बंगळुरूचे वैज्ञानिक ड्रोनच्या मदतीने वाढवतील जंगल! 

हजारो एकर जंगल लावण्याचे स्वप्न: ड्रोनमधून बरसतील बियाणे

0

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूचे शास्त्रज्ञ प्रोफेसर केपीजे रेड्डी आता ड्रोन सीड बॉम्बींगच्या माध्यमातून जंगल उगवणार आहेत. निसर्गाशी जवळीक असणारे रेड्डी तंत्रज्ञानाच्या मदतीने जंगलाचे संवर्धन आणि लागवड या संदर्भात काम करत आहेत. परदेशातील ड्रोनच्या हल्ल्यांबाबत तर आपण नेहमीच ऐकले असेल, पण भारतात असे पहिल्यांदाच होत आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या जंगलाना आणि वृक्ष तसेच झाडांबाबतची स्थिती लक्षात घेवून रेड्डी यांनी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. ज्याचा प्रयोग देखील त्यांनी करून पाहिला आहे.


फोटो मध्ये इंडियन IISC बेंगळूरुचे वैज्ञानिक/प्रोफेसर 'केपीजे रेड्डी'
फोटो मध्ये इंडियन IISC बेंगळूरुचे वैज्ञानिक/प्रोफेसर 'केपीजे रेड्डी'

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरू चे वैज्ञानिक प्रो. केपीजे रेड्डी यांचा जन्म शेतकरी कुटूंबात झाला. तंत्रज्ञानाची आवड असणा-या रेड्डी यांनी आता नष्ट होणा-या जंगलांच्या संवर्धनाचे काम सुरू केले आहे.

मागील महिन्यात जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयआयएससी बंगळुरूचे वैज्ञानिक केपीजे रेड्डी यांनी एअरोडायनामिक्स डिपार्टमेंट आणि वनविभाग यांच्या तज्ञांना सोबत घेवून ड्रोनच्या मदतीने बीजारोपण करण्याची योजना तयार केली. प्रयोगासाठी त्यानी कर्नाटकच्या कोलार जिल्ह्यातील पिनाकीनी नदीच्या किनारी जागा निवडली. प्रो रेड्डी यांचा हा प्रयोग आता प्राथमिक अवस्थेत आहे, मात्र यामध्ये काम करणा-या सा-या तज्ञांचे लक्ष्य आहे की जेवढ्या म्हणून ओसाड आणि नापिक जमिनी सापडतील तेथे बीजारोपण करून लागवड करायची आणि हिरवीगार जंगले तयार करायचा त्यांचा प्रयत्न आहे. या चमूतील सदस्य प्रो. ओमकार यांनी सांगितले की, सध्या दहा हजार एकर जागेत ड्रोनच्या मदतीने बीयाणे टाकण्याचा प्रयत्न आहे, आणि हे प्रत्येक वर्षी होत राहणार आहे. त्यांच्या मते अनेक क्षेत्र इतकी दुर्गम आहेत की तेथे पोहोचणे शक्य नाही, त्यामुळे तेथे ड्रोनच्या मदतीने बीजारोपण केले जाते.

विमान किंवा हेलीकॉप्टरच्या मदतीने असे करणे खर्चाचे असते, त्यात टेक ऑफ लॅन्डीगच्या समस्या देखील असतात. त्यामुळे ड्रोन चा पर्याय निवडला आहे.

ड्रोनचा फायदा हा देखील आहे की आधी पाहिले जाईल की, कोणत्या दुर्गम जागी बियाणे टाकता येवू शकेल. त्या नंतर बियाणे पसरविले जाईल. प्रो ओमकार म्हणाले की, बीज टाकल्यावर प्रत्येक तीन महिन्यात त्यांची पाहणी केली जाते त्यातून प्रगती कशी आहे ते समजते. उत्तर बेंगळुरू मध्ये डोडाबल्लापूर च्या परिसरात दहा हजार एकर खाली जमिन पडली आहे. तेथे हे काम सुरू होत आहे. गुरीबिंदनौर भागात २०० एकर जागेत एक सायन्स सेंटर तयार करण्यात आले आहे. या केंद्राच्या समिती मार्फत देखरेख केली जाते. या प्रयोगाचे नेतृत्व करणा-या डॉ रेड्डी यांनी सांगितले की, सुरूवातीला एका भागात प्रयोग करून पाहण्यात आला, आणि तेथे बियाणे पसरविण्यात आले. आता तेथे अभ्यास केला जात आहे की अशाप्रकारे झाडे लावणे शक्य आहे की नाही. ते म्हणाले की हा प्रयोग तीन वर्ष सुरू राहील. ही आता केवळ सुरूवात आहे, त्याच्या मार्फत पर्यावरणाच्या ब-याच पैलूंवर अभ्यास करता येईल, येणा-या काळात अशाच ड्रोनवर काम केले जाईल जो स्वत: बीज पेरू शकेल. प्रो रेड्डी म्हणाले की हा प्रयोग ब-याच प्रमाणात यश मिळवत आहे.

ड्रोनमध्ये एक कॅमेरा देखील लावला आहे, ज्याच्या मदतीने सा-या नोंदी ठेवल्या जातात. महिन्या भरानंतर त्यातील माहितीचा अभ्यास केला जातो. ज्यातून योग्य पध्दतीने बीज रोपण करण्यास मदत मिळत आहे. हा प्रयोग यावेळी सुरू करण्यात आला कारण मान्सून आला आहे आणि झाडे लावण्याची ही सगळ्यात योग्य वेळ असते. एकदा बियाणे रूजले की मग त्याला पाण्याची गरज असते जे पावसातून मिळत जाते.

जमिनीवर पडल्यावर बियाणे वाया जावू नये यासाठी त्याला खते आणि मातीमध्ये वेष्टन करण्यात आले आहे. हे सारे कोलार वनविभागाच्या मदतीने करण्यात येत आहे. ज्या बियाण्यांची रोपण केली जाते त्यात आवळा, चिंच, आणि स्थानिक वातावरणानुसार बियाणे निवडले जाते. प्रो रेड्डी म्हणतात की, या प्रकल्पात गावच्या स्थानिकांना सहभागी करून घेण्यात येते, कारण ते झाडांची योग्य निगा राखतात.

प्रो म्हणाले की येथे डोंगरी भाग जास्त प्रमाणात आहे, तेथे जाणे शक्य नाही. केवळ गिर्यारोहक तेथे जावू शकतात. त्यामुळे ड्रोनची मदत घेतली जाते. त्यांनी असे ड्रोन विकसीत केले आहेत जे दहा किलो पर्यंतचे वजन उचलू शकते आणि तासभर सलग हवेत उडू शकते. रेड्डी म्हणाले की, “ मला माहिती नाही की हा प्रयोग किती यशस्वी होईल, मात्र मला खूप अपेक्षा आहेत, आणि आशा करतो की आमचे हे मिशन यशस्वी होईल.”