खिचडी नाही फास्टफूड म्हणा हुजूर, ‘खिचडीवाला’ची सेवा घ्या जरुर!

मनीष आणि सागर यांनी सुरु केले ‘खिचडीवाला’.... खिचडीवाला मध्ये पंधरा प्रकारच्या खिचडी मिळतात.... दररोज १२०-१३० येतात मागण्या.... ४५ते१२० रुपयांपर्यंत मिळते खिचडी....

1

म्हणतात ना देखाव्यावर जाऊ नका, आपली बुध्दी वापरा. आपली बुध्दी वापरून दोन तरुणांनी सामान्य खिचडीला केवळ नवी ओळखच दिली नाहीतर स्वत: देखील झाले व्यावसायिक गुरू. एक सामान्य खिचडी दोन तरूण उद्यमी मनिष खानचंदानी आणि सागर भजानी यांच्यासाठी यशाची कहाणी झाली आहे. दोघांची ही जोडी नागपूरात एक रेस्टॉरेंट चालवते जिथे पंधरा प्रकारच्या खिचडी मिळतात. 

‘आजा-यांचे मुख्य भोजन’ समजल्या जाणा-या खिचडीवर या दोघांनी आपल्या दुकानात अनेक प्रयोग केले आणि त्याला योग्य भावात वेगळ्या स्वादात सादर करताना रिब्रांडिंग केले आहे. सागर यांचे म्हणणे आहे की, 

“ खिचडी शतकांपासून आमच्या भोजनाचा अभिन्न भाग राहिली आहे. आम्ही त्यातील मुख्य पाककृती कायम ठेऊन स्वाद बदलण्याचा प्रयत्न केला आहे”.

एका कार्यशाळेतून व्यावासायिक मॉडेल: २१ दिवसांचा प्रवास

खाण्याचे शौकीन आणि खिचडीवालाच्या मागचे मुख्य कल्पक मनीष यांनी आपल्या छंदासाठी एमबीए पूर्ण केल्यानंतरही कॅम्पस मुलाखतीमध्ये भाग घेतला नाही. ‘खिचडीवाला’ साठी मनिष यांच्या व्यावसायिक कल्पनेने सागर इतके प्रभावित झाले की, त्यांनी सोबत येण्याचे ठरविले. सागर आपल्या एकाच प्रकारच्या कामाने कंटाळले होते. एक सत्यता ही देखील होती की ही कल्पना नवी आणि वेगळी होती. दोघांनी सामान्य खिचडीला वेगळ्या पध्दतीने विशेषत: फास्टफूड प्रमाणे विक्री करू इच्छित होते.

‘खिचडीवाला’ मध्ये आरोग्यपूर्ण भोजन वाढले जाते

खिचडीवालाच्या संस्थापकांचे मत आहे की, आज बाजारात जे फास्टफूड विकले जाते ते आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे त्यांचा पहिल्यापासून प्रयत्न होता की, ते असेच अन्न वाढतील जे आरोग्यपूर्ण असेल आणि त्यात खिचडीपेक्षा अधिक काहीच असू शकत नव्हते.

लस्सी ताक आणि पेज यांच्या सारखी पेय देखील इथे विकली जातात, मात्र येथे वातमय म्हणजे गॅस असलेली पेय अजिबात विकली जात नाहीत. यांच्या रेस्टॉरेंटमध्ये पॅक करून पार्सल, घरपोच सेवा आणि बसून खाण्याची व्यवस्था देखील आहे, पण यात सर्वात जास्त लोकप्रिय बसून खाण्याची व्यवस्था आहे. यांच्या कमाईचा मोठा हिस्सा बसून खाणा-या ग्राहकांकडूनच येतो तर तेहतीस टक्के कमाई घरपोच सेवेतून येते. दोनही उद्यमी मानतात की त्यांचे रेस्टॉरेंट नागपूरच्या ज्या आयटी पार्कजवळ आहे त्यामुळेही त्यांच्या व्यवसायाची भरभराट झाली आहे. नागपूरच्या आयटीपार्क जवळ त्यांचे रेस्टॉरंट असल्याने बहुतांश ग्राहक या आयटीपार्क मध्ये काम करणारे लोक आहेत जे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत येथे पोहोचतात. एका सामान्य दिवसांत येथे १२०-१३० खिचडीच्या मागण्या केल्या जातात. त्याची किंमत देखील आकर्षक आहे, जी ४५रुपयांपासून १२०रुपयांपर्यंत आहे.

सुरुवातीची गुंतवणूक

दोघांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात कंपनीच्या सामान्य मदतीने, सागरच्या काही बचतीच्या पैशातून आणि कुटूंबियाकडून मिळालेल्या कर्जातून केली होती. असे असले तरी या एक वर्ष जुन्या कंपनीने बाजारात चांगली पकड मिळवली आहे आणि आता मे महिन्याच्या अखेरीस ते नागपूरात आपल्या दुस-या दुकानाची सुरूवात करण्याची तयारी करत आहेत. त्यानंतर त्यांची पुढची योजना फ्रेंचाइजी देण्याची आहे.

सागर म्हणाले, “ आताच सातजणांनी गांभिर्याने आम्हाला फ्रेचाइजी बाबत विचारणा केली आहे, त्यात पाच नागपूरच्या बाहेरचे आहेत. अर्थातच आम्हाला आमचा हा व्यवसाय नागपूरच्या बाहेर न्यायचा आहे मात्र आम्ही ते तिस-या तिमाहीनंतर करणार आहोत.”

‘खिचडीवाला’चे बेस्टसेलर्स

खिचडीवालाच्या मेन्यू मधील सर्वात लोकप्रिय खिचडी आहे गार्लिक खिचडी, ज्यात सौम्य लसूणचा स्वाद आहे. (यात खिचडीचे तांदूळ आणि दुस-या डाळींसोबतच लसूणचे छोटे तुकडे टाकले जातात.)

सावजी खिचडी त्या लोकांना आवडते, ज्यांना मसालेदार खायला हवे असते. त्याचे नाव नागपूरच्या प्रसिध्द सावजी पदार्थावरून पडले आहे. या खिचडीमध्ये मसाल्यांचा खूप वापर होतो. यांच्या रेस्टॉरंटची सर्वात लोकप्रिय खिचडी इटालियन खिचडी आहे. त्याला इटलीच्या रिसोटोचे भारतीयकरण मानले जाते. या मध्ये चीज,स्वीट कॉर्न, सिमला मिरची इत्यादी टाकले जाते. युरोपीय मसाले जसे की, ऑरगानो, थाइम आणि बँसिल घातल्याने याचा स्वाद अनोखा असतो.

आणखी काही नाविन्यपूर्ण कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

यश त्यांनाच मिळते जे यशाबद्दल खात्री बाळगतात- धीरज गुप्ता, संस्थापक ‘जंबोकिंग’

स्नॅक्समध्ये योगा बार, पोटोबा प्रसन्न, डोकोबाही गार!

जीवनाच्या रसास्वादासाठी पाककला शिका सांगणारा सेलिब्रिटी शेफ पराग कान्हेरे!

लेखक : साहिल
अनुवाद : नंदिनी वानखडे-पाटील