या १७ वर्षीय कन्येला भेटा, जिने पंतप्रधान मोदी यांना प्रेरित केले !

या १७ वर्षीय कन्येला भेटा, जिने पंतप्रधान मोदी यांना प्रेरित केले !

Tuesday April 04, 2017,

3 min Read

डेहराडून येथील १७ वर्षीय या नवतरुणीसाठी हा रविवार खास वेगळा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ३०व्या मन की बात मध्ये या तरुणीने पाठविलेला संदेश वाचून सा-या देशाला संबोधित केले.

गायत्री पगवाल, डेहराडूनच्या दिपनगर लोकवस्तीत राहते, एकाएकी स्थानिक सेलिब्रीटी म्हणून तिचे नाव कानोकानी झाले आहे. तिचा स्वच्छ भारतासाठी अविरत कार्यरत हा संदेश मोदी यांनी आकाशवाणी वरून वाचून दाखविला.डेहराडून खो-यातील लोकांना अचानक या सुखद धक्क्याने हरखून गेल्यासारखे झाले, जेंव्हा गायत्री हिचा संदेश मोदी यांच्या भाषणाचा भाग झाला.


image


सरकारी कन्या आंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी असलेली गायत्री , छाया देवी आणि गुलाब सिंग यांची ज्येष्ठ कन्या आहे, तिने पाठविलेल्या संदेशात ती म्हणते की, ‘ लोकांना हे आम्ही समजावून देण्याची गरज आहे की स्वच्छता किती महत्वाची आहे. दररोज मी ज्या रिसपाना ब्रिज भागातून शाळेत जाते, तेथे सर्वत्र घाण आणि प्रदुषण पसरलेले असते. आणि जनजागृतीसाठी रॅली आमच्या शाळेच्या एनएसएस च्या अभियानातून काढूनही स्थिती जैसे थे आहे, मला असे वाटते की आपण चमू पाठवा जे संदेश देतील आणि माध्यमांच्या मदतीने याला प्रसिध्दी मिळून हा प्रश्न मार्गी लागेल.

माध्यमांशी बोलताना तिने आपली उत्सुकता व्यक्त केली,

“ मी मोदी यांना जानेवारीत पत्र पाठवून प्रयत्न केला, जे बहुदा मिळाले नसावे. २४ मार्च रोजी टोल फ्री क्रमांकावरून मी ऑडिओ क्लिप पाठवली, आणि ज्यावेळी ३० तारखेला मोदीजी माझ्या बद्दल बोलू लागले त्यावेळी मला स्वर्ग हाती आल्याचा आनंद झाला, मला आयएएस अधिकारी व्हायचे आहे आणि महिलांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे, मुख्यत्: त्याच्या शिक्षणावर आणि अर्थातच स्वच्छतेवरही!”

गायत्री म्हणाली की,

“ ज्यावेळी पंतप्रधान जे त्यांच्या जीवनात एके काळी ‘चायवाला’ होते, त्यांनी सारे अडथळे पार करत देशाचे नेते झाले, आणि स्वच्छतेचा संदेश देत देशाला मार्ग दाखवला, तर मग आपण सा-यांनी त्यांच्या प्रमाणचे का वागू नये? जर प्रत्येकाने योगदान दिले तर आपला देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे”

गायत्री हिचे कुटूंबिय आणि पालक ज्यांना या अचानक झालेल्या बदलातून उत्साह मिऴाला आहे ते म्हणाले की, “ आम्हाला तिचा अभिमान वाटतो. गायत्री सारखी मुलगी सर्वाना मिळो. हे महत्वाचे आहे की मुलींना त्यांचे कलागुण विकसीत करण्याची संधी दिली पाहिजे, आम्हाला आनंद आहे की आम्ही तिला ते स्वातंत्र्य, शिक्षण आणि संधी देत आहोत. अपेक्षा आहेत की त्यातून लोकही प्रेरणा घेतील आणि स्वच्छतेच्या साठी पुढाकार घेतील.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ३० तारखेच्या मन की बात मध्ये गायत्रीचा उल्लेख केला आणि म्हटले कि, “ येथे एक मुलगी आहे जी तिच्या मनातील राग व्यक्त करते कारण नदी परिसर स्वच्छ नाही. ही देखील चांगली सुरूवात आहे. मला वाटते की सा-या देशातील लोकांनी अस्वच्छतेचा राग व्यक्त करावा, असा राग ज्यातून लोकांना स्वच्छता व्हावी असे वाटेल. मला हे आवडले की तिने यासाठी काम करण्याची तयारी दर्शवली आहे. अनेक लोक या विषयावर जागृत होत आहेत. स्वच्छ भारत अभियान हे ‘आदत बढाने का आंदोलन’ म्हणजे स्वच्छतेसाठी काम करण्याची सवय वाढविण्याचे आंदोलन व्हावे. मला वाटते की तरूण पिढी या मध्ये मोलाचे काम करेल.”

    Share on
    close