“ सोलर दीदी”ची कहाणी वाचा, तुमचा विश्वास बसेल की, खरचं महिला काहीही करू शकतात!”

0

जगात कठीण परिस्थितीतून जाणा-या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक असे लोकही असतात, ज्यांना दोन वेळचे जेवण देखील मिळत नाही. अशातच काही लोक आपले पाऊल पुढे वाढवितात, स्वतःला तयार करतात आणि आयुष्य चांगले करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचे पाणी करतात. म्हणूनच म्हणतात की, यश त्यांच्याच हाती असते जे, पाण्यात रेघ ओढण्याची क्षमता ठेवतात. कानपूरच्या जवळ एका गावात एका विधवेने असेच काहीतरी ‘करून दाखविले’ आहे. ‘गुडिया’ त्यांचे नाव आहे. त्यांचे नाव गुडियाच होते, त्यांच्या आई-वडिलांनी लहानपणी खूप प्रेमाने त्यांचे नाव ठेवले होते. मात्र आज कानपूरच्या गावांमध्ये याच गुडिया गावातल्या लोकांसाठी ‘सोलरदीदी’ बनल्या आहेत. ऐकायला खूप विचित्र वाटत असेल ना? पण हे खरे आहे, ‘सोलरदीदी’ बनण्यासाठी गुडिया यांनी खूप संघर्ष केला. संघर्ष त्या क्षेत्रात ज्यात नेहमीपासूनच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. ‘सोलरदीदी’ यांनी आपल्या ख-या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर सोलर मेकँनिक म्हणून पद मिळविले.

आता तुम्हाला ‘सोलरदीदी’ यांची खरी ओळख करून देणार आहोत. आजच्या ‘सोलरदीदी’ म्हणजेच कालच्या ‘गुडिया राठौड’ कानपूरच्या विधाणु भागातील हडहा गावात राहायच्या. त्यांचा फतेहपुर मध्ये विवाह झाला. विवाहानंतर परिस्थिती खूप चांगली होती, असे म्हटले जाऊ शकत नाही. असे म्हणतात की, समस्या अनेकदा एकत्रितपणाने प्रत्येक बाजूने येतात. आजपासून चारवर्षापूर्वी त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्युनंतर आपल्या दोन्ही मुलांसोबत गुडिया यांचे सासरी राहणे दिवसेंदिवस कठीणच होत होते. त्या दरम्यान गुडिया यांनी निर्णय घेतला की, त्या आपल्या मुलांचे चांगले पालनपोषण सासरी राहून करू शकणार नाहीत. अशातच एकच उपाय होता तो म्हणजे माहेरचा. गुडिया आपल्या मुलांना घेऊन माहेरी आल्या. माहेरी येऊन त्यांनी अजून एक निर्णय घेतला. हा निर्णय आत्मनिर्भर होण्याचा होता. मुलांच्या चांगल्या पालनपोषणासाठी गुडिया यांनी घरातून बाहेर पाऊल ठेवले आणि सामाजिक संस्था ‘श्रमिक भारती’ सोबत वाटचाल सुरु केली. ही संस्था केंद्र सरकारच्या टेरी योजनेअंतर्गत गावात सोलर लाइटचा कार्यक्रम चालवत होती.

‘युअर स्टोरी’ला गुडिया यांनी आपल्या सुरुवातीच्या दिवसांबद्धल देखील सांगितले. “ मी सर्वप्रथम श्रमिक भारती संस्थेत सामील झाले, मोफत सोलर लाइट लावण्याच्या कार्यक्रमात सामील झाल्या. आज मी सोलर लाइटशी संबंधित प्रत्येक काम करून घेते, मला वाटत होते, असे काय आहे? हे काम पुरुष करत होते. आता या कामात महिला देखील पुरुषांपेक्षा कमी नाहीत. मी असा विचार केला की, असे काय आहे जे काम पुरुष करू शकतात. मी फक्त अशातच सोलर लाइटचा कार्यक्रम सुरु केला.”

गुडिया यांनी गावागावात जाऊन हीच सोलर लाइट, सोलर शेगडी, सोलर पंखे लावण्याचे काम सुरु केले. चार वर्षापासून सलग जिद्दीचा आणि मेहनतीचा हा परिणाम आहे की, गावातल्या लोकांनी गुडिया यांना ‘सोलरदीदी’ या नावाने संबोधण्यास सुरु केले. गुडिया सांगतात की, “पहिले जेव्हा जेव्हा लोक मला ‘सोलरदीदी’ म्हणायचे, तेव्हा खूप विचित्र वाटायचे. मात्र हळू हळू हे नाव मला चांगले वाटायला लागले.”

‘सोलरदीदी’ मन लावून कामच करत नाहीत तर, काम देखील खूप चांगल्या प्रकारे करतात. हेच कारण आहे की, आज विधानु भागातील गाव बनपुरा, कठारा, उजियारा,तिवारीपूर यांसारख्या गावात सोलर मँकेनिकमध्ये केवळ ‘सोलरदीदी’ यांचे नाव चालते.

गावातल्या राहणा-या भारती यांचे म्हणणे आहे की, “गावात सोलर लाइट खराब झाली, पंखा खराब झाला, काहीही झाले तरी आम्ही ‘सोलरदीदी’ यांना फोन लावतो, ‘सोलरदीदी’ आपल्या बैगेत पेंच कस, प्लास आणि सोलर उपकरणासह आपल्या स्कूटीवरून पळत येतात.”

असे म्हणतात की, काळ प्रत्येकाला संधी देतो, नवा रस्ता दाखवतो. जर समोरचा त्या संकेताला समजू शकला, तर त्यांची परिस्थिती बदलणे निश्चित आहे. आपल्या जुन्या समस्यांना नवी दिशा दिली आणि त्याला सकारात्मक बनविले. या रस्त्यावर मेहनत तर आहे, परंतु आत्मनिर्भर बनण्याची एक शांतता देखील आहे. हीच शांतता ‘सोलरदीदी’ यांना आहे. त्या सांगतात की, “एका क्षणी मला असे वाटले की, आयुष्यात आता काय होईल. मात्र प्रत्येक समस्येतून बाहेर निघण्याचा रस्ता असतो. फक्त हेच गरजेचे आहे की, त्यातून बाहेर पडणे आले पाहिजे. मी जे करत आहे, त्यातून मला शांतता मिळते.”

गावात राहणा-या कल्लू यांचे म्हणणे आहे की,

“ ‘सोलरदीदी’ यांना आम्ही गावातले जेव्हा पण फोन करतो, त्या त्वरित आपली बॅग घेऊन येतात”.

स्वतःच्या बळावर एकट्या महिलेचे याप्रकारच्या सगळ्या गावांसाठी काम करणे एखादा पर्वत चढण्यापेक्षा कमी नाही. शहरात अनेक सुविधा असतात, परंतु एखादी महिला प्रत्येकाच्या घरी जाऊन लाइट किंवा सोलरशी संबंधित कुठल्याही समस्या दूर करत असेल, तर अशी सुविधा कुठेही नसेल. गुडिया उर्फ ‘सोलरदीदी’ यांच्या हिमतीची केवळ प्रशंसाच करून चालणार नाही, त्या प्रेरणादायक देखील आहेत. ‘युअर स्टोरी’ ‘सोलरदीदी’ यांची मेहनत आणि जिद्दीला सलाम करते.

लेखक : विजय प्रताप सिंह

अनुवाद : किशोर आपटे.