अमृततुल्य, आरोग्यवर्धक एक कप ‘लिफ टी’- ‘टिसेज’!

अमृततुल्य, आरोग्यवर्धक एक कप ‘लिफ टी’- ‘टिसेज’!

Monday October 26, 2015,

3 min Read

जगभरात दररोज किमान तीन दशलक्ष पेक्षा जास्त कप चहा प्यायला जातो. टेबलावर सजवून या हातातून त्या हातात दिला जाणारा गरम चहाचा कप! सर्व प्रकारच्या लोकांच्या मनाला शांती देतो. चहा सांस्कृतिक आक्रमणाशिवाय निपक्षपातीपणाने त्या देशातही पसंत केला जातो जेथे पर्यावरणाच्या कारणास्तव चहाचे उत्पादन होऊ शकत नाही. (आयर्लंड आणि ब्रिटन जगभरात प्रति व्यक्ती चहाच्या खपात क्रमश: तिसरे आणि पाचवे राहिले आहेत.) चहामध्ये इतिहास आणि पारंपारिकता देखिल आहे. त्यामुळे चहाला व्यापारी उत्पादन म्हणून खप होण्यास मदतच मिळते.

आकाश ताकवानी यांनी ‘टिसेज’ ची सुरुवात करतानाच आपले लक्ष्य जागतिक पातळीवर ठेवले. ‘टिसेज’च्या चहामध्ये पानांशिवाय फळे, फुले आणि मसाल्यांचे नैसर्गिक अस्तित्व असते.

image


टिसेजचा पाया

आकाश सांगतात की, चीन मधील जागतिक उद्योजकता कार्यक्रमात मला चहापत्तीच्या संस्कृती आणि त्याच्यातील स्वास्थ्यकारक बाबींची माहिती मिळाली. मी तिथे पाहिले की, वर्गात, व्यावसायिक बैठका, ट्रेनमध्ये कुठेही, गरम पाण्याची सुविधा नेहमी असायची. लोक सोबतच चहापत्तीच्या पिशव्या घेऊन येत असत. मग मी यावर संशोधन सुरू केले. मला हे जाणून आश्चर्यच वाटले की,आरोग्यासाठी याचे किती फायदे आहेत.

जगभरातील पसरलेल्या चहा उद्योगाने आकाश यांनाही हा व्यवसाय करण्याचा विचार दिला, त्यांनी भारतात हा व्यापार करण्याचे ठरवले. आकाश सांगतात की, ‘चहाच्या बाबतीत भारत चीन नंतरचा दुसरा मोठा उपभोक्ता देश आहे आणि चवथा मोठा निर्यातदार देशही आहे. आकडेवारीनुसार जगाच्या एकूण उत्पादनाच्या तुलनेत सुमारे तीस टक्के आणि उत्पादनाच्या प्रमाणात सुमारे पंचवीस टक्के चहाचा वापर देशांतर्गत केला जातो.’

द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया च्या माहितीनुसार भारतीय चहा उद्योगाची एकूण उलाढाल सन २०१५ मध्ये तेहतीस हजार कोटी रुपयांची आहे. यामध्ये बाजाराच्या पंचावन्न टक्के हिस्सा ब्रँडेड बाजाराचा आहे आणि तो वीस टक्क्याने वाढत आहे. अनब्रँडेड बाजाराची वाढ दरवर्षी दहा टक्के होत असते.

भारतीय स्वयंपाकघरात लिफ टीचा सुगंध

image


मागच्या दोन वर्षात आकाश यांनी एका रिटेल ब्रँन्डिंग संस्थेमध्ये व्यापार विकास व्यवस्थापक म्हणून काम केले होते आणि त्यांना ‘भारतात आधुनिक किरकोळ बाजाराच्या त-हाबाबत ग्रीन चहाच्या विषयावर संशोधनाचे काम करण्याची संधी मिळाली. आपला अनुभव सांगताना आकाश म्हणतात की, ‘बाजारात ग्रीन टीचा इतका प्रचार पाहिल्यानंतर मी आश्चर्यचकीतच झालो. परंतू हे पाहून निराश देखिल झालो की, मला कुठेही ‘लिफ टी’ पहायला मिळाला नाही.

परंतू लवकरच आकाश यांनी या निराशेचे एका व्यावसायिक संधित रुपांतर केले! ते म्हणतात की, ‘मी ऑनलाईन आणि ऑफलाईन गंभीरपणे चर्चा सुरू केली. मी या विषयावरील लेख वाचले. विडियो पाहिले,चीन मधील मित्रांकडून सखोल माहिती घेतली. चहा एक्स्पोमध्येही भाग घेतला आणि पुरवठादारांनाही भेटलो.’ यानंतर त्यांच्यासाठी याबाबतची कोणतीही माहिती रहस्य राहिली नाही.

यातील लाभात ह्रदयांसंबंधी रोगांचा मुकाबला करणे, कोलेस्ट्रॉल कमी करणे, त्वचेचे रक्षण करणे, कर्करोगाला दूर ठेवणे आणि हाडे तसेच दातांना मजबूत करण्याबाबतची माहीती मिळाली. याशिवाय चहाने कँलरीज,जाडेपणा वाढत नाही. आकाश म्हणतात की,‘ भारतात सामान्यपणे लोकांना ग्रीन टीचे फायदे माहीत आहेत. लोकांना हे माहीती असणे माझ्यासाठी भाग्याचे ठरले. व्यवसायात माझे पहिले पाऊल ग्रीन टी ला सर्वत्र उपलब्ध करणे हे होते.

कार्याची प्रेरणा

image


आकाश आपल्या प्रेरणेबाबत सांगताना आपले आर्थिक प्राध्यापक पीटर बोरो यांच्या व्याख्यानाची आठवण सांगतात. ते म्हणतात की, ‘त्यांनी केवळ एक लीफ टी तयार केली होती. ज्यामध्ये सफेद कागदावर काळ्या अक्षरात जेएफडीआय लिहीले होते. आम्हाला सगळ्यांना त्याचा अर्थ माहिती होता परंतू कोणाकडेच काहीही उत्तर नव्हते. काही वेळाने त्यांनीच याचा अर्थ सांगितला ज्याने कर्माची प्रेरणा मिळाली.

पीटर बीरो यांनी वर्गात सांगितले की, ‘तुम्ही कधीही वर्गात बसून समस्या सोडवू शकणार नाही.तुम्ही बाजारात गेले पाहिजे, प्रयत्न करण्यास तुम्ही मागेपुढे पाहता कामा नये’.

‘सुरूवातीला सर्वात मोठी अडचण आपल्या उद्दिष्टाबाबत अढळ राहण्याची आहे. तुम्हाला खूप लोक भेटतील जे तुमच्या विचारांशी सहमत नसतील. आपल्या उद्दीष्टांवर विश्वास ठेऊन त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. निश्चय हीच मोठी पूंजी आहे’ आकाश सांगतात.

नाविन्यातून बाजारपेठ काबीज करणे हेच केवळ यशासाठी गरजेचे नाही, जेंव्हा फळे आणि हिरव्या पानांपासून बनलेल्या चहात बाजारात अग्रणी उत्पादन होण्याची क्षमता असते. ही केवळ चहाला योग्य ग्राहकांपर्यंत घेऊन जाण्याची गोष्ट आहे.