अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांचा राष्ट्राशी अखेरचा संवाद! ‘येस वी कॅन’!

0

माझ्या प्रिय अमेरिकावासीयांनो,

संघराज्यांच्या विद्यमान अध्यक्षांनी कार्यालयातून पायउतार होताना नव्या अध्यक्षांना जागा मोकळी करून देताना या  ऑफिस मध्ये आपला संदेश सोडून जाण्याची खूप मोठी परंपरा आहे. हा संदेश म्हणजे आम्ही काय शिकलो, आम्हाला काय ज्ञान मिळाले किंवा आमच्या जवळ असलेल्या थोड्याश्या शहाणपणाचे आदान-प्रदान जगाचे नेतृत्व करणा-या या भूमीवरील सर्वोच्च कार्यालयात आमचे उत्तराधिकारी म्हणून येणा-यांना नवी महान जबाबदारी घेताना मिळावे यासाठी देखील आहे.

परंतू, माझा संदेश आमच्या ४५व्या अध्यक्षांसाठी मागे सोडून जात असताना, मला तुम्हा संर्वाना ४४वा म्हणून तुम्ही दिलेल्या सन्मानाबद्दल आभार व्यक्त करायचे आहेत. कारण माझ्या या कार्यालयात मी जे काही शिकलो ते तुम्हा सर्वांकडून शिकलो आहे. तुम्ही सा-यांनीच मला चांगला अध्यक्ष बनविले आहे, आणि तुम्हीच मला चांगला माणूस बनविले आहे.


मागच्या आठ वर्षात तुम्ही भलेपणाचा, लवचिकपणाचा आणि आशेचा स्त्रोत होता, ज्यातून मला प्रेरणा मिळाली. आमच्या जीवनातील आर्थिक संघर्षांच्या काळातही प्रत्येकाची काळजी घेणारे शेजारी आणि समाज मी पाहिला आहे. मी उत्तरांच्या शोधात असलेल्या कुटूंबांच्या सोबत शोकमग्न झालो—आणि मला चार्ल्सटन चर्च मध्ये समाधान मिळाले. आमच्या नव्या लष्करी अधिका-यांपासून आणि नवपदवीधरांच्या आशेतून मी संवेदना घेतल्या. मी पाहिले की आमच्या शास्त्रज्ञांनी पंगू झालेल्यांना त्यांच्या स्पर्श संवेदना मिळवून देण्यासाठी मदत केली. आणि जखमी सैनिकांना पुन्हा लढण्याची उमेद दिली. मी असे अमेरिकन्स पाहिले की ज्याना अखेर वैद्यकीय सेवा मिळाल्या आणि त्यांचे प्राण वाचले, आणि अशी कुटूंब पाहिली ज्यांचे जीवन बदलून गेले, कारण त्यांच्या विवाहाला आमच्या प्रमाणेच समानतेची वागणूक मिळाली. मी पाहिले की, लहान मुलांनी देखील त्यांच्या कृतीतून आम्हाला भान दिले की, निर्वासितांची काळजी घ्यावी, किंवा शांततेसाठी काम करावे, आणि त्याही पेक्षा एकमेकांची काळजी घ्यावी.

मी पाहिले आहे तुम्हा अमेरिकन जनतेला,सभ्यता,निर्धार, विनोदबुध्दीने आणि दयाबुध्दीने वागताना. तुमच्या नागरीक म्हणून दररोजच्या वागण्यातून मला आमचे उद्याचे सुरक्षित भवितव्य पहायला मिळाले आहे.

आपण सर्वांनीच, पक्षीय अभिनिवेशापलिकडे स्वत:ला कामात झोकून दिले – नागरिक म्हणून कर्तव्य बजावले. केवळ निवडणुका आहेत तेंव्हाच नाही तर, त्यावेळीही जेंव्हा आपले निहीत स्वार्थ त्यागावे लागले, तर सा-या जीवनातील या काळामध्ये आपण आपले कर्तव्य चोख बजावले आहे. या सा-या वाटचालीत मी तुमच्या सोबतच होतो. आणि ज्यावेळी प्रगतीचा वेग मंद होता, अमेरिका काही कुण्या एका माणसाचा प्रकल्प नाही. आमच्या शक्तिमान लोकशाहीमध्ये एकच सामर्थ्यवान शब्द आहे “आम्ही” ‘आम्ही नागरीक’ ‘आम्ही पुढे जावू’ होय, आम्ही नक्कीच ‘यस वुई कॅन.’

प्रेसिडेंट बराक ओबामा