साहसी क्रीडाप्रेमी मिनिटभरात नोंदणी करा आपली सहल!, xoonture.com सोबत!

0

जर आपणास साहस करण्याचे वेड असेल, आणि कुठेतरी फिरायला जायचे असेल पण तुम्हाला माहिती नाही की यासाठी कोणता टूर् ऑपरेटर तुम्हाला मदत करु शकेल? तर त्रासून जाऊ नका घरबसल्या तुमची समस्या सुटू शकेल! झूनचर डॉट कॉम कडून. आक्टोबर २०१४ला सुरू झालेल्या या संकेतस्थळावरुन तुम्हाला केवळ योग्य टूर ऑपरेटरच नव्हे तर साहसी पर्यटनाचे अनेक पर्याय तुमच्यासारख्या साहसप्रेमींसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

पुण्यात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या सुनीलसिंह चौहान यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे. त्यांनी सुमारे सात-आठ वर्ष वेगवेगळ्या बांधकाम कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून काम केले. त्यानंतर सन२०१३ मध्ये ते डेहराडून येथे आले आणि नव्याने आपले आयुष्य सुरू केले. पण आता त्यांना हवे होते की, आपला स्वत:चा काहीतरी उद्योग सुरू करावा, पण तो कोणता आणि कसा हे मात्र त्यांना माहित नव्हते. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की असे काही साहसी खेळांचे ऑपरेटर आहेत ज्यांच्याकडे जास्त लोक येत नाहीत, आणि याचे कारण म्हणजे असा कोणताही आधार नाही जेथे पर्यटकांना सा-या साहसी सहलींची माहिती एकाचवेळी मिळू शकेल. इतकेच नाही तर छोटे सहल आयोजक कोणत्याही सहलीचे जितके आवश्यक पर्यटक लागतात तेवढे देखील मिळवू शकत नव्हते. अशावेळी त्यांना मोठ्या आयोजकांवर अवलंबून राहावे लागत असे. त्याबदल्यात त्यांना नफ्याचा मोठा भाग मोठ्या आयोजकांना द्यावा लागत होता. इतकेच नाहीतर छोटे आयोजक विखूरले होते आणि त्यांच्याकडे असे कोणतेच साधन नव्हते जेथे सहलीसाठी आवश्यक माहिती एकमेकांकडून घेता येईल. तसेच पर्यटक सरळ या आयोजकांना संपर्क करून आपली सहल नोंदवू शकत होते.

सुनील यांनी पाहिले की ही अडचण केवळ सहल आयोजकांना नाही तर बहुतांश पर्यटकांना देखील साहसी पर्यटनासाठी मोठ्या आयोजकांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे अनेक पर्यटकांना हे माहिती नव्हते की कोणता आयोजक कोणत्या प्रकारच्या सहलींचे आयोजन करतो. पर्यटकांना योग्य आयोजक मिळवण्यातही अनेक अडचणी होत्या. सुनील यांचे म्हणणे आहे की, “मी निर्णय घेतला की एक असे व्यासपीठ असले पाहिजे जेथे कोणाही आयोजकाला त्याच्या सहलींची माहिती देता येईल, दुसरीकडे इच्छूक पर्यटकांनाही एकाच ठिकाणी ही माहिती मिळायला हवी. त्याशिवाय त्यांना त्यांचे अनुभवही सांगता यायला हवे.”

सुनील यांना संकेतस्थळ बनविण्याची आवड महाविद्यालयीन दिवसांपासून होती. त्यांचा हा छंद याठिकाणी उपयोगी पडला, आणि स्वत:चे संकेतस्थळ तयार करण्यात ते गुंतले. त्यांच्या या कामात त्यांची पत्नी आणि मित्रांनी मदत केली. शेवटी तिघांच्या श्रमांचे फळ मिळाले आणि आक्टोबर २०१४मध्ये ‘ xoonture.com ’ची सुरुवात झाली. सुरुवातीला त्यांनी सुमारे चाळीस टूर ऑपरेटरांना जोडले. त्यानंतर अनेक आयोजक जुळत गेले. आज त्यांच्या संकेतस्थळावर ८०पेक्षा जास्त आयोजक आहेत जे अनेक प्रकारची आयोजने करतात. जसे ट्रेकिंग, एक्सपीडिशन, स्कुबा डायवींग, बलूनिंग, पँराग्लायडिंग, स्किईंग, राफ्टिंग, जंगल सफारी इत्यादी. याशिवाय त्यांच्या संकेतस्थळावर कुणा आयोजकाने काही खास आयोजन केले असेल तर त्याचीही माहिती दिली जाते.

देशात साहसी खेळांची मोठी बाजारपेठ आहे. एका अंदाजानुसार दरवर्षी त्यात १५-२० टक्क्याने वाढ होत आहे. कारण येथे पाच-सात वर्षांपूर्वीपर्यंत लोकांचा कल साहसी क्रीडाप्रकारांकडे जास्त नव्हता तेथेच आता तरुणांना यात रुची निर्माण झाली आहे. त्यांना वाटते की विकेंडला काहीतरी वेगळे करावे. त्यामुळे साहसी खेळ लोकांचे आकर्षण ठरले आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन सुनील म्हणतात की, ते त्यांच्या कार्यप्रणाली गुगलमँप आणि इतर ब-याच गोष्टी देऊ इच्छितात. जेणेकरून लोकांना पूर्वीच्या तुलनेत अधिक चांगली माहिती आणि सेवा मिळू शकेल. या शिवाय त्यांचा प्रयत्न आहे की येणा-या काळात आपल्या संकेतस्थळावरून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध व्हावी. याशिवाय एक्सपीडिशनशी संबंधित ऍप देखील त्यांना बाजारात आणायचा आहे.

सुनील यांचे म्हणणे आहे की, “ आमचे लक्ष्य सारे विश्व आहे, त्यामुळे आम्ही अशी पध्दत वापरली की जगभरातील लोक ती वापरू शकतील. हेच कारण आहे की, देशातील कित्येक आयोजक आमच्याशी जुळले आहेतच त्याशिवाय बोस्निया, सर्बीया आणि इतर देशातील सहल आयोजकही आमच्या संकेतस्थळाची मदत घेत आहेत.” ‘ xoonture.com ’ ला अश्या प्रकारे तयार करण्यात आले आहे की, ज्यावर पर्यटक आणि सहल आयोजक दोघांना वापर करता येईल आणि मनासारखे आयोजन पार पाडता येईल. त्यांच्यामते जेंव्हा कुणी पर्यटक एखाद्या खास साहसी पर्यटनाला जाऊ इच्छितो तेंव्हा त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन वेगवेगळ्या आयकॉन मधील कोणत्याही एकावर क्लिक करून वेगवेगळ्या आयोजकांची माहिती मिळवतो. याशिवाय कुणा पर्यटकांना खास ठिकाणी जायचे असेल तर त्याच्यासाठी ही अनेक प्रकारची माहिती पर्यायांच्या बाबत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अशा प्रकारे पर्यटकांना सारी माहिती एकाच ठिकाणी मिळते आणि ते आयोजकांना ई-मेल करून अधिक माहितीही घेऊ शकतात. इतकेच नाही पर्यटकांना बक्षीस जिंकण्याची संधी देखील संकेतस्थळावरून मिळते, जे चांगले छायाचित्रकार असतील त्यांनी काढलेली छायाचित्र संकेतस्थळावर प्रदर्शित केली जातात.

सध्या सुनील आणि सहकारी डेहराडून येथून आपले काम करत आहेत. पण त्यांचे म्हणणे आहे की, तेथून संकेतस्थळ चालवण्यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे त्यांचे नियोजन आहे की दिल्लीच्या एनसीआर मध्ये आपले कार्यालय सुरू करावे. तर दुसरीकडे गुंतवणूकीबाबत सुनील यांचे म्हणणे आहे की, ते येत्या वर्षभरात याबाबत विचार करतील. आपल्या भविष्याच्या योजनांबाबत ते सांगतात की, “ देशात साहसी आयोजकांचा कोणताही मध्यवर्ती माहितीसंग्रह नाही, ज्यातून हे समजू शकेल की एखाद्या आयोजकाच्या खास आयोजनात किती नोंदणी झाली आहे. त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की भविष्यात आम्ही आयोजकांना असा मध्यवर्ती माहितीचा ‘डाटाबेस’ मिळवून देऊ. जेणेकरून इतर संकेतस्थळांनाही माहितीसाठी आमच्याकडे यावे लागेल.”

वेबसाईट: www.xoonture.com


working as accridated jurno from last15yrs.at mumbai mantrly political beat. working for documentry films making, scriptting, tv shows &print media .intersted in social issues.

Related Stories

Stories by kishor apte