पुस्तके आणि रक्तदानाच्या लोकजागृतीसाठी धडपडणारे प्राध्यापक डॉ.राजीव कुमार गुप्ता

पुस्तके आणि रक्तदानाच्या लोकजागृतीसाठी धडपडणारे प्राध्यापक डॉ.राजीव कुमार गुप्ता

Tuesday December 15, 2015,

5 min Read

आजच्या या धकाधकीच्या जीवनात जिथे लोक त्यांच्या दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठी स्वतःला अपयशी समजतात, तिथेच एक मूर्ती अशी आहे की जी आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळात वेळ काढून दुसऱ्यांच्या आयुष्यात दिवा तेवत ठेवण्यासाठी तसेच प्राणांचे रक्षण करण्यासाठी तळमळीने प्रयत्न करीत आहे. या व्यक्तीचे नाव आहे डॉ.राजीव कुमार गुप्ता. शिक्षण क्षेत्रातली ही नामांकित व्यक्ती आपल्या जवळपासच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘नोएडा बूक डोनर्स क्लब’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून तसेच ‘ब्लड ऑन डिमांड .कॉम’ (bloodondemand.com) या वेबसाईटद्वारे लोकप्रिय झाले आहेत.


image


मुळचे मथुराचे असलेले आणि वर्तमानातील नोएडाच्या राजकीय पदवी कॉलेज मध्ये फॅकल्टी ऑफ कॉमर्स अंड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन मध्ये अकाउन्टंट आणि कायद्याचे प्राध्यापक असलेल्या डॉ. गुप्ता यांचे मानणे असे आहे की बरेच विद्यार्थी आपल्या अभ्यासक्रमानंतर आपली पुस्तके रद्दी मध्ये देतात किंवा धूळ खात पडतात ज्याच्यात नुकसान दोघांचेही होते. एक तर ही पुस्तके गरजूंपासून दूर रहातात आणि त्यांच्या नव निर्मिती साठी पर्यावरणाची पण हानी होते.


image


डॉ. गुप्तांच्या कथनानुसार, " एकीकडे पुस्तकांच्या निर्माण प्रक्रियेच्या पूर्ततेसाठी असंख्य झाडे कापली जातात. या व्यतिरिक्त ही पुस्तके गरीब मुलांना खरेदी करणे शक्य नसते तर दुसरीकडे विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच विविध विषयांच्या अभ्यासासाठी विद्यार्थी दरवर्षी मोठ्या रकमेची पुस्तके खरेदी करतात आणि कालांतराने ती रद्दीत देतात. यामुळे फक्त विद्येचाच अनादर होत नाही तर पर्यावरणाची पण हानी होते. कारण त्यांच्या निर्मिती साठी मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल होते. विद्यार्थांनी अशा पुस्तकांची आपापसात देवाणघेवाण करून सामंजस्याने समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी या पुस्तकांचे प्रसंगी वाटप करावे या हेतूने त्यांनी सन २००९ मध्ये usedbooksandgoods.com ची स्थापना केली.


image


डॉ. गुप्ता सांगतात की त्यांनी ही वेबसाईट या हेतूने सुरु केली होती की जुनी पुस्तके आम्ही गरजवंताला सहज उपलब्ध करून देऊ शकू. प्रारंभी त्यांना आपल्या या कार्यात अनेकांची कुचेष्टा तसेच ठराविक कालांतराने रद्दीवाला या शब्दाची सल सहन करावी लागली आणि तसेच पुस्तकांसाठी लागणाऱ्या जागेच्या अभावामुळे मी या कामाला पूर्ण विराम दिला.

पण ध्येय वेडे डॉ. राजीव यांनी हार मानली नाही. त्यांना जाणवले की आजची तरुण पिढी फेसबुकचा मोठ्या प्रमाणावर वापर करीत आहे. त्यांनी तरुणांच्या फेसबुक प्रती असलेल्या आकर्षणाला सकारात्मक दृष्टीकोनातून नवीन दिशा देण्याचा विचार केला. त्यांनी तरुणांना आपल्या सहकार्यासाठी एक फेसबुक पेज ‘’नोएडा बुक डोनर्स क्लब’’ तयार केला. या क्लबच्या माध्यमाद्वारे आपली जुनी पुस्तके दुसऱ्यांना देण्यासाठी किंवा आपली पुस्तके दुसऱ्यांबरोबर अदलाबदल करून वाचण्यासाठी या पेजवर जाऊन आपली माहिती टाकू शकतात. या पद्धतीने गरजू एकमेकांशी संपर्क साधून पुस्तकांची देवाणघेवाण करू शकतो. या व्यतिरिक्त कुणी आपली पुस्तके एखाद्या संस्थेला किंवा वाचनालयाला दान करू इच्छितात, ते सुद्धा आपली माहिती पोस्ट करू शकतात जेणेकरून लोक त्यांच्याशी संपर्क साधू शकतील.


image


डॉ. गुप्ता सांगतात की,’’आमच्या या क्लबच्या माध्यमाद्वारे सगळ्यात जास्त फायदा अशा विद्यार्थ्यांचा होतो जे पैशाच्या अभावी महागडी पुस्तके घेण्यास असमर्थ असतात. याव्यतिरिक्त आमचा उद्देश या क्लबच्या माध्यमाद्वारे शहरातल्या सगळ्या व्यावसायिक कॉलेज, इग्नू, आर्मी सेंटर आणि क्लब च्या व्यतिरिक्त विविध वाचनालयांना एकत्रित करून जास्तीत जास्त लोक पुस्तकांचा वापर करू शकतील.

आजघडीला जवळजवळ २५० लोक या क्लबचे सदस्य आहे. ज्यात शिक्षणासंबंधीचे नावाजलेले लोक जोडले गेले आहेत. डॉ. गुप्ता सांगतात की आमच्या कॉलेजचे माजी प्राचार्य श्री. जे. पी. शर्मा आमच्या या क्लबचे सदस्य आहेत, ज्यांनी आपल्या अनेक वर्षाच्या मेहनतीने जमा केलेली पुस्तके या गरजवंताना दान केली. तसेच अनेकांच्या सहकार्याने पुस्तकांची संख्या वाढत गेली.

पुस्तकांची गरज पूर्ण करण्याव्यतिरिक्त डॉ. राजीव गुप्ता हे रक्ताच्या कमतरतेमुळे मृत्यूशी झुंजणाऱ्या लोकांसाठी एक देवदुताचे काम करीत आहेत. एखाद्या दुर्घटना किंवा आपत्तीच्या प्रसंगी गरजू लोकांना रक्ताची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने एक वेबसाईट bloodondemand.com चा प्रारंभ केला ज्याला वर्तमानात २५०० पेक्षा अधिक लोकांचे सहकार्य मिळाले आहे.

डॉ.राजीव सांगतात, "सन २००९ मध्ये आमच्या कॉलेजच्या एका प्राध्यापकाच्या आईला एका दुर्घटननेनंतर रक्ताची गरज भासली, घरचे सदस्य पण रक्त द्याला कचरत होते. त्याच क्षणी बिकट परिस्थिती मध्ये रक्तसाठा उपलब्ध करण्याच्या निश्चयाने मी अशा एका स्वयंसेवकांचा एक ऑन लाईन समूह तयार केला की जो कोणत्याही क्षणी कोणत्याही परिस्थिती रक्तदानासाठी तत्पर असेल. डॉ. राजीव सांगतात की आज पण आपल्या समाजात रक्तदानाबद्दल लोक संभ्रमित आहेत. अधिक तर लोक रक्त घेण्यासाठी तयार असतात पण दानासाठी मागे असतात".

आपल्या वेबसाईट बद्दल राजीव सांगतात की,"रक्तदानासाठी इच्छुक असलेली कोणतीही व्यक्ती आमच्या वेबसाईटवर एक लॉगिन तयार करू शकते, त्याच्या अधिकृत नोंदणी नंतर एक पासवर्ड दिला जातो ज्याचा उपयोग तो कोणत्याही क्षणी करू शकतो. आम्ही आमच्या या वेबसाईटवर डोनर्सचा रक्तगट त्याच्या मोबाईल नंबर सहित नमूद करतो जेणेकरून कोणतीही व्यक्ती कठीण क्षणाला त्यांच्याशी संपर्क साधू शकते. आपल्या या प्रयत्नांनी त्यांनी नोएडा आणि जवळपासच्या क्षेत्रातील अनेकांचे प्राण वाचवले आहेत.

तसेच डॉ. राजीव गुप्ता हे लोकांना एकमेकांची मदत करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने एका सामजिक आणि सांस्कृतिक वातावरणनिर्मितीसाठी 'निर्माण – नोएडा '(www.nirman.noida.com) या वेबसाईटचे यशस्वी संचालन करीत आहे. या बद्दल बोलताना ते सांगतात की, "या वेबसाईटच्या माध्यमातून आमच्या कार्याचे समर्थन करणाऱ्या तसेच व्यावसायिक लोकांना एकाच मंचावर आणून देश आणि समाजामध्ये एक घट्ट नाते तयार करण्यास प्रेरित करीत आहोत. या वेबसाईटच्या माध्यमाने समान आचार – विचारांचे लोक पुढे येऊन आपले मत मांडतात आणि एक सशक्त समाज बनविण्याच्या दिशेने आपले योगदान देतात’’.

डॉ. राजीव स्वखर्चाने आपल्या या कार्याचे व्यवस्थापन कुणाच्याही आर्थिक मदतीशिवाय करीत आहेत. त्यांचे काही विद्यार्थी ही वेबसाईट तयार करायला व व्यवस्थापन बघायला मदत करतात पण बाकी यासाठी लागणारा खर्च ते स्वतः करतात.

या सगळ्या कार्याव्यतिरिक्त डॉ. राजीव पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने आपली वाटचाल करीत आहे. ते लोकांना जास्तीत जास्त झाडे लावण्यास प्रवृत्त करीत आहेत. ते म्हणतात की आपण वानरांची लेकरे आहोत आणि नक्कल करणे हे आपल्या स्वभावातच आहे. आज मी झाडे लावली तर माझे बघून काही लोक पुढे येऊन झाडे लावण्यास प्रवृत्त होतील. नोएडा मध्ये कुठेही दुर्घटनाग्रस्त हालचाली दिसल्या की डॉ. गुप्ता तेथे जावून वृक्षरोपण करतात. "मी निठारीच्या खुनी कोठी बाहेर झाडे लावली. देशभरातल्या चर्चित आरुषीच्या घराबाहेर तिच्या आठवणी प्रित्यर्थ तसेच देशाला हादरवणा-या अखलाक हत्याकांडच्या मृतांच्या आठवणीसाठी एक झाड लावले’’. पर्यावरणाप्रती असलेल्या या प्रेमामुळे लोक त्यांना ‘’धरतीपुत्र’’ संबोधतात.

डॉ. राजीव कुमार गुप्ता यांना त्यांच्या या प्रामाणिक कामासाठी अनेक पुरस्कारांनी गौरवांकित केले आहे. त्याना सन २००९ च्या एअर इंडिया तर्फे ब्रॉड आउटलुक लर्नर्स टीचर (BOLT) पुरस्कार मिळाला ज्यासाठी त्यांना सिंगापूरला जाण्याची संधी मिळाली. याशिवाय सन २००६ मध्ये त्यांची साप्ताहिक पत्रिका तर्फे ‘टीचर विद ए कॉज’ साठी निवड झाली.

डॉ. राजीव कुमार गुप्ता शिक्षण आणि सामजिक कामाव्यतिरिक्त अभ्यास पण करतात आणि आता पर्यंत अनेक विषयात पदवी संपादन केल्या आहेत. डॉ. गुप्ता यांनी एमकॉम, एलएलबी, पीएचडी आणि एमबीए करण्या व्यतिरिक्त मास्टर्स इन जर्नालिझम चा अभ्यासक्रमपण पूर्ण केला आहे. याशिवाय ते चालू वर्षी सीए ची अंतिम परीक्षा देणार आहे. तसेच सुप्रीम कोर्टात उत्तरप्रदेशातल्या सगळ्या उच्च शैक्षणिक संस्थांच्या नेमणूक अधिकाराच्या रुपात प्रतिनिधित्व करीत आहेत.

डॉ. राजीव कुमार गुप्ता यांच्याशी तुम्ही त्यांच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून संपर्क साधू शकता.

लेखक : निशांत गोयल

अनुवाद : किरण ठाकरे

    Share on
    close