केरळमध्ये पुरूष झाला स्त्री, आणि स्त्री झाली पुरूष सारे काही एकमेकांशी लग्न करण्यासाठीच!

केरळमध्ये पुरूष झाला स्त्री, आणि स्त्री झाली पुरूष सारे काही एकमेकांशी लग्न करण्यासाठीच!

Friday September 08, 2017,

3 min Read

तृतीयपंथी असल्याचा भारतात नेहमीच एक प्रकारचा न्य़ूनगंड बाळगला जातो, पण आता मात्र तृतीयपंथी समाजाने यामध्ये बदल करण्याचा विचार करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.


image


बदलत्या परिभाषेबाबत बोलताना अनिता चेरिया संचालिका ‘ओपन स्पेस’ एक माहिती देणारी संस्था जी सामाजिक न्याय आणि समानता या क्षेत्रात काम करते, त्यांनी युवर स्टोरीला सांगितले की, “ गेल्या वीस वर्षांपासून मी बदलता संवाद पहात आहे मुख्य प्रवाह आणि तृतीयपंथी समाज यांचा दृष्टीकोन बदलत आहे. नुकतेच 'बधाई' एक उपक्रम ज्यातून हा अल्पसंख्य समाज त्यांच्या भावना इतर समाजात पोहोचिण्याचा प्रयत्न करतो आहे.

केरळमधील आरव अप्पूकुट्टन ४६ वर्षीय तृतीयपंथी पुरूष, आणि सुकन्या क्रिष्णा २२ वर्षीय तृतीयपंथी स्त्री या दोघांनीएकमेकांशी लग्न करायचे ठरविले, जरी त्यात ब-याच बाबींचे अडथळे होते. या जोडप्याने मुंबईत जावून त्यांच्या लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, जेथे त्यांची भेट झाली होती आणि प्रेमात पडले होते. त्याचे आता सप्टेंबर महिन्यात लग्न आहे.


Image source: The Better India

Image source: The Better India


ज्यावेळी आरव यांनी सुकन्याला तिच्या घरच्यांसोबत क्लिनिकमध्ये बोलताना ऐकले त्याेनी जाणून घेतले की ती देखील मल्याळी आहे. त्यांच्या नेहमी भेटी सुरू झाल्या आणि एकमेकांच्या संवादातून फोनवरून मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी आरव यांनी सुकन्याला मागणी घातली.

आरव यांना या प्रवासात जरी फारश्या अडचणींचा सामना करावा लागला नाही तरी सुकन्या यांना त्यांच्या घरच्याचे, नातेवाईकांचे आणि समाजाचे टोमणे टीका आणि विरोध सहन करावा लागला. आरव यांना देखील नको त्या प्रश्नाची उत्तरे द्यावी लागली आणि अवघडल्या अवस्थेतून जावे लागले, मात्र त्यांनी धीराने या सा-या स्थितीला तोंड दिले, याचे श्रेय त्यांनी काही प्रमाणात आपल्या आईलाही दिले आहे. आरव यांच्यासाठी, हसून शांत बसणे हा मोठा उपाय होता ज्यावेळी कुणी असे विचारत असे आणि त्यांच्या लैंगिक बाबीवर टिपणी करत असे, याबाबत सांगताना ते म्हणाले की, “ मी नेहमीच वेगळ्या प्रकारचा माणूस म्हणून वागलो, माझे विचार पुरूषांसारखे होते तरी मला सामान्य पुरूषासारखे स्त्री देहासोबत लग्न करता येणे शक्य नव्हते. त्यानंतर मला ज्याची गरज होती ते करण्याचा मी निर्णय घेतला आणि शस्त्रक्रियेचे पाऊल उचलले. आज मी तितकाच खूष आहे जितका सामान्य पुरुष लग्न जुळल्यानंतर असतो. मात्र हे सारे शस्त्रक्रिया केल्यानंतरच शक्य झाले आहे जे मी आत्मविश्वासाने सांगू शकतो. मात्र कुणी मला त्यासाठी हिणवले नाही किंवा मी देखील असे कुणी केले तर त्यांच्या दबावाखाली आलो नाही.”

सुकन्या ज्या बंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर संस्थेत काम करतात, त्या म्हणाल्या, “एक दिवस मी साडी नेसले अगदी महिलांसारखी, आणि एका लग्नात हजेरी लावली, त्यानंतर माझ्या सोबत अनेक समस्या निर्माण झाल्या, मात्र मी माझी ओळख लपविली नाही. मी माझे नाव बदलण्यासाठी अठरा वर्षांची झाले. त्याच्या दुस-याच दिवशी अर्ज केला आणि माझ्या बदलाच्या प्रक्रियेसाठी उपचारसुध्दा सुरू केले.

लग्नाबाबत बोलताना आरव यांनी सांगितले की, “आम्हाला छोटेखानी विवाह हवा आहे, मात्र आमच्या मित्रांना मेजवानी हवी आहे. त्यामुळे आम्ही रितसर लग्नाचा घाट घातला आहे”.