भांडी घासण्याच्या स्क्रबने ज्वेलरी तयार करून जगभर चर्चेत आहे आंचल!

0

कचरा समजल्या जाणा-या वस्तूंपासून आंचल यांनी गळ्यातील हार आणि कानातील आभूषणे तयार केली आहेत. काहीतरी वेगळे करण्याच्या छंदातून आंचल यांनी दागिन्यांना नवे रूप दिले आहे. त्यांच्या या कलाकृतीवर न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये सारे फिदा झाले. आंचल सुखीदा यांच्या या ज्वेलरी म्हणजे काही हिरे–मोती नाहीत की सोने –चांदी नाहीत. उलट या दागिन्यांच्या निर्मितीसाठी जे साहित्य वापरण्यात आले आहे ते आपण कचरा म्हणून टाकून देतो.


आपल्या जीवनाला रंगमंच समजणा-या आंचल म्हणतात की, “ प्रत्येक जण आपल्या जीवनाचा अभिनेता आहे, कारण जगताना प्रत्येकाला अनेक भुमिका साकाराव्या लागतात.”

आपल्या रोजच्या जीवनात कचरा हा अविभाज्य घटक असतो, प्रत्येक गोष्टीतून आपण रोज काहीना काही टाकाऊ म्हणून बाजूला करत असतो. जसे पूजा करताना धूप लावतो त्यावेळी रिकामा खोका, माचीसचा डब्बा, शाई संपल्यानतर पेनची रिफील, स्वयंपाक घरात जुनी खराब झालेली भांडी, असे बरेच काही. हा कचरा एकतर आपण फेकून देतो किंवा भंगारवाल्याला विकतो. नाहीतर आपल्या घरात किंवा छतावर अनावश्यक वस्तू  साठवून घाणीत भर घालत राहतो. हा कचरा आपण पूर्णत: बिनकामाचा समजत असतो. पण विचार करून पहा त्यातूनच कुणाला तरी छान दागिने करण्याची कल्पना सूचते. ते सुध्दा इतकी आकर्षक की, न्यूयॉर्क फॅशन विक सारख्या जागतिक किर्तीच्या इवेंटमध्ये मोठ मोठ्या मॉडेल्स ते घालून मिरवताना दिसाव्यात! वाचताना हे सारे बालिशपणाचे वाटले ना? पण हेच सत्य आहे.

ही कहाणी आहे दिल्लीच्या आंचल सुखीजा यांची. काहीतरी वेगळे करावे या ओढीने त्यांनी दागिन्यांना वेगळा लूक दिला, मात्र त्यात काही हिरे-मोती सोने चांदी लावले नाही. तर त्यात लावले भांडी घासण्याचे जुने स्क्रब, एसी यंत्राचा जूना फिल्टर, इलेक्ट्रीक फिटींगचा शिल्लक राहिलेला पाईप, माचिस बॉक्स अशा वस्तू ज्या टाकाऊ होत्या मात्र त्यांना वाया जावू दिले नाही. या कचरा वाटणा-या वस्तू आता इतक्या हव्याश्या झाल्या की, त्या गळ्यात घालून मिरवता याव्यात.


आंचल यांच्या डिझायनर मैत्रीण वैशाली एस यांनी ज्यावेळी ही स्टिलच्या टाकाऊ भागापासून तयार केलेल्या दागिन्यांची कल्पना पाहिली, तेंव्हा त्यांना ती भावली. मग काय त्यानी त्यांचे कल्पना शक्तीचे वलय वापरून त्याला अधिक आकर्षक करण्याचा आणि न्यूयॉर्क फॅशन विक मध्ये चाचपणीसाठी नेण्याचा सल्ला दिला.

आंचल यांच्या मते, “ मलाच विश्वास बसत नव्हता, फॅशनच्या इतक्या मोठ्या मंचावर मला या दागिन्यांमुळे गौरविले जाईल. आपण सौंदर्य आणि आकर्षण यांचे चाहते असतो. आपण विचार करतो की छान दिसायचे तर हिरे, प्लॅटिनम, जोवर परिधान करत नाही तोवर कुणी रॅम्पवर आम्हाला पाहणार नाही. असाच विचार आपण कपड्यांबाबतही करत असतो. मात्र गोष्ट केवळ स्वत:वरील विश्वास आणि चांगले विचार करत मोठी स्वप्न पाहण्याची असते.”

मोठी स्वप्ने पहा आणि पूर्ण करा.

आंचल सांगतात की, जोवर आम्ही मोठी स्वप्ने पहात नाही, तोवर जीवनाची सुरूवात होत नाही. स्वप्ने पाहणे खूप गरजेचे आहे. ती पूर्ण होतील की नाही हे नंतरचे झाले पण त्यांच्या मागे लागले पाहिजे. मला यावर अजिबात वैशम्य वाटले नाही की स्क्रब सारख्या वस्तूपासून सूंदर ज्वेलरी तयार केली तर लोक ती घेतील की नाही. केवळ जुन्या वस्तूंच्याच नाही माझ्या प्रत्येक कामात माझा हाच दृष्टीकोन असतो. माझ्यासाठी ते आव्हान असते की यातून मी असे काय तयार करू शकते जे लोकांना पहावेच लागेल. सोन्या चांदी पासून दागिने तयार करणे सोपे असेल, पण आव्हान तर तेच असते जे कच-यातून दागिने तयार करू शकतात. तोच कचरा ज्याला तुम्ही फेकून देण्याचा विचार करता, कारण त्याने पर्यावरणाची हानी होते, तोच तुम्हाला आकर्षक दिसू लागतो!”

आपले जीवन एका रंगमंचासारखे असते असे मान णा-या आंचल म्हणतात की, “ प्रत्येकाला जीवनात अभिनय करून वेगवेगळ्या भूमिका कराव्याच लागतात.”