मोदी सरकारचे मेक इन इंडिया नंतर ‘कॅशलेस इंडिया’ सुरू!  जाणून घ्या १० कॅशलेस देश!

1

मोदी सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचा प्रवास कॅशलेस इंडियाच्या दिशेने सुरु झाला आहे, त्याबाबत जागतिक स्तरावर काय स्थिती अहे जाणून घेवूया!

नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात कॅशलेस व्यवहारांची चर्चा सुरू झालीय. पण जगभरातल्या सर्व प्रगत देशांमध्ये कॅशलेस म्हणजेच रोखीनं व्यवहार टाळला जातो. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसतो, खर्च वाचतो आणि व्यवहारात पारदर्शकताही राहते. बघुया जगभरातले कॅशलेस व्यवहार करणारे १० देश…

१० कॅशलेस देश!

बेल्जियम

-९३ टक्के व्यवहार कॅशलेस
- ८६ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- कॅश पेमेंटची मर्यादा फक्त ३ हजार युरो

फ्रान्स

- ९२ टक्के व्यवहार कॅशलेस
- ६९ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- कॅश पेमेंटची मर्यादा अंदाजे ३ हजार युरो (२२ हजार रु.)

कॅनडा

- ९० टक्के व्यवहार कॅशलेस
- ८८ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- २०१३ नंतर नोटा आणि नाणी तयार करण्यात आल्या नाहीत

ब्रिटन

- ८८ टक्के व्यवहार कॅशलेस
- ८९ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- सर्व व्यवहार कॅशलेस करण्याकडे वाटचाल

स्वीडन

- ८९ टक्के व्यवहार कॅशलेस
- ९६ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- चलनात सर्वाधिक कमी रोकड आणि नाणी असलेला देश

ऑस्ट्रेलिया

- ८६ टक्के व्यवहार कॅशलेस
- ७९ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- काही वर्षांमध्ये सर्वच व्यवहार कॅशलेस

नेदरलँड

- ८५ टक्के व्यवहार कॅशलेस
- ९८ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- पार्किंग ते हॉस्पिटल सर्वच व्यवहार कॅशलेस

अमेरिका

- ८० टक्के व्यवहार कॅशलेस
- ७२ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- सर्व मोठे व्यवहार कॅशलेस करण्याकडे कल

जर्मनी

- ७६ टक्के व्यवहार कॅशलेस
- ८८ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- मोबाईल व्हॅलेट आणि डेबिट कार्डचा वापर वाढतोय

दक्षिण कोरिया

- ७० टक्के व्यवहार कॅशलेस
- ५८ टक्के लोकांकडे डेबिट कार्ड
- कॅशलेस पेमेंटसाठी सरकारचं प्रोत्साहन

ह्या देशांची नावे आणि प्रगती सर्वांना माहीत आहेच त्यामुळं मोदींचा निर्णय किती योग्य आहे हे तुम्हाला आता नक्कीच पटेल..तुम्हीही तुमचे अधिकाधिक व्यवहार *cahsless* करा आणि भारताला देखील टॉप १० मध्ये आणायला मदत करा.