केरळातील या सरकारी कारकूनाला भेटा, ज्यांनी पोलिओवर मात करत भ्रष्टाचाराविरूध्द लढा दिला

0

अंगदीपूरम् हे केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यातील छोटेसे गाव आहे. या गावातील पंचायत कार्यालय या जिल्ह्यात सर्वात मोठे समजले जाणारे ग्रामपंचायत कार्यालय आहे. याचे कारण येथे एका कारकूनाची, (लिपीकाची) नियुक्ती करण्यात आली आहे, जे तेथे येणा-या लोकांशी मित्रत्वाने वागतात जे त्यांच्या कार्यालयात भेट देतात. त्यांच्या कडे लोकांच्या कामाला प्रतिसाद देण्याची जबरदस्त हातोटी आहे आणि लोकांना ते त्यांचे काम झाल्यावर त्यांचा अनुभव कसा होता हे देखील आवर्जून विचारतात.

.

४२ वर्षीय अब्दुल सलीम पल्लीयाल थोडी, जे गेल्या तीन वर्षांपासून या पंचायतीमध्ये काम करतात, कधीच लोकांच्या सेवेत खुलेपणाने सहभागी होण्यास कचरले नाहीत. त्यांच्या टेबलावर सूचना देण्यात आली आहे की ते लाचखोरी आणि भ्रष्टाचार यांना विरोध करतात, आणि त्यांच्या वेतनाचा उल्लेख करतात, जो त्यांना नोकरी मिळाल्या पासून सातत्याने वाढत राहिला आहे.

मल्याळम भाषेतल्या या चिठ्ठीवर लिहीले आहे की,

‘सरकार मला दिवसाला ८११ रूपये देते, ( रू २४,३४० महिन्याला) आपली सेवा करण्यासाठीच, जर आपणांस माझ्या सेवेने समाधान मिळाले नाही तर कृपया मला तसे सांगा.’

या पंचायतीमध्ये १७ जण काम करतात,आणि ते बोलून याची खात्री करून घेतात की भेटीसाठी येणारे कुणी काम न होताच परत जात नाही ना. त्यांचा कामाचा भाग नसलेल्या अनेक गोष्टीत ते उत्साहाने सहभागी होतात, जसे की लोकांच्या कागदपत्राबाबत असलेल्या समस्या सोडविणे. याबाबत बोलताना ते म्हणतात की, “ सेवा हा कोणत्याही सरकारी कामाचा गाभा आहे. लोक वेगवेगळ्या गोष्टीसाठी आमच्याकडे येत असतात, त्यांना विन्मुख परतावे लागू नये. ते जाताना समाधानी होवून जावेत.”

सलीम यांना पोलीओमुळे ४० टक्के अपंगत्व आले आहे, पण तरीही ते त्यांच्या कर्तव्याच्या आड ते कधी येवू देत नाहीत. ते कधी कुणाला त्यांची मदत करा म्हणून सांगत नाहीत. त्यांच्या कामातील वरीष्ठ, आय पी पिथ्थांबरन म्हणाले की, त्यांच्या आदर्श वागणूकीमुळे लोकांना विश्वास वाटतो की, त्यांना त्यांचे हक्क मिळतील.

या बाबतच्या माहिती नुसार,

सुमारे दोन दशकांपूर्वी, भारतात जगातील निम्म्या पोलीओ रूग्णांची संख्या होती. आजमितीस भारतात गेल्या चार वर्षांपासून नव्याने पोलिओचा कुणी रूग्ण सापडल्याची नोंद करण्यात आली नाही. मागील वर्षी मार्च महिन्यात, भारताला पोलिओ मुक्त देश म्हणून जाहीर करण्यात आले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून २३ लाख स्वयंसेवकांच्या मदतीने ज्यांनी उभे-आडवे सारीकडे जावून देशभरात सर्वत्र पोलिओची लस पोहोचविली आणि लहान मुलांना दिली. भारताने त्यामुळे मानवी जीवनातील इतिहासातील एका मोठ्या सामाजिक समस्येवर मात केली आहे.