हजारो विद्यार्थ्यांना शिकता यावे या ध्यासाने कार्यरत ऑटो चालकांची प्रेरक कहाणी!

0

४५ वर्षीय राजा सेथ्थू मुरली हे ध्येयवेडे आहेत. कोइंबतूर येथे ते रिक्षा चालवितात. त्यांचा प्रयत्न असतो की प्रत्येक वंचित मुलाला शिक्षण मिळाले पाहिजे, जे त्यांना कधीच मिळू शकले नाही.

दारूड्या वडिलांच्या सानिध्यात लहानाचे मोठे होत असताना आणि मोलमजूरी करून गुजराण करणा-या मातेसोबत उपाशी पोटी झोपी जात असताना, हालाखी त्यांच्या पाचवीलाच पूजली होती. त्यांच्या या स्थितीत शिक्षण हा काही प्राधान्याचा विषय होवू शकत नव्हता. एकही मूल शिकण्यापासून वंचित राहू नये या प्रयत्नात राजा यांनी त्यांनी कमाविलेल्या बहुतांश उत्पन्नाचा खर्च केला आहे. गरीब मुलांना शिकण्यासाठी मदत करताना कोईंबतूरच्या शाळेतून ते त्यांचे आधार झाले आहेत. याबाबत बोलताना ते म्हणतात की, “ मी केवळ तीन मुलांपासून सुरूवात केली होती आणि आज मी १५० जणांना वार्षिक मदत करू शकतो आहे, जी ३२ शासकीय विद्यालयात शिकतात. जर ही मुले दहावीच्या वर्गात चांगले गुण मिळवू शकली, ती त्यांच्या जीवनात नक्कीच चांगले काम करतील.” 


Image: Covai Post
Image: Covai Post

गेल्या अकरा वर्षात त्यांनी सुमारे १३००विद्यार्थ्याना मदत केली आहे. त्यांना ही गरजू मुले कोईमतूरच्या शाळांतून सापडतात त्यासाठी शिक्षकांची ते मदत घेतात आणि मग त्यांना दप्तरे, पुस्तके आणि जेवणाचा डबा देण्याचे काम करतात. सरासरी एका मुलावर ते १७०० रूपये खर्च करतात. ज्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसतात त्यांचे चालक सहकारी, रोजंदारी मजूर ज्यांना त्यांच्या कार्यावर भरोसा आहे ते त्यांना मदत करतात. मात्र राजा यांच्या दानशूरपणाची आणि दयाळूपणाची कहाणी इथेच संपत नाही. ते एचआयव्ही बाधीत मुलांना देखील आधार देतात, त्यांच्या साठी बाजूच्या गावातून वस्तू आणि भेटवस्तू घेवुन येत असतात.


Image: The News Minute
Image: The News Minute

गेल्या वर्षी केवळ तामिळनाडू मध्ये ३७,४८८ मुलांना शाळा सोडावी लागली. कोईमतूर मध्ये दुस-या क्रमांकाची गळती २२०३ मुले शाळा सोडून गेली. बहुतांश मुले गरीबीमुळे शिकण्याला पारखी झाली, किंवा त्यांचे पालक विस्थापित झाल्याने सोडून गेली. राजा या मुलांसाठी जे काही करत आहेत ते त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेरणा देणारे आणि शाळांमध्ये टिकून राहण्यासाठी कारणीभूत होत आहे, जेणे करून ती शिक्षण पूर्ण करू शकतात.