वयाच्या तेराव्या वर्षी कंपनी सुरु करणाऱ्या भारतातील सर्वात अल्पवयीन सीइओची प्रेरणादायी कहाणी

वयाच्या तेराव्या वर्षी कंपनी सुरु करणाऱ्या भारतातील सर्वात अल्पवयीन सीइओची प्रेरणादायी कहाणी

Friday March 24, 2017,

4 min Read

सध्याच्या बदलत्या काळात, जेंव्हा बहुतांश व्यवसायांना स्टार्टअपच्या ‘फिवर’ने पादाक्रांत केले आहे, शाळा- महाविद्यालयातून काढून टाकलेली मुले त्यांच्या स्वत:च्या संस्था सुरू करत आहेत जे नवलाईचे राहिले नाही. तरीही अयन चावला याच्या कहाणीने धक्का बसल्याशिवाय राहात नाही, त्याचा व्यावसायिक म्हणून प्रवास वयाच्या १३व्या वर्षी सुरू झाला, अयन हाच भारतामधील सर्वात अल्पवयीन सीइओ असेल, आणि त्यांनतरची समाधानकारक कारकिर्द असणारा देखील.


image


अयन याला स्वत:ला वयाच्या सातव्या वर्षी संगणक मिळाला. कुणाही उत्साही मुलासारखे त्याने त्याला जे काही सापडत होते ते त्यावर शोधण्याचा प्रयत्न केला. व्हिडीओ गेम्स खेळण्यापासून ते त्यांना संपादीत करण्यापर्यंत आणि सिनेमेसुध्दा. अयन याने स्वत:पूरती व्यापक तांत्रिक प्रगती केली होती. नेहमीच हे सांगण्यात येते की शिक्षण आणि पदवी मिळवणे किती आवश्यक आहे, येथे हा मुद्दा येतो की अयन याने नवव्या वर्गातून शाळा सोडली आहे, जो त्याच्यासाठी जीवन बदलून टाकणारा निर्णय होता.

दिल्लीकर, अयन याचा जन्म १९९७ मध्ये कुंजम चावला फॅशन डिझायनर यांच्या पोटी झाला. त्याची मोठी बहिण जोल्शा चावला या नागरी अभियंता आहेत. एका चॅट दरम्यान अयन याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “ मी आठ वर्षांचा असताना पालकांनी संगणक घेवून दिला. लहान मूल म्हणून जी उत्सुकता असते त्यातून मी कौशल्य प्राप्त केले, एडिटींग टुल्स वापरून मी ऍडोब सॉफ्टवेअरच्या मदतीने सिनेमे तयार करण्यास सुरूवात केली. एका चांगल्या दिवशी मी विचार केला की, मी वेबसाईट तयार करणे, सॉफ्टवेअर तयार करणे, आणि ऍप्स तयार करणे शिकलो तर बहार येईल. त्यावेळी मी तेरा वर्ष वयाचा होतो. कल्पना अशी होती की, लोकोपयोगी सेवा देण्यासाठी सहजपणे संपर्क साधता यावा असे काही करावे असा मी मनात विचार केला. त्या नंतर वर्षभर त्यावर काम केले. २०११ मध्ये मी ते प्रत्यक्षात आणले”.

अयनने त्यासाठी कधीही कुणालाही सल्ला किंवा मार्गदर्शन मागितले नाही. तो नेहमी स्वत:च्या खोलीत संगणकासोबत दिसायचा. त्याने बरीच तांत्रिक माहितीची पुस्तके वाचली, त्यासाठी त्याने इंटरनेटचा संदर्भ घेतला. त्याच्या आईच्या भूमिकेबाबत तो म्हणाला की, “ माझी आई कंपनीच्या आर्थिक आणि कायदेशीर जबाबदा-या पाहते. ती माझ्या कंपनीची चेअरवुमन आहे. जरी ती आयटी क्षेत्रातील नसली, आणि माझ्या कामात हस्तक्षेप करत नाही. ती सुपरमॉम आहे जी व्यक्तिगत काळजी घेते, जरी आमच्या घरात खूप नोकरचाकर असले तरी. कामात असताना तिच्या सोबत घालवायला मला खूपच कमी वेळ मिळतो.”

अयनने ‘एशियन फॉक्स डेवलपमेंटस्’ची स्थापना २०११मध्ये केली. ही कंपनी आयटी, वेब, तसेच विपणन उत्पादने आणि सेवा देते. बडीजसाठी त्याने आणखी तीन समूह कंपन्या सुरू केल्या. त्याच्या आईने सुरूवातीला दहा हजार रूपयांची गुंतवणूक केली होती आणि त्यांनी कधीही कोणत्याही गुंतवणूकदारांना यासाठी गळ घातली नाही किंवा संपर्क केला नाही.

एका वृतांतानुसार अयन म्हणाला होता की, “ अनेकवेळा माझ्या ग्राहकांनी माझ्या सेल्समनला गांभिर्याने घेतले पण मला नाही. पहिल्या वर्षीतर हे फारच कठीण गेले, परंतू मी खूपच लहान होतो, परंतू नंतर त्यांना माझ्या सक्षमतेवर विश्वास बसला.” अगदी आजही, जेंव्हा अयन यांना मोकळा वेळ मिळतो, ते इंटरनेटवर सर्फ करत असतात ज्यातून आयटी आणि त्यांच्या बाजारपेठेची नवी माहिती मिळत असते.

“ आज मला जगभरातून आणि देशभरातून परिषदांना, कार्यशाळातून, वेबीनार्समधून वक्ता म्हणून निमंत्रण मिळते. मी विद्यापीठातूनही बोलतो. मी द्रोणाचार्य अभियांत्रिकी महाविद्यालय येथे भाषण दिले, जेथे व्यासपिठावर माझ्यासोबत नावाजलेले उद्योजक होते. ते करिअर फिस्ट २०१३ होते. मला ऐंटरप्राइज कनेक्ट २०१४-१५मध्ये सुध्दा बोलण्यासाठी निमंत्रण होते, जे फ्लोरिडा, ऑरनॉल्डो येथे होते.

मला उत्सुकता होती ज्यावेळी नुकतेच एशियन फॉक्स डेवलपमेंटस् ने सिने दिग्दर्शक इकराम अख्तर आणि निर्माता राजेश त्रिपाठी सोबत त्यांच्या आगामी सिनेमा ‘इंडिया मे लाहोर’ करीता आय टी आणि माध्यम सहभागीता करीता करारावर स्वाक्षरी केली!

काळा सोबत अयन १८ वर्षाचा होत आहे. जगभरात त्याचे एक लाख ग्राहक आहेत. त्याच्या कंपनीच्या यूएस, यूके, हॉंगकॉंग, आणि तूर्कीमध्ये शाखा आहेत. अयनला ‘यंग आंत्रेप्रेनर ऑफ दी इयर’ हा पुरस्कार दोनदा मिळाला आहे. आणि त्याला पंतप्रधान कार्यालयातून कौतुक करणारे पत्रही प्राप्त झाले आहे. त्याच्या फावल्या वेळात तो काय करतो याबाबत सांगताना तो म्हणतो की, “ मी पार्टी केंव्हातरीच करतो. मी सरकारी शाळांना भेटी देवून तेथे शिकवतो. मला माझे आयटी मधील ज्ञान इतरांना द्यायला आवडते आणि लहान मुलांना प्रोत्साहन द्यायला देखील.

अयन याची कहाणी खरोखर लाखात एक अशीच आहे, आणि प्रत्येक तरून उद्योजकाला त्यांच्या या कहाणीतून प्रेरणाच घेता येईल, ज्यांना स्पर्धेच्या या जगात मोठे व्हायचे आहे.

    Share on
    close