शवाना पांड्या यांना भेटा, तिस-या भारतीय वंशाच्या अंतराळ विरांगना!

0

कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स या दोघी भारतीय वंशाच्या अंतराळयात्री होत्या, ज्यांचा देशाला अभिमान आहे. याच परंपरेला पुढे नेत आहेत डॉ शवाना पांड्या इंडो-कँनडियन अंतराळविरांगना. ज्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक अंतराळ योजनांमध्ये भाग घेत आहेत. 


Image source: CBC Radio
Image source: CBC Radio

३२वर्षीय शवाना या जन्मत: मेधावी आहेत, त्या हुशार लेखिका आहेत, तसेच जनरल फिजीशियन आहेत तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या त्वायकांदो प्रविण आहेत.  याबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ मी लहान होते तेंव्हापासून मला अंतराळ आवडते, मी ता-यांवर प्रेम करते. त्यामुळे अशाप्रकारच्या कामात सहभागी व्हावे हे जन्मभरापासूनचे स्वप्न होते.” त्यांनी अलिकडेच नासाच्या जॉन्सन अंतराळ केंद्रातून प्रशिक्षणार्थी म्हणून शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे.

शवाना अलर्बेटा विद्यापिठाच्या स्नातक आहेत, त्यांनी न्यूरोसायन्स विषयात पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी अंतराळ विज्ञान या विषयात फ्रान्समधून मास्टर ही पदवी आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठातून मिळवली आणि एमडी चा अभ्यासक्रम  अल्बेर्टा विद्यापीठातून पूर्ण केला. अंतराळ विज्ञानाच्या शाखेत त्या स्वत:च दाखल झाल्या. त्या फ्रेंच, रशियन, स्पँनिश या भाषा देखील शिकल्या आहेत.

मुंबईशी नाते असल्याने त्यांनी या शहराला भेट दिली आणि कुटूंबियांना भेटल्या त्याच प्रमाणे त्यांनी स्थानिक रुग्णालयाच्या प्रोत्साहनात्मक कार्यात सहभाग घेतला आहे. डॉक्टरांशी संवाद साधला आहे आणि विद्यार्थ्यांशी बोलल्या आहेत.एका मुलाखती दरम्यान त्या म्हणाल्या की, “ मी लिलावतीबाई पोद्दार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना भेटले, त्यांनी मला अनेक प्रतिभावान प्रश्न विचारले. शून्य- गुरुत्वापासून अंतराळापर्यंत. ज्यावेळी मी वैद्यकीय विद्यार्थ्यांशी संवाद केला, मला जाणवले त्यांच्यात ते सारे धाडस आहे, जे त्यांच्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे. गरज आहे की त्यांनी रोज होणा-या वैज्ञानिक घडामोडींचा वेध घेत राहिले पाहिजे. आणि रोज काहीतरी नवे मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” शवाना यांनी न्युरोसर्जरी या विषयातही प्रशिक्षण घेतले आहे. मात्र त्यांनी त्यांचा वैद्यकीय परवाना जनरल मेडिसीन या विषयात घेतला आहे. अलिकडच्या फेसबूक पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “ मी पुढच्या काळात फिजीशियन म्हणून माझे कार्य करणार आहे. वक्ता आणि नागरी अंतराळ वैज्ञानिक, आणि महत्वाचे म्हणजे, या प्रकल्पांच्या शिक्षणासाठी काम करणार आहे.”

सौजन्य : थिंक चेंज इंडिया