संपूर्ण संघटनात्मक संरचनेला बदलण्याचे नांव- सुषमा राजागोपालन.

0

आयटीसी इंफोटेकशी जुडलेल्या सुषमा राजागोपालन यांचे म्हणणे आहे की, येत्या काळात उभरत्या उद्योगांना गुंतवणूकीची कोणतीही ददात नसेल, पण हे पहावे लागेल की, व्यावसायिक या संधीला उत्पादकतेत कशी बदलण्यात यशस्वी होतात.

विकासाच्या टप्प्यातून जाणा-या स्टार्टअप्सना नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी एक भक्कम वस्तुनिष्ठ तंत्र आणि त्याशिवाय इंक्युबेटर्स, गुंतवणूकदार आणि वेगवेगळ्या सेवा देणा-यांच्या समर्थनाची गरज असते. शुक्रवारी बंगळूरू मध्ये टेकस्पाक्र्सच्या सहाव्या आवृत्तीमध्ये बोलताना आयटिसी इंफोटेकच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्यकार्यकारी अधिकारी सुषमा राजागोपालन यांनी सांगितले की,“जर आपण हे पाहण्यासाठी की आपण आय टी सेवाक्षेत्रात कसे आलो, यापूर्वी पंचवीस वर्षे आधी नजर टाकली तर हे देखील सहजपणाने समजेल की असे केवळ भारतात उपस्थित प्रतिभेच्या बळावर हे शक्य झाले आहे आणि याच प्रतिभेचा योग्य पध्दतीने फायदा करून घेताना आम्ही एका भक्कम वस्तुनिष्ठ तंत्राची स्थापना करून जागतिक नाविन्याला चालना देऊ शकतो”

सुषमा राजागोपालन
सुषमा राजागोपालन

बदल कुठे होत नाही

२.६७ दशलक्ष इंटरनेट उपयोगकर्ता आणि दररोज चार दशलक्षपेक्षा जास्त युट्यूब डाऊनलोडच्या छानश्या आकड्यांच्या बळावर आपण सहजपणाने याबाबत कल्पना करु शकतो की, जग कोणत्या प्रकारच्या बदलातून जात आहे. लँडलाइन फोनला एक दशलक्ष वापरकर्त्यांचा आकडा गाठण्यास सतरा वर्षे लागली तर व्हाटस्अप केवळ एका वर्षात असे यश मिळवण्यात यशस्वी झाला.

सुषमा म्हणतात की,“लोक आपसात खूपच वेगाने आणि सहजपणे एक-दुस-याशी जोडण्यात यशस्वी होत आहेत. आणि जेंव्हा तुम्ही जोडण्यात यशस्वी होता तेंव्हा तुमच्या खरेदी करणे, विकणे आणि चर्चा करणे याबाबतच्या त-हा बदलतात. मी सातत्याने माझ्या पालकांशी फेसबुकच्या माध्यमातून संपर्कात असते आणि ते सुध्दा ८०वर्षांच्या वयात हे सारे सहजपणाने करतात. अशावेळी जगात तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वकाही बदलण्याची अपेक्षा करते”.

बदलाचे सर्वात मोठे सौंदर्य हे आहे की, तो लोकांमधील अंतर कमी करून त्यांच्यातील सुरक्षितता वाढवतो आणि त्यांना नित्यनूतन अनुभवांशी तोंडओळख करून देतो. सुषमा यावर जोर देतात की तो ओला असो किंवा उबर किंवा येलो पेजेस, हे केवळ उद्योजकांच्या सक्रियभुमिका आणि त्यांच्या विचारांमुळे त्यांना त्यांच्या उद्दीष्टांपर्यंत जाणे शक्य झाले. यासाठी प्रामुख्याने या सहस्त्राब्दिचे कार्यबळ जबाबदार आहे. ज्याचा ७०टक्के हिस्सा स्वबळावर काही नवे सुरु करु इच्छितो.

कर्मचा-यांतील उद्यमशीलतेला चालना देणे

आयटीसी इंफोटेक मध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी काम करतात, कंपनीने आपल्या कर्मचा-यांमध्ये उद्यमशीलतेच्या भावनेला चालना देण्यासाठी त्यांना आपले स्वत:चे उद्योग सुरू करण्यास प्रेरित करण्याचे काम केले आहे. विद्यमान काळात जवळपास प्रत्येक मोठ्या संस्थेने वेगवेगळ्या स्टार्टअप्सला मार्गदर्शन करण्याची भूमिका बजावण्याची आणि त्यासाठी गुंतवणूक करण्याची तयारी दाखवली आहे.

सुषमा मानतात की, येत्या काळात स्टार्टअप मंडळींसाठी निधीची कोणतीही कमतरता नसेल, कारण भांडवलदार उद्योजक आणि गुंतवणूक खाजगी समभाग निधी (इक्विटी फंड)च्या भरवश्यावर गुंतवणूक करण्यास तयार आहेतच. असे असले तरी सुषमा या गोष्टीवर आपले पूर्ण लक्ष देतात की, एका खूप मोठ्या संख्येच्या कंपन्या गुंतवणूक मिळवण्यात यश मिळवू शकणार नाहीत, कारण या क्षेत्राला केवळ पैश्यांशिवाय अजूनही काही गोष्टींची गरज असते. स्टार्टअप मंडळींना सहकार्य आणि चालना देण्यासाठी एक वस्तुनिष्ठ तंत्रज्ञान निर्माण करण्याची गरज आहे. येत्या काळात हेकेथॉन्सच्या संख्येत वाढ होणार आहे. पण त्यांचा फायद्यासाठी उपयोग करून घेणे हेच मुख्य आव्हान असेल.

सुषमा पुढे सांगतात की, “ येथे आयटीसी इंफोटेक मध्ये आम्ही प्रत्येक हेकथॉन मध्ये मांडण्यात आलेल्या ६ते८ संकल्पना विचारात घेऊन त्यात पैश्यांची गुंतवणूक न करता या संकल्पनांना बाजारापर्यंत यशस्वीपणे घेऊन जाण्यात सशक्त करण्याचे काम करु. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिले तर मोठ्या व्यापारी घराण्यांमध्ये नेहमीच स्टार्टअपचा शोध घेतला गेला आहे किंवा त्यांना खरेदी करण्यात आले आहे. निर्मात्यांमध्ये पूर्ण स्पष्टता, विचारांना विक्रीयोग्य प्रस्तावात बदलण्याची क्षमता आणि एक मजबूत विक्री वाहिनीची निर्मिती या वस्तुनिष्ठ तंत्राचे तीन महत्वाचे कारक आहेत.

working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte