तंत्रकुशल महिलेच्या अभिनव ‘बेबी मॉनिटर’ने पालकांचे काम झाले सोपे!

तंत्रकुशल महिलेच्या अभिनव ‘बेबी मॉनिटर’ने पालकांचे काम झाले सोपे!

Wednesday February 22, 2017,

3 min Read

दोन वर्षापूर्वी आर्द्रा कन्नन ऍम्बिली, सांची पोवाया आणि रंजना नायर या तिघी एका मैत्रिणी कडे गेल्या होत्या जिला मुदती आधीच बाळ झाले होते. इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी लपेटलेल्या त्या बाळाला पाहून त्यांना धक्काच बसला. त्यातच त्या बाळाचे पालक सतत त्याच्या छातीवर हाताने दाब देवून त्याचा श्वासोच्छवास नियमित करण्याचा प्रयत्न करत होते. अर्धवट वाढ झालेल्या बाळांना ब-याचदा कृत्रिम श्वास यंत्रणेचा आधार द्यावा लागतो, त्यासाठी बँटरीवर चालणा-या सेंसरचा आधार घ्यावा लागतो, जी बाळाच्या शरीरावर लावली जाते. यातूनच या तिघी अभियांत्रिकीच्या पदवीधारक महिलांना कल्पना सुचली की, एखादे कनेक्टिव्हिटीची गरज नसलेले आणि सोपे सॉफ्टवेअर तयार करता येईल त्यातूनच रेबेबीचा जन्म झाला. 


Image Source: The Ladies Finger

Image Source: The Ladies Finger


रे बेबी, जे कोणत्याही साधारण बेबी मॉनीटर सारखे दिसते त्याचा शोध लावला आरआयओटी ( RIoT (Ray IoT)) Solutions, यांनी २०१५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या स्टार्टअपने. ही कंपनी या तिघी महिला अभियंता आणि शास्त्रज्ञानी स्थापन केली, ज्या त्या आधी चांगल्या मैत्रिणी होत्या. याबाबत रंजना ज्यांनी त्यांच्या अतिव योग्य चमू बद्दल सांगितले, त्या म्हणाल्या की, “ स्मार्ट बेबी मॉनिटर तयार करण्यासाठी आम्ही तिघी परस्पर पूरक होतो, केवळ आमच्यात एक जण कॉर्नेल मध्ये यांत्रिक अभियंता आहे म्हणून नाही, किंवा दुसरीने जॉर्जियात कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावर प्रबंध सादर केला आहे म्हणून नाही, आम्ही यथायोग्य आहोत कारण आम्ही दहा वर्षापूर्वी पासून आमच्या मित्र परिवारासाठी आणि कुटूंबासाठी उच्चविद्या विभुषित बेबी सिटर्स आहोत.

रे बेबी हा महत्वाचा टप्पा होता आणि या तिघींनी तो एकत्रपणे गाठला होता, त्यांना बाजारात असलेल्या स्पर्धेची कल्पना होती, त्यामुळे त्यांना असे काहीतरी करायचे होते जे यापूर्वी कुणीच केले नसेल. जे साधारण बेबी मॉनीटर सारखे दिसते, मात्र याची हमी देते की त्यांचा थेट बाळाच्या त्वचेशी काहीच संपर्क येणार नाही किंवा त्याच्या वायर त्याला गुंडाळल्या जाणार नाहीत. यातून बाळाच्या संसर्गाची काळजी घेतली जात आहे आणि त्याच्या सुरक्षेची देखील. रे बेबीने अल्ट्रा वाईड बँण्ड रडार टेक्नॉलॉजी वापरली आहे. जी अल्ट्रासाऊंड प्रमाणे आहे. हा मॉनीटर अगदी पाच इंचाच्या बाळाला रजईत गुंडाळून ठेवल्यासारखी त्याची काळजी घेतो.

ऍप सोबत जोडलेले, रे बेबी बाळाच्या श्वसनाच्या गतीशी निगडीत असते, आणि झोपण्याच्या वेगवेगळ्या त-हाशी देखील. ते पालकांना थोडासा काही बदल झाला तरी लगेच सुचित करते जसे की आजारपण किंवा ताप इत्यादी. शिवाय साप्ताहिक आलेख देखील घेते ज्यांचा उपयोग बालरोग तज्ञ डॉक्टरांना रोजच्या उपचार पध्दतीबाबत निर्णय घेण्यास होतो.

भारतामधील ही पहिली आणि एकमेव कंपनी आहे जिच्याशी हार्डवेअर स्टार्टअप मध्ये गुंतवणूक करणा-या हँक्सने १.०७ कोटी गुंतवणूकीची तयारी दाखवली आहे आणि त्याशिवाय बहुराष्ट्रीय जॉन्सन आणि जॉन्सनने भागीदारी करण्याची तयारी दाखवली आहे. हँक्सच्या कार्यक्रमांचा भाग म्हणून ते शेंझेन, चीनमध्ये सप्टेंबर २०१६मध्ये गेले होते, या वर्षांच्या उर्वरित भागात या उत्पादनाने बाजारात धमाल केली. या उत्पादनाची बाजार किंमत २५० डॉलर्सच्या घरात गेली, आणि वितरणाच्या मोहिमेचा भाग म्हणून ते १२९ डॉलर्सना देण्यात येत होते. त्यांच्या व्यावसायिक तयारीबाबत रंजना म्हणतात, “ आम्हाला पुर्वउत्पादन काही मागण्या नोंदवून घ्यायला हव्या होत्या, जेणे करून आम्हाला प्रतिसाद समजावा भारत काही आधी स्विकारणारा समाज नाही, ते वापरात असलेले आणि चाचणी झालेल्या वस्तू वापरतात. म्हणून आम्ही सँन फ्रान्सिस्को येथे गेलो जेथे आम्ही क्राऊड फंडिंग मोहिमा केल्या. विक्रेत्यांशी चर्चा केली की लक्ष्य काय असेल किंवा चांगली विक्री कशी आणि कधी होवू शकते जेंव्हा रे बेबी बाजारात किरकोळ विक्रीला येईल. आता आम्हाला सिलीकॉन व्हँलीतून प्रतिसाद येत आहे.

हे उत्पादन सा-यां चिंतेतील पालकांना वरदान आहे, ज्यांना त्यांच्या बाळाच्या नाजूक प्रकृतीची नेहमी काळजी घ्यावी लागते, त्यांना यातून काही प्रमाणात शांती मिळाली आहे.

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी [email protected] वर संपर्क साधा.