आता महिलांची छेडखानी कराल तर खबरदार

0

या सोमवारी जयपूरात पूर्णत: महिलांचे दल कार्यान्वित झाले, ज्यांच्या मार्फत शहरात महिलांची छेडखानी होण्याच्या प्रकारावर नियंत्रण आणले जाईल. या दलात ५२ महिला आणि २६ दुचाकी आहेत, आणि सा-या महिलांना मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. जयपूरचे पोलिस आयुक्त संजय अग्रवाल यांनी त्यांना हिरवा झेंडा दाखवला आणि या उपक्रमाबाबत म्हणाले की, “ ही संकल्पना महिला आणि मुलींना मदत करण्याची आहे, ज्या शाळा, महाविद्यालये, आणि सार्वजनिक जागी पुरूषांच्या त्रासाचा सामना करतात. या दलाची तुलना ऍन्टी रोमियो स्क्वाडशी करू नका, कारण याचे नियोजन आम्ही खूप महिने आधीपासून केले आहे. या ५२ महिला पोलिसांना मागील फेब्रुवारी पासून प्रशिक्षण देण्यात आले आहे.”


त्यांच्या वाहनांवर वायरलेस सेट देखील देण्यात आले आहेत, प्रथमोपचार पेटी, आणि फायबरची काठी देखील. या महिला पोलिस शाळा आणि महाविद्यालयांच्या, मंदिरांच्या, बगिच्यांच्या परिसरात गस्त घालत राहतील आणि त्यांना २०० चेक पॉइंट सुरूवातीला देण्यात आले आहेत. ही गस्त सकाळी सात ते रात्री दहा पर्यत सुरू असेल. त्यांचे काम कृती करणे हे असेल. महिलांच्या विरोधात होणारे गुन्हे कमी करण्याचा हा चांगला प्रयत्न आहे, शिवाय गुन्हे प्रकटीकरणालाही त्यामुळे चालना मिळणार आहे. याबाबतच्या वृत्ता नुसार पोलिस आयुक्त म्हणाले की, “ महिलांना पोलिस दलाच्या सक्रीय मदतीचा पाठिंबा देण्याचा आमचा अधिक दृश्य प्रयत्न आहे.”

या गस्त घालणा-या महिला नियंत्रण कक्षाला कळवतील, ज्यावेळी एखाद्या महिलाची छेडखानी होत असेल. उत्तर प्रदेशातील ऍन्टी रोमियो स्क्वाडच्या तुलनेत त्या जोडीने जाणारे किंवा एकत्र वेळ घालविणारे मित्र किंवा जोडप्यांना लक्ष्य करणार नाहीत. या चेक पॉइंटशिवाय, या गस्ती पथकांना त्या भागातही लक्ष द्यायचे आहे ज्या भागातून महिला हेल्पलाईनवरून तक्रारी करतील.