गॅरेजच्या अंधारात चमकला वेब डिजायनिंगचा तारा

0

आयुष्यात काही तरी करण्याची तीव्र इच्छा असली तर अर्धी मजल आधीच मारता येते. मुंबईच्या फराज नक्वीचं ही असंच आहे. स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा त्याचा मानस अगदी आधीपासूनचा. वेब डिजायनिंगच्या व्यवसायात येण्यापुर्वी त्यानं दोन कंपनीत काम केलं. या व्यवसायातल्या बारकाव्याचं निरिक्षण केलं आणि जेव्हा स्वत:ची कंपनी सुरु करायचा निर्णय पक्का झाला तेव्हा नोकरी सोडली. तो राहत असलेल्या इमारतीच्या गॅरेजमधूनच त्याचं काम सुरु झालं. क्लायंट शोधण्याचं काम सुरु झालं. त्यासाठी खुप धावपळ करावी लागत होती. या व्यवसायात स्पर्धा खूप जास्त होती. हे त्याला आधीपासूनच माहित होतं. पण फराजला स्वत:वर विश्वास होता. पहिलं काम मिळालं. एका दुपारी आणि रात्र भरात काम करुन हवं होतं. हातात फक्त काही तास होते. रात्रभर जागून अखेर ती वेबसाईट डिजाईन केली आणि फिराजच्या यादीत मध्ये पहिला क्लायंट आला. फिराज म्हणतो हे पहिलं कामच महत्वाचं होतं. त्यानं आम्हाला आत्मविश्वास दिला. चांगलं काम कमी कालावधीतही करु शकू याचा विश्वास आम्हाला या पहिल्या कामानं दिला. फक्त एक लॅपटॉप आणि दोन खुर्च्यांपासून आमच्या कंपनीची सुरुवात झाली. कंपनीचं आम्ही नाव ठेवलं 'हेप्टा'.

आज फराजच्या हेप्टा कंपनीला तीन वर्ष पूर्ण होतायत. अनेक प्रतिष्ठीत कंपन्यांना तो आपली सेवा पुरवतोय. वर्षाला २५ ते ३० प्रोजेक्ट हेप्टाकडे येतात हे विशेष. आता वर्षांला शंभर प्रोजेक्ट इतकं हेप्टाचं टार्गेट आहे. मागच्या वर्षभरात त्यांनी ५० वेबसाईट डिजाईन केल्यात. शिवाय ५ मोबाईल एॅप ही हेप्टानं तयार केलेत. फराज सांगतो, आज आमच्या कंपनीला जी काही मागणी आलीय ती आमच्या कामामुळे. चोख आणि अगदी वेळेत काम हे आमच्या कंपनीची वैशिष्ठ्ये आहेत. यामुळेच एकदा आमच्याकडे आलेला ग्राहक सहसा दुसऱ्या कंपनीकडे जात नाही. कारण त्याला आमच्याकडून क्वालिटी काम मिळतं. मला वाटतं ग्राहकांना तेच गरजेचं असतं. यामुळेच गेल्या काही वर्षांत हेप्टाकडे येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये वाढच होतेय.

अगदी दोन जणांपासून या कंपनीची सुरुवात झाली होती. आता या कंपनीत वेब डिजायनिंग आपली वेगवेगळी स्पेशालिटी असलेले १२ जण राबतायत. फराज बरोबर अगदी सुरुवातीपासून काम करणारी मेधा सांगते, वेब डिजायनिंग हे क्षेत्र वाढतंय. त्यानुसार त्यातली स्पर्धा ही वाढतेय. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी क्लालिटी कामाशिवाय पर्याय नाही. यामुळेच क्लायंट आपल्याकडे आणखी जास्त कामाची अपेक्षा करतात. त्यांनाही माहितेय एकदा का हेप्टाकडे एखादा प्रोजेक्ट दिला तर त्यांना चिंता करण्याची गरज नाही. हेप्टाचा चढता आलेख असाच ठेवण्यासाठी आम्ही सर्व जण नेहमीच प्रयत्न करत राहू आणि आम्हाला यात नक्कीच यश मिळेल यात शंका नाही.