अधू दृष्टी असूनही टेनिसमध्ये अव्वल क्रमांक पटकावणारी मल्लिका मराठे

1

मल्लिका मराठे, ही चार वर्षापासून अशंत: दृष्टीहिन आहे, जेव्हा ती लहान होती. आता ती अखिल भारतीय टेनिस संस्थेच्या मुलींच्या गटातील मानांकनात अव्वल टेनिस खेळाडू म्हणून चमकली आहे. कुठल्याही सामान्य मुलीसारखेच तिचे बालपण गेले जोवर तिला ‘ऍमब्लीओपीया’ अर्थात मंद दृष्टी या विकाराने गाठले नव्हते. या रोगात रूग्णाच्या दृष्टीवर परिणाम होतो, तिच्या डाव्या डोळ्याची दृष्टी मंद होत गेली. तिला तिचे डोळे झाकून ठेवावे लागले, तेव्हा ती फक्त चार वर्षाची होती. चिकित्सा आणि उपचार घेवूनही तिची दृष्टी अधूच राहिली.


Image: (L) – The Frustrated Indian; (R) – Sakal Times
Image: (L) – The Frustrated Indian; (R) – Sakal Times

मल्लीका हिच्यासाठी हे सोपे नव्हते. मात्र ही गोष्ट या लहानगीच्या मनात पक्की होती की, तिच्या आवडीच्या क्षेत्रात काम करायचे आणि जगातील अव्वल दर्जाचे टेनिस पटू व्हायचेच. स्वयंस्फूर्त आणि स्वयंप्रेरित त्यामुळे तिचे वय कमी असतानाच ती प्रशिक्षणासाठी गेली.  

२०१७ मध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटात अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या मानांकनात (एआयटिए) ती पहिली आली. क्रीडा क्षेत्रात येणा-या महिलांना अनेक अडसर पार करून जायचे असतात या शिवाय सामाजिक कुप्रथांशी सातत्याने लढा द्यावा लागतो. मग त्यानी शॉर्टस घालाव्या किंवा नाही अथवा त्यांच्या प्रशिक्षणावर पैसा खर्च करावा किंवा नाही, समाजात मुलींना या अशा वातावरणात जगणे फार सोपे नसते, त्यामुळे त्यांच्यावर कायम जबाबदारी आणि मानसिक ओझे लादले जाते. भारतासारख्या देशात, मुलींवर खर्च करावा म्हणून पालकांची मनधरणी करावी लागते, ही केवळ कठीण गोष्ट नाही, तर माध्यमातील माहितीनुसार भारतीय सरकारचा दृष्टीकोन देखील क्रिकेट वगळता अन्य खेळात उदासिनता आणि नैराश्यपूर्ण राहिला आहे. महिलांच्या बाबतीत क्रीडा विभागाचा दृष्टीकोन तर फारच नकारात्मक आहे.

आपण सा-यांना दिपा कर्माकर यांची कहाणी माहिती असेल, त्यांना जवळपास ऑलीम्पिक पासून वंचित व्हावे लागणार होते, कारण त्यांच्या जवळ निधीची कमतरता होती. अशा स्थितीत मल्लिका यांच्यासारख्या मुली सातत्याने आशेच किरण बनून येत असतात ज्यामुळे इतरांना प्रेरणा मिळत राहते. (थिंक चेंज इंडिया)