भारतीय वंशाच्या ब्रिटिश पोलीस अधिका-याने मिळवले शौर्यपदक!

0

हिरो ठरलेल्या भारतीय वंशाच्या स्कॉटलंड यार्डच्या पोलिस अधिका-याने स्वत:चा जीव धोक्यात घालून जळत्या घरातून कुटूंबाला वाचविल्याबद्दल सन्मान मिळवला आहे, त्यांनी हजारो लंडनवासीयांचा पाठिंबा मिळवला आहे.

शांद पानेसर, यांनी सहकारी क्रेग नेल्सन यांच्यासोबत असाधारण शौर्यासाठीचा या वर्षीचा पुरस्कार ‘टोटल एक्सलन्स इन पोलिस अॅवॉर्डमध्ये मिळवला आहे. याबाबतच्या वृत्ता नुसार, हजारो लंडनवासीयांनी यासाठी मतदान केले, आणि या वर्षीचे पुरस्कार्थी निवडण्यात आले असे मेट्रोपोलिटन पोलिसांच्या वक्तव्यात नमूद करण्यात आले आहे.


“ सप्टे.२०१६मध्ये, पी सी निकोलसन आणि पीसी पानेसर लंडन अग्निशमन दलासोबत आले, हिलींगटन येथे घराला आग लागली होती, त्यांच्या लक्षात आले की दोनजण आत अडकले आहेत. जरी या अधिका-यांकडे त्यावेळी आग प्रतिबंधक साधने नव्हती तरी, किंवा अग्निरोधक कपडे नव्हते तरी त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही, आणि काहीही विचार न करता आगीच्या वेढ्यातील घरात उडी घेतली.

अंधारात त्यांनी शोध घेतला, तेथे पातळ काळा धूर पसरत जात होता, आगीत फसलेल्यांचा शोध त्या कठीण स्थितीत घेतला, मात्र ज्वाळा वेढल्याने त्यांना बाहेर पडावे लागले. त्याचवेळी या दोघांनी मागे न येता तेथे धोका पत्करून शोध सुरूच ठेवला. पीसी निकोलसन यांनी मग अनेकदा दीर्घ श्वास घेतला, आणि माहिती नसलेल्या जागावर शोध घेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला, आपल्या वर्दीचा पांढरा सदरा तोंडाला गुंडाळून विषारी धुराचा त्यांनी प्रतिकार केला. त्याच अंधारात ते पाय-या चढून वर गेले, आणि धग सहन करत त्यानी एका महिला आणि पुरूषाचे प्राण वाचविले. त्यांना दोघांना श्वास घेण्यास त्रास होत होता. आणि बेशुध्द झालेल्या महिलेला प्रथमोपचारांची गरज होती. त्यांची सुटका होताच त्याना उपचारांसाठी नेण्यात आले मात्र महिला मृत झाल्याचे सांगण्यात आले. मात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून कर्तव्य करण्याची अनुमती नसतानाही या दोन अधिका-यांनी तिला मदत करण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही.” असे या निवेदनात म्हटले आहे.

मेट चे आयुक्त सर बर्नाड हॉगन-हॉवे म्हणाले की, “ या पुरस्काराने हेच सिध्द झाले की, आमच्या अधिका-याचे शौर्य आणि व्यावसायिकता किती उच्च दर्जाची आहे, पोलिस सुध्दा जीव वाचवितात, सशस्त्र गुन्हेगारांशी लढतात, आणि धोकादायक स्थितीत काम करतात”

“होय, आम्ही मेटच्या पोलिस दलात लंडनवासीयांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी आहोत, आणि प्रत्येक धोक्यातून या शहराला सुरक्षित करू. मला अशा संघटनेत काम करण्याचा अभिमान आहे, जेथे असे काम रोज चालते. आज मला संधी आहे की, मी मेट एमइटी मधील सा-या महिला आणि पुरूषांना धन्यवाद देईन जे दररोज लंडनला खूप काही देत असतात”.

 थिंक चेंज इंडिया