ्या प्रकारे कामाकडे पाहिल्याच्या परिणामस्वरूप मिळालेले यश आहे.

स्वप्निल यांना त्यांच्या सैन्याचा विस्तार शंभर वरून हजार पर्यंत करायचा आहे. समग्र अखेर वृध्दींगत होणारी संस्था आहे. सध्या पुण्याच्या दोनशे झोपडपट्ट्यातून सेवा देताना नव्या सहा शहरातून विस्तार करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी लोकांचा सहभाग आणि समर्थन दोन्हीची गरज आहे. आर्थिक आणि समाजिक देखील आणि म्हणुन स्वप्निल यांनी निधी उभारण्यास सुरूवात केली आहे.

“ स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याचे काम काही केवळ आम्हीच करत नाही, तुषार सांगतात. “ तेथे अजूनही खूप लोक आहेत, ज्यांना आमच्या सोबत काहीच करायचे नाही. आम्ही फक्त त्यांचा पाठिंबा मागतो आहोत,” या निर्भय सैनिकाने सांगितले. 

लेखिका - वर्षा रॉयसॅम

    Share on
    close