शबाना आझमींच्या शैलीत जग कसे जिंकायचे?

शबाना आझमींच्या शैलीत जग कसे जिंकायचे?

Friday April 29, 2016,

5 min Read

'मी फरहान अख्तरची आई आहे? म्हणून तुमच्यापैकी कितीजण येथे आले आहेत', मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या एका कार्य़क्रमात तंत्रज्ञानाविषयातील कर्मचाऱ्यांनी खचाखच भरलेल्या सभागृहात शबाना आझमींनी हा प्रश्न विचारला आणि सभागृहात एकच हशा पिकला. मला नेहमीच अशा लोकांबद्दल आदरयुक्त भीती वाटते, ज्या लोकांना आपण काय म्हणतोय आणि काय करतोय, याची कायम जाणीव असते आणि ते सहजरित्या तसे करत असतात. शबाना आझमी या त्यापैकी एक आहे. कम्युनिस्ट वातावरणात वाढण्यापासून ते रुढीविरुद्ध असलेला तरीही प्रसिद्ध अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास, विविधतेतील सुंदरतेला सहकार्य, या कारणांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. त्यांनी आपल्या ४० मिनिटांच्या संबोधनात उपस्थितांसोबत मनापासून संवाद साधला.

शबाना आझमीं ( फोटो सौजन्य : इंडिया फोरम्स डॉट कॉम)

शबाना आझमीं ( फोटो सौजन्य : इंडिया फोरम्स डॉट कॉम)


बालपण

भारतातील प्रसिद्ध उर्दू कवी कैफी आझमी साहब, यांच्या पोटी जन्माला आलेल्या शबाना यांचे बालपण निश्चित सुंदरपणे व्यतित झाले होते. 'जेव्हा मी लहान होते तेव्हा मला निळ्या डोळ्याची सुंदर अशी एक बाहूली हवी होती आणि मला माझ्या वडिलांनी काळ्या रंगाची बाहूली आणून दिली', अशी त्यांच्या बालपणाची आठवण शबाना सांगतात. कॉन्व्हेंट शाळेत शिकणाऱ्या शबाना यांना कुर्ता परिधान केलेले वडिल तेही रुढीविरुद्ध असलेले यांचा संबंध जुळवणे कठीण होत होते. मात्र कालांतराने त्यांची ओळख विल्यम वर्डस्मिथ यांसारख्या प्रसिद्ध कवींशी झाली आणि तेव्हा त्यांना आपल्या वडिलांबद्दल ते कोण होते आणि त्यांनी काय केले, यांबद्दल अधिक जाणता आले. 'मला माझ्या वडिलांबद्दल अभिमान वाटू लागला आणि जाणीव झाली की, ते वेगळ्या विचारसरणीचे आहेत. जे मला खूपच सुंदर वाटत होते.', असे त्या सांगतात. विविधता त्यांच्या बालपणातही कशाप्रकारे रुजली गेली होती, याबद्दल बोलताना त्या सांगतात. जन्मापासूनच कम्युनिस्ट वातावरणात वाढलेल्या तरुण शबाना यांच्याकरिता स्त्री-पुरुष समानता ही काही प्रतिकूल संकल्पना नव्हती. 'आम्ही एका अरुंद घरात राहत होतो. आमच्या घराच्या दिवाणखान्याला रेड हाऊस असे म्हटले जायचे. माझे वडिल कम्युनिस्ट होते आणि आमचे बालपण हे स्त्री-पुरुष समानतेच्या संकल्पनेच्या अवतीभवतीच व्यतित झाले होते.', असे शबाना सांगतात.

ऑन द 'फायर'

भारतातील एक यशस्वी अभिनेत्री असलेल्या शबाना यांनी त्यांच्या कारकिर्दीत सबळ स्त्रियांच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. चाकोरीबाहेरचा हा प्रवास त्यांनी कसा साकारला? अभिनेत्यासोबत त्याच्यापेक्षा दुय्यम व्यक्तिरेखा साकारण्याचा विचार महिला करत असताना त्यांनी या परिस्थितीत स्वतःला कसे सांभाळले? शबाना सांगतात की, 'जेव्हा मी 'फायर'मध्ये काम केले, तेव्हा मला माहित होते की या चित्रपटावरुन वादविवाद होणार आहेत. त्यामुळे मी माझे मत माझ्या पतीकडे मांडले. त्यांनी मला सांगितले जर मला माहित असेल की, मी हे का करत आहे तर मी निश्चितच त्यात पुढे जायला हवे.' चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शबाना आझमी त्या साकारत असलेल्या प्रत्येक भूमिकेचा सखोल जाऊन अभ्यास करतात. कशापद्धतीने त्या हे करतात?

'अभिनय हा नेहमी मनापासून यायला हवा. आपकी मिट्टी गिली होनी चाहिये. आपण त्या लोकांना घाबरतो, जेव्हा आपण त्यांना ओळखत नसतो. वेश्येपासून ते घरकाम करणारी स्त्री, मी नेहमीच त्या लोकांच्या संपर्कात असते, ज्यांची भूमिका मी साकारणार असते. मला कधीही कोण्या व्यक्तिचा वापर पुरस्कार जिंकण्यासाठी करायचा नाही. त्यामुळेच मी सामाजिक कार्यातदेखील सहभागी झाली आहे.', असे त्या सांगतात. सध्याचा काळ हा अश्लिल अशा आयटम सॉंगचा तसेच ज्यामुळे पैसे गोळा करता येतील, अशा गोष्टींचा जमाना आहे. या मुद्द्यावर तसेच सध्याच्या काळातील अभिनेते, अभिनेत्रींबद्दल तसेच दिग्दर्शकांबद्दल शबाना आझमींचे काय मत आहे?

'एखाद्या पटकथेचा भाग नसताना, तेथे आयटम सॉंग असेल, तर मला ते अडचणीचे वाटते. कामुकतेची अभिव्यक्ती नाही आहे ती. अशा अश्लिल गाण्यांची का सर्वांकडून प्रशंसा केली जाते? का चार वर्षाचे मूल अशा अश्लिल गाण्यांवर नृत्य करते? चित्रपट सृष्टीला याकरिता दोष देऊ नका. आपल्या दोघांच्या समान जबाबदाऱ्या आहेत.', असे शबाना सांगतात. असे असले तरी, त्या आशावादी आहेत आणि नव्या पिढीचे अभिनेते, अभिनेत्री आणि दिग्दर्शक हे चांगले काम करत असून, बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत, असे त्या सांगतात.

अभिनेत्री ज्यांनी १९८८ साली जॉन स्झ्लेसिंगर (John Schlesinger) यांच्या मॅडम सॉसत्झ्का (Madame Sousatzka) या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस त्या १२ चित्रपटांमध्ये काम करत होत्या. 'राजेश खन्ना आणि मी पुढील सीनबद्दल माहिती नसतानाही एक सीन केला.', असे त्या मनोमनी हॉलिवूडशी तुलना करत हसून सांगत होत्या. जेथे दोन्ही अभिनेते आणि दिग्दर्शक बारा महिने एकच चित्रपट तयार करत असतात. हॉलिवूडकडे ते कौशल्य तसेच तपशीलाकडे त्यांचे लक्ष असते. तर आपल्याकडे व्यवस्थापनाचा एक मार्ग आहे.. जुगाड. आपण क्षणार्धात कोणतीही गोष्ट तेथे फिक्स करू शकतो. त्यामुळे हॉलिवूड आणि बॉलिवूड या दोघांनाही एकमेकांकडून शिकण्यासारखे बरेच काही आहे, असे त्या सांगतात.

विविधता सुंदर आहे

त्यावेळेस जेव्हा आमची ओळख ही सहसा चर्चेत, वादविवादात असायची. शबाना यांना वाटायचे की, आपल्याला आपल्या विविधता असलेल्या संस्कृतीवर अभिमान वाटायला हवा. कोणीही दोन व्यक्ती या सारख्या नसतात आणि हिच विविधता आहे, जी आपल्याला योग्य माध्यमातून साजरी करायला हवी, या गोष्टीवर शबाना यांचा विश्वास आहे. 'भारतात, जेव्हा आपण ओळखीबद्दल बोलत असतो, तेव्हा ते अखेरीस धर्मावर येते. हे आपल्या देशाचे सत्य नाही. आपली ओळख आपल्या धर्मापासून वेगळी करण्यासाठीच्या प्रत्येक प्रयत्नाला आपण विरोध करायला हवा.', असे त्या सांगतात.

शबाना – सामाजिक कार्यकर्त्या

अभिनेत्री म्हणून शबाना यांनी साकारलेल्या अनेक भूमिकांनी समाजात निषिद्ध मानल्या जाणाऱ्या गोष्टींवरील निर्बंध तोडले. तरीही सामाजिक कार्यात त्यांना सक्रीय सहभागी व्हायचे होते. अभिनय क्षेत्राशी त्या अशाप्रकारे जोडल्या गेल्या होत्या की, त्या अनेक गोष्टींपासून अलिप्त राहिल्या. मात्र 'अर्थ' चित्रपटानंतर या गोष्टींना कलाटणी मिळाली. या चित्रपटात एका ठिकाणी दिग्दर्शकाला क्लायमॅक्स बदलायचा होता कारण त्यांच्या मते माफी मागणाऱ्या पतीला पत्नीने नकार दर्शवणे, हे भारतीय लोकांना रुचणारे नव्हते. हा चित्रपट फक्त चाललाच नाही तर वैवाहीक प्रश्न सोडवण्यासाठी प्रय़त्नशील असलेल्या स्त्रियांच्या गर्दीत शबाना अडकून गेल्या. आज त्या Navara Haq या संस्थेच्या सदस्य असून, आजवर त्यांनी मुंबईतील ४० हजार लोकांचे पुनर्वसन केले आहे.

'झोपडपट्ट्या तयार व्हायचे कारण लोकांना माहित नाही. त्यांना फक्त एवढेच माहित आहे की, झोपडपट्टी तसेच वस्त्यांमुळे घाण पसरते. जर तुम्ही झोपडपट्ट्या नष्ट केल्या तर तेथील लोक दुसऱ्या ठिकाणी जातील. झोपडपट्टीत राहणारे लोकच शहरांना सेवा पुरवत असतात, ही गोष्ट शहरांनी समजून घ्यायला हवी.', असे त्या सांगतात.

त्यांच्या संपूर्ण संभाषणात त्यांनी काही अनमोल विचार मांडले

अभिनेते हे अत्यंत संवेदनशील मनाचे असतात. तुम्हाला अभिनय क्षेत्रात यायचे असेल, तर तुम्हाला अभिनयाचे वेड असावे लागते.

दया, सहानुभूती असणे म्हणजे बहादूरपणा.

विविधतेत सुंदरता आहे.

(शबाना आझमी हैद्राबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या कॉनफ्लूएन्समध्ये बोलत होत्या. कॉनफ्लूएन्स हे एक वार्षिक चर्चासत्र असून, त्यात विविध विषयांवरील कल्पनांना प्रोत्साहन दिले जाते.)

यासारख्या आणखी काही कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

रोनी स्क्रुवाला : शिक्का मारून घेणं भावलंच नाही!

नटसम्राट हे प्रत्येक कलावंताचे वास्तव - नाना पाटेकर

मी लिहिलेल्या कथा जगण्याची हिंमत माझ्यात नव्हती - कल्की कोचलिन

लेखक - प्रतिक्षा नायक

अनुवाद – रंजिता परब