भेटा प्रीथिका याशिनी यांना, ज्या भारताच्या पहिल्या तृतीयपंथी पोलिस उप-निरिक्षक आहेत!

0

त्यांचा कायदेशीर लढा पूर्ण करत, तृतीयपंथी के प्रीथिका याशिनी, यांनी समाजाच्या अन्य २१ जणांसोबत पोलिस उपनिरिक्षक पदावर नियुक्ती झाल्याचे प्रमाणपत्र फेब्रूवारी २०१६मध्ये मिळवले आहे. चेन्नई येथील शहर पोलिस आयुक्त स्मिथ सरन यांनी वैद्कीय चाचण्यांनंतर त्यांना आणि समाजाच्या २१जणांना हे प्रमाणपत्र दिले आहे.


प्रीथिका याशिनी यांनी आता आयपीएस होणार असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की , त्या तृतीयपंथींना त्यांच्याप्रमाणेच शिक्षण आणि रोजगार मिळावा म्हणून मदत करणार आहेत. त्या पुढे म्हणाल्या की, “ मी लहान मुलांवर अत्याचार करणारे आणि लैंगिक छळवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे ”.

समाजातील या सर्वांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते, नुकतेच त्यांनी तामिळनाडू पोलिस अकादमी मधून पासआऊट केले आहे. इतिहास घडविणा-या २५ वर्षीय प्रीथिका या लवकरच पोलिस दलातील उप निरिक्षकपदाच्या सेवेत रूजू होत आहेत.अशा प्रकारच्या पदावर नियुक्ती मिळवणा-या त्या पहिल्या वहिल्या तृतीयपंथी अधिकारी असणार आहेत.

जन्माने पुरूष असणा-या त्यांना २०११ मध्ये कुटूंबियांना सोडावे लागले, जे सालेम तामिळनाडू येथे राहतात. कारण त्यांना त्यांच्या लैंगिक ओळख असणा-या वास्तवाशी जुळवून घेता आले नाही. त्यानंतर त्यांच्यात २०११ मध्ये लैंगिक बदल झाला, आणि त्या त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहिल्या, त्यात त्यांना सतत डावलण्यात आले. एका मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितले की, “ ज्यावेळी मी मुलाखतीला जात असे मला अक्षरश: उचलून फेकले जात असे, त्यामुळे माझ्या जीवनाची स्वप्ने पाहणे मी जवळपास बंद केले होते”.

तामिळनाडूच्या पोलिस भरतीसाठीच्या अर्जावर तृतीयपंथीयांना वेगळा रकाना नाही, आणि त्यामुळे त्यांना नाकारण्यात आले. असे असले तरी मद्रास येथील उच्च न्यायालयाने नोव्हे. २०१५मध्ये एक आदेश पारित केला, त्यात तामिळनाडूच्या गणवेशातील सेवांमध्ये भरती करणा-या मंडळाला तृतीयपंथीयासाठीच्या रकान्याचा समावेश करण्यास सांगण्यात आले. त्याचे नांव ‘ ट्रान्सजेंडर कम्यूनिटी’ असे देण्यात आले. आणि त्यांच्यासाठी परिस्थिती एकदम बदलून गेली.

प्रीथिका या संगणकीय कामकाजात पदवीधर आहेत, आणि त्यांना त्यासाठी देखील अनेक प्रकारच्या लढाया लढाव्या लागल्या आहेत. त्यांनतर त्या पोलिस दलात नियुक्तीचे स्वप्न पूर्ण करू शकल्या.