महिला सशक्तीकरणाचे दमदार उदाहरण म्हणजे उत्तरप्रदेशातील उन्नाव जिल्हा 

0


पुरुषप्रधान समाजात स्त्रियांना अपेक्षित सन्मान जरा उशीराच मिळाला ज्यावर त्यांचा प्राथमिक हक्क होता. त्यांचा जागतिक पातळीवर कुठेतरी उल्लेख झाला की समाधान वाटते. पण आता वेळ आली आहे जेव्हा फक्त महिला दिन साजरा करून देखावा करण्यापेक्षा त्याला साजेशी अशी कृती करून बदलावाच्या हवेला निश्चित दिशा देण्याची. अनेकवेळा सरकारने उचललेले पाऊल हे समाजासाठी देखावा ठरतात किंवा त्याच्या दूरगामी परिणामांचा अंदाज फोल ठरतो. महिला अधिकाऱ्यांच्या प्रती सरकारची उदासीनता आपल्याला वारंवार अनुभवण्यास मिळते. पण आम्ही आपल्याला जी गोष्ट सांगू इच्छितो त्याने नक्कीच स्त्रियांना आपण स्त्री असण्याचा अभिमान वाटेल.

युपी मधील मागासलेला जिल्हा उन्नाव, आज भारतातील एक असा जिल्हा आहे जिथे सगळ्या प्रमुख प्रशासकीय पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. मग ते डीएम, एसएसपी, जिल्हा विकास अधिकारी, आरटीओ असो किंवा सीएमओ असो एवढेच नाहीतर नगरपालिकेच्या ईएमओ पासून सगळ्या पदांवर महिला अधिकारी नियुक्त आहेत. याशिवाय जिल्ह्यातील प्रथम नागरिक व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर एक महिलेची नियुक्ती झाली आहे व अभिमानाची गोष्ट म्हणजे या सगळ्या महिला आपापली जबाबदारी नीट पार पाडून तिला न्याय देत आहेत. देशाच्या विकासाला हातभार लावून ताल धरणाऱ्या या महिला कुणाची तरी आई, सून तर कुणाची मुलगी आहे. त्यांनी घरापासून ते कार्यालयापर्यंत आपल्या जबाबदारीचा इंद्रधनुष्य पेलला आहे. युपीचा हा जिल्हा उन्नाव देशाच्या नकाशावर आपल्या या विशेष बाबींमुळे चर्चेचा विषय बनला आहे की सरकारने प्रशासकीय कामाच्या प्रमुख पदांवर फक्त महिलांची नियुक्ती केली आहे.

सौम्या अग्रवाल, डीएम
सौम्या अग्रवाल, डीएम

सौम्या अग्रवाल

जिल्हा डीएम. सौम्या अग्रवाल २००८ च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत.


संदीप कौर, मुख्य विकास अधिकारी
संदीप कौर, मुख्य विकास अधिकारी

संदीप कौर, मुख्य विकास अधिकारी

तिथेच मुख्य विकास अधिकारी या पदावर आयएएस संदीप कौर यांना नियुक्त केले आहे.

आयपीएस नेहा पांडे
आयपीएस नेहा पांडे


जिल्ह्याच्या पोलीस  अधीक्षक आयपीएस नेहा पांडे यांनी नुकतेच आपले कार्यपद सांभाळले आहे व त्या जिल्ह्याच्या विकासापासून कायदा सुव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूवर काम करीत आहेत ज्यायोगे कायद्याचे राज्य सुनिश्चित करून उन्नावचे नाव कोणत्याही गुन्ह्यात गोवले जाणार नाही.

मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याच्या पदावर गीता यादव यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मतानुसार जिल्ह्यातील आरोग्यासंबंधीच्या अडचणींवर सर्व प्रकारचे निदान करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सहाय्यक परिवहन अधिकारी माला वाजपेयी आणि उपजिल्हाधिकारी जसप्रीत कौर जिल्ह्यातील विकासाच्या कामात खांद्याला खांदा लावून वाटचाल करीत आहेत. शिवाय जिल्ह्यातील प्रथम नागरिक जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता सेंगर व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरी मसूद समवेत उन्नाव नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी रोली गुप्ता जिल्ह्यातील विकासासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान देऊन महिला सशक्तीकरणाचा झेंडा फडकावीत आहेत. विशेष गोष्ट म्हणजे इतर पदांवर नियुक्त हसनगंज उपजिल्हाधिकारी अर्चना द्विवेदी समवेत बाजार समिती सचिव ज्योती चौधरी यांनी महिला सशक्तीकरणाचे उदाहरणच लोकांसमोर सादर केले आहे. या महिला अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या या पूर्ण टीमला काम करण्यास अधिक सुलभ होत आहे. लोकांनी मुलींना समान वागणूक देण्यासंदर्भात तसेच कन्या भ्रूण हत्या विरोधात त्यांनी जनतेला विरोध करण्यास सांगितले.

युअर स्टोरीशी चर्चेदरम्यान डीएम सौम्या अग्रवाल यांनी सांगितले, “ही आनंदाची गोष्ट आहे की उन्नाव जिल्ह्यात सर्व स्तरांवर महिला अधिकारी नियुक्त आहेत. यामुळे विकास कार्याला यश मिळत आहे. आमच्या समोर फक्त एकच आव्हान आहे की महिलांना काम करण्यासाठी पोषक वातावरण देण्याची गरज आहे कारण त्यांना कौटुंबिक जबाबदारी सुद्धा पार पाडायची असते.”

उपजिल्हाधिकारी जसप्रीत कौर यांनी युअर स्टोरीला सांगितले की, “हा एक महासंग्राम आहे की जिल्ह्यातील सगळ्या मोठ्या पदांवर महिला अधिकारी नियुक्त आहेत. आम्ही संदेश देऊ इच्छितो की सरकारच्या या निर्णयाने जिल्ह्यातील विकास कामाला अधिक गती प्राप्त झाली आहे कारण आमच्या सर्व विभागांमध्ये एक जबरदस्त ताळमेळ आहे.”

माला वाजपेयी,एआरटीओ
माला वाजपेयी,एआरटीओ

माला वाजपेयी , एआरटीओ

उन्नाव जिल्ह्यातील एआरटीओ माला वाजपेयी यांनी आपले विचार व्यक्त करतांना युअर स्टोरीला सांगितले की, “महिला मानसिक रूपाने अधिक मजबूत असतात. पुरुषांच्या तुलनेने अधिक जबाबदारी पेलण्यास सक्षम असतात पण त्याचबरोबर त्यांनी पुरुष सहकाऱ्यांनी या गोष्टीला विपरीत न घेण्याचा सल्ला दिला. मी उन्नावमधील लोकांच्या उज्ज्वल भविष्याची कामना करून कार्य संपादन करू इच्छिते.”

सगळ्या मुख्य पदांवर महिलांची नियुक्ती असतांना फक्त पोलीस अधिकाऱ्याचे पद यापासून रिक्त होते ज्याला युपी सरकारने पूर्ण करून या पदासाठी आयपीएस नेहा पांडे यांची नियुक्ती केली. युअर स्टोरीशी झालेल्या वार्तालापामध्ये जिल्हा पोलीस अधिकारी नेहा पांडे यांनी सगळ्या महिला अधिकारी असलेल्या जिल्ह्यातील आपल्या नियुक्तीला स्वतःचे सौभाग्य मानले आहे व महिला दिनी स्त्रियांच्या सुरक्षेची मनीषा व्यक्त केली. म्हणजेच महिला कोणत्याही प्रकारच्या अत्याचारापासून मुक्त झाल्या पाहिजेत आणि त्यांना शक्तिशाली बनविले पाहिजे. 

अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

लष्करात धाडसी कारकीर्द घडविणाऱ्या रिटायर्ड कॅप्टन तनुजा काबरे

प्रवाहाविरुध्द पोहण्याची जिद्द देऊन घडविले शेकडो उद्यमी, पहिल्या महिला ब्रँन्ड गुरु ‘जान्हवी राऊळ’ यांच्या यशाची कहाणी!

मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ऩुरजहाँ सफई नियाझ

लेखिका : रुबी सिंग
अनुवाद : किरण ठाकरे