भेटा द्रौपदी मुर्मू यांना, आदिवासी महिला ज्या भारताच्या आगामी राष्ट्रपती असू शकतात

0

द्रौपदी मुर्मू , उडिशा मधील ५९ वर्षीय आदिवासी महिला, आणि झारखंडच्या राज्यपाल या बहुतेक भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील असे प्रसार माध्यमांच्या अहवालात  म्हटले आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २५ जुलै रोजी पूर्ण होत आहे, जर द्रौपदी यांची निवड झाली तर त्या या सर्वोच्च पदावर जाणा-या पहिल्या आदिवासी महिला असतील. मात्र राजकीय क्षेत्रात गेल्या वीस वर्षापासून त्यांचे हे पहिल्यांदाच असलेले ‘पहिलेपण’ नाही.

१८ मे २०१५ रोजी द्रौपदी यांना ज्यावेळी झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्त केले, उडिशा मधील त्या केवळ पहिल्या महिलाच नाही तर आदिवासी महिला नेत्या होत्या ज्या देशात राज्यपाल पदावर गेल्या होत्या.

.

Image: (L) – Daily News and Analysis; (R) – The Quint
Image: (L) – Daily News and Analysis; (R) – The Quint

स्वर्गीय बिरंची नारायण तुडू यांच्या कन्या असलेल्या त्यांनी १९९७ मध्ये त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात केली. उडिशाच्या रायरंगपूर या जिल्ह्यात त्या नगरसेविका झाल्या, आणि त्याच वर्षी नगरपालिकेत सभापती देखील झाल्या.

या दोन वेळच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला राज्य सरकारने सामाजिक बांधीलकीच्या उपक्रमातील सहभाग आणि समाजोथ्थानाच्या कामात प्रशंसनीय कामगिरीसाठी गौरविले देखील आहे. एका वृत्ता नुसार द्रौपदी यांनी मंत्री म्हणून देखील काम केले आहे ज्यावेळी नविन पटनायक यांचे भाजप समर्थित सरकार सत्तेवर होते. त्यांच्या भविष्यातील वाटचाली साठी युवर स्टोरी मराठी कडून त्यांना मनपूर्वक शुभेच्छा!