इटली ते जर्मनी आणि इस्त्राईल ते यूएई .... एक ९५ वर्षांच्या आजी जगभर प्रवास करतात!

0

‘वय म्हणजे केवळ एक संख्या आहे’ असे सांगत जगणा-या ९५ वर्षांच्या आजी अनाकुट्टी सिमॉन यांना जगभर फिरण्याचा छंद लागला आहे. त्यांनी दूरवरचे देश इटली, जर्मनी, इस्त्राईल, फ्रान्स्, आणि चारवेळा यू ए ई फिरून आता त्या काल्व्हेरी जे जेरूसलेम जवळ आहे. तेथे फिरायला जाण्याची तयारी करत आहेत. २० नातवंडांची आजी असलेल्या सिमॉन यांनी नेहमीच सा-यांचे लक्ष वेधून घेताना पारंपारीक ‘चट्टा’ आणि ‘मुंडू’ परिधान केले मग त्या जगातल्या कोणत्याही देशात का जात असत ना! अन्नुकूट्टी, ज्यांना ‘अम्माजी’ (मल्याळम मध्ये आजी) म्हणून हाक मारले जाते, त्यांच्या कानात घातलेल्या तोडा मुळे सा-यांच्या आकर्षणाचे केंद्र बनतात.


Source: TNM
Source: TNM

कोट्टायम मध्ये जन्मलेल्या त्या सध्या इड्डूकी जिल्ह्यातील कुनीनजी गावात राहतात, आणि एकट्याने प्रवास करायला त्यांना आवडते. अनाकुट्टी यांच्या कुटूंबात ७० जण आहेत, त्यात त्यांची मुले, नातवंडे आणि पतवंडे यांचा समावेश आहे. जरी त्या जगभर प्रवास करत असल्या तरी मल्याळम ही एकमेव भाषा त्यांना बोलता येते त्यामुळे हे देखील आश्चर्यच आहे की परदेशात जातात तेंव्हा त्या कसा संवाद साधत असतील?

एका वृत्तात म्हटले आहे की, सुदैवाने अनाकुट्टी या शरीराने मजबूत आणि धडधाकट आहेत, आणि त्यांच्या वयाच्या इतर लोकांसारखे त्याना काही आजार नाहीत. गेल्या ५० वर्षापासून विधवा असलेल्या, त्यांना ब-याचवेळा त्यांचा व्हिसा देणा-या अधिका-यांच्या त्यांच्या वयाबाबतच्या प्रश्नाना तोंड द्यावे लागते, पण त्यांचा उत्साह आणि शाररीक मजबूती पाहून त्याना कुणी नकार देवू शकत नाही.

त्यांचा पहिला प्रवास होता, १९९७मध्ये जर्मनीत, त्यावेळी त्या ७५ वर्षाच्या होत्या. केवळ प्राथमिक शिक्षण घेतलेल्या अन्नाकुट्टी नेहमी त्यांच्या छंदात व्यस्त असतात, ते आहेत शेती आणि सुश्रूषा. ज्यावेळी त्या प्रवासाला गेल्या नसतात.


Source : TNM
Source : TNM

कोट्टायम येथील काडांडू मधील कानामकोंबील कुटूंबातील अन्नाकुटी, या त्यांचे आई वडील अन्ना आणि मथाई यांचे दहावे अपत्य होत्या. त्यांचा विवाह १९३६ मध्ये पेंडानाथू सिमॉन यांच्याशी वयाच्या १४व्या वर्षी झाला.

त्यांच्या १२ भावंडापैकी, केवळ त्यांची लहान बहिण मारियाकुट्टी, या कोझीकोडे येथे प्रस्थापित झाल्या ज्या आजही हयात आहेत. अन्नाकुट्टी त्यांना वरचेवर भेटायला जातात. जर त्यांच्या या माहितीने तुम्ही प्रभावित झाला असाल तर थांबा आणि त्यांच्या नव्या साहसाबद्दल ऐका ..... त्यांनी नुकतेच मल्याळम सिनेमा ‘अबे’ मध्ये भूमिका देखील केली आहे! 

Annakutty with her grandchildren, Source- TNM

अन्नााकुटी त्यांच्या पतवंडांसमवेत 
अन्नााकुटी त्यांच्या पतवंडांसमवेत 

त्यांच्यातील दिव्य चेतनेच्या बळावर, या ९५ वर्षाच्या आजी महत्वाच्या प्रवासाला जावून आल्या आहेत, आणि त्यांच्या या थक्क करणा-या कहाणीचा सा-यांना हेवा वाटावा.