रॅकेटची राणी हा शाहरुख खाननं नवीन सन्मान दिला टेनिसपटू सानिया मिर्झाला. सानियाची आत्मकथा ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ प्रकाशित

रॅकेटची राणी हा शाहरुख खाननं नवीन सन्मान दिला टेनिसपटू सानिया मिर्झाला. सानियाची आत्मकथा ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ प्रकाशित

Sunday July 17, 2016,

6 min Read

ये चांद-सा रोशन चेहरा

जुल्फो का रंग सुनहरा

ये झील-सी नीली या पीली आँखे

और फोर हँड है इतना गहरा

तारीफ करुँ क्या उसकी जिसने तुम्हे बनाया

बॉलीवुडचा बादशहा शाहरुख खाननं अश्याप्रकारे टेनिसची सुपरस्टार सानिया मिर्झाची प्रशंसा केली. हैदराबादच्या प्रसिध्द ताज फलकनुमा पॅलेसमध्ये शाहरुख खान यांनी 13 जुलैला संध्याकाळी सानिया मिर्झाची आत्मकथा ‘एस अगेन्स्ट ऑड्स’ चं प्रकाशन केलं. यावेळी शाहरुखनं सानिया मिर्झा, खेळ, सिनेमा आणि त्यांच्या छंदाबद्दल पत्रकारांशी भरभरुन बातचीत केली.

शाहरुख म्हणाले,” मला वाटतं, आपण आपल्या मुलींवर जितकं प्रेम करु, महिलांचा जेवढा आदर करु, तेव्हाच सानियासारखं यश आपल्याला पहायला मिळेल. या जगात महिलांनी जे नाव कमावलंय, प्रतिष्ठ कमावलीय तितकं कुणीही मिळवलेलं नाही.”
image


शाहरुख यांनी सानियाची चांगलीच प्रशंसा केली. ते म्हणाले,” ती रॅकेटची राणी आहे. सानियानं आपल्या देशाचा मान वाढवलाय. आपण पीटी उषा, मेरी कॉम आणि सानिया मिर्झा सारख्या लोकांना नेहमीच आठवणीत ठेवू. यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक मुलं आणि मुलींनी खेळांला एक करियर म्हणून पाहिलं. देशाचं नाव उंचावलं. यांनी आपल्या यशाच्या पाऊलखुणा मागे सोडल्यात. आपला यशाचा मार्ग तयार केला आहे.”

सानियाच्या आत्मकथेचं लोकार्पण करणं ही गौरवाची गोष्ट आहे असं किंग खान यांनी सांगितलं. ते म्हणाले,” माझ्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे की मी इथे आहे. माझी संपूर्ण कारकिर्द घडवण्यात महिलांचं महत्वपूर्ण योगदान आहे. माझ्या आईपासून ज्या अभिनेत्रींसोबत मी काम केलं, सर्वाचं योगदान आहे. महिलेची साथ प्रेरणादायक असते. मग तो खेळ असेल, घरगुती कामकाज किंवा मग गायन वा अभिनय. सर्वांना तिच्यापासून प्रेरणा मिळते. प्रत्येक महिलेकडे दुसऱ्यांना प्रेरित करायचा गुण असतो.”
image


शाहरुख पुढे म्हणाले की सानियानं छोट्या वयात खूप काही मिळवलंय. जगात दुसरीकडे कुठेच हे पहायला मिळत नाही. भारतीय खेळाडूंनी काही खेळ सोडले तर बाकी क्रीडा प्रकारात जास्त प्रभावशाली काम केलं नव्हतं. पण काही महिला क्रीडापटूंनी देश तसंच संपूर्ण जगावर आपला प्रभाव टाकला. यशाच्या उंच शिखरावर असलेल्या सानियापासून प्रेरणा घेऊन अनेकजण क्रीडाक्षेत्रात भारताचं नाव करतील. शाहरुख यांनी म्हटलं की ते सानियाला गेल्या इनेक वर्षांपासून ओळखतात आणि त्यांनी तिचा टेनिस कोर्टवरचा खेळ नेहमीच पाहिला आहे. शाहरुख सांगतात,” मी सानियाची कारकीर्द पाहिलेली आहे. सानियानं आपल्या खेळानं क्रीडाप्रेमींसाठी सन्मान आणि त्यात सौदर्य आणलंय.”

एका प्रश्नाच्या उत्तरावर शाहरुख म्हणाले, ” मी खुप नशीबवान आहे. मी दिल्लीहून मुंबईला आलो, खूप मेहनत घेतली आणि मला यश मिळत गेलं. यश हवं असेल तर मेहनतीला पर्याय नाही. मी यशस्वी आहे आणि ते यश टिकवून ठेवण्यासाठी मेहनत करावीच लागेल. जर मी अयशस्वी आहे तर यशाच्या मार्गावर जायलाही मेहनतच करावी लागेल.” ते सानिया बद्दल म्हणाले, “ सानियाचं नाव जगभरात पसरलंय, मी तिला खेळताना पाहिलंय. ती आपल्या खेळावर प्रेम करते. सानियाचं कुटुंब तिच्या नेहमी बरोबर राहिलंय. जेव्हा ती सिंगल्समध्ये जास्त काही करु शकली नाही तेव्हा तिनं डब्लसचा मार्ग निवडला आणि आता की नंबर 1 बनली आहे.”

image


शाहरुख म्हणाले” मला खूप बरं वाटतंय की मी चक दे इंडिया सिनेमात काम केलं. विविध क्रीडा प्रकारांवर बनलेले लगान, मेरी कॉम सारखे सिनेमे उत्तमं होते. मिल्खा सिंग तर अगदी उत्कृष्ठ होता. आता धोनीवर सिनेमा येतोय. सानियावर जेव्हा सिनेमा बनेल तेव्हा तो प्रेरणादायी असेल यात शंका नाही.”

सानियावर सिनेमा बनण्याबाबत किंग खान म्हणाले, “मला वाटतं सानियावर सिनेमा बनल्यास तो प्रेरणादायी आणि उत्तमच असेल. त्या सिनेमात तिच्या प्रियकराची भूमिका करायची संमती ती मला देईल का हे तिला विचारा, पण मी या सिनेमाची निर्मिती नक्कीच करेन.” किंग खान म्हणाले, सिनेमा मानवी भावनांनी प्रेरीत असतो. खेळात भावना असतात, भारतीय खेळाडू आपल्या देशासाठी खेळतात. वेगवेगळ्या देशात जाताना फक्त भारताचाच विचार करतात.

image


“मलाही खेळाडू व्हायचं होतं. देशाचं प्रतिनिधित्व करायचं होतं. मला हॉकीचा छंद होता. माझे वडीलही हॉकी खेळत. ते नेहमी वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोष्टी सांगत. त्यांनी मिल्खासिंग, ध्यानचंद यांच्या गोष्टी सांगितल्या. पण पाठीच्या दुखण्यामुळं मला खेळ सोडावा लागला.”

शाहरुख यांचं म्हणणं आहे विश्वासानं एखादी चांगली गोष्ट करण्यात काहीच गैर नाही. माझ्या मनात आणि डोक्यात काय चाललंय हे सांगणं त्यांना आवडतं. ते म्हणाले की हा फक्त एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम नाही तर सानियाकडून तिच्या अव्वलस्थानी जाण्याची गोष्ट ऐकण्याची संधी आहे. ते म्हणाले “मी स्टार किंवा मित्र म्हणून आलेलो नाही. मी अश्या महिलांच्या सन्मानासाठी आलोय ज्यांनी जागतिक स्तरावर आपलं नाव कमावलं. अश्या महिला फार कमी आहे.”

image


एका प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुख म्हणाले, “जर एखादी गोष्ट चांगली आहे, आनंद देणारी आहे, जे मी माझ्या सिनेमात केलंय आणि ते लोकांना आवडलंय, तर मी त्यांना चांगले क्षण म्हणेल. माझं काम लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणं आहे. मी तस करु शकलो नाही तर मी दु:खी होतो. पण यशस्वी होतो तेव्हा तेच घेऊन बसत नाही तर अपयशी झाल्यावर त्याचं रडगाणं घेऊन राहत नाही. त्यावर एक-दोनतास विचार करतो. मी अयशस्वी सिनेमाच्या विचारात जास्त राहू शकत नाही. मी पुन्हा नवीन काम करण्यासाठी सोमवारी नव्या उमेदीत कामाला जातो. दोन्ही परिस्थितीमध्ये मला पुढे काहीतरी करायचंच आहे. यशस्वी होण्यासाठी नेहमीच नव्यानं कामाला सुरुवात करत राहीन.”

"मी किती भावुक आहे हे माझ्या पुस्तकातून लोकांना समजेल" – सानिया मिर्झा

किंग खान शाहरुखनं सानियाला रॅकेटची रानी म्हणून संबोधलं. आपल्या आत्मकथेचं लोकांर्पण करताना ती म्हणाली की हे पुस्तक वाचल्यावर मी किती भावुक आहे समजेल. सानिया म्हणाली, “हा माझ्यासाठी खुप खास असा क्षण आहे. इतक्या कमी वयात आत्मकथा लिहिली जावी असं सहसा होत नाही. पण टेनिसमध्ये माझी मोठी कारकिर्द झालीय. हा संपूर्ण प्रवास खुप रंजक होता. 20 वर्षांच्या टेनिस कारकिर्दीची गोष्ट मी लोकांसमोर आणली आहे.”
image


सानिया म्हणाली, “ मी शाहरुख यांना विचारलं होतं की तुम्ही माझ्या आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या क्षणासाठी याला का ? आणि ते इथे आले. अल्लाहच्या मेहरबानीनं माझी कारकिर्द चांगली राहिलेय. कोर्टवर असतानाही आणि बाहेरही. मला खूप आनंद होतोय की मी हे सर्व लोकांसमोर आणतेय.”

या आत्मकथेत सानियाच्या टेनिस महिला डबल्समध्ये अव्व्लस्थानी पोचण्याची रंजक गोष्ट आहे. शिवाय तिला आपली स्वप्न साकार करण्यासाठी कुठल्या कुठल्या आव्हानांचा सामना करावा लागला याचं वर्णन आहे.. हार्पर कॉलिन्स हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.

image


सानिया सांगतात, तिनं आपल्या खासगी आयुष्यातल्या गोष्टी क्विचितच कुणाला सांगितल्या आहे. या आत्मकथेत तिनं आपल्या लग्नाबद्दल लिहिलंय. आयुष्यातल्या सर्वात कठिण परिस्थितीबद्दल ती सांगते, सर्वानांच अश्या कठीण परिस्थितीतून जावं लागतं. अनेक अडथळे येतात. त्याचा सामना वेगवेगळ्या पध्दतीनं करावा लागतो.”

आपल्या आयुष्यातल्या सर्वात कठिण परिस्थितीबद्दल सांगताना ती म्हणते,

“ माझ्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या. तिसरी शस्त्रक्रिया झाली तेव्हा खूप कठिण परिस्थिती होती. मी खेळूच शकत नव्हते. ज्या खेळावर माझं अतोनात प्रेम होतं तो मी खेळू शकत नव्हते. त्यापासून वेगळी झाले होते. दोन महिने मी खूप निराश राहिले. दोन-तीन आठवडे तर माझ्या खोलीतून बाहेरच पडले नाही. खाणं-झोपणं सर्व तिथंच. खूप वाईट स्थिती होती ती. या पुस्तकात मी कोण आहे, कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न मी केलाय. आनंद, प्रेम अश्या असंख्य क्षणांचे साक्षीदार आहे हे पुस्तक”

हे पुस्तक लोकांना आवडेल कारण यात त्यांच्या कारकीर्दीच्या रोचक गोष्टी आहे. असं सानियाला वाटतंय. ती म्हणाली, “डबल्सच्या अव्वल स्थानावर राहण्यासाठी मी संघर्ष करत राहील. मी अव्वल म्हणूनच कारकीर्द संपुष्टात आणेल. जेव्हा आपलं खेळातलं प्रदर्शन पडायला लागतं तेव्हा आपण तो खेळ खेळणं बंद करायला लागतो. असं होतं नेहमी पण अव्वल स्थानी असताना हा खेळ सोडायचं हे खूप कठिण काम आहे.” सानियानं आपल्या आत्तापर्यंतच्या कारकीर्दीच्या प्रत्येक घडामोडीचा आणि घटनाक्रमांचा आढावा या आत्मकथेत घेतलाय. हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी पाच वर्षे लागली.

एका प्रश्नावर सानिया म्हणाली, “ माझ्या आयुष्यात अनेक पेचप्रसंग आले. मी माझ्या अनेक स्वप्नांसा साकार केलंय. अव्वल स्थानी असणं हे मी आणि माझ्या परिवारासाठी आनंदाची गोष्ट आहे. अव्वल स्थान पटकावण्यासाठी करावी लागणाऱ्या मेहनतीची मज्जा आणि आनंद काहीसा वेगळाच आहे. आणि सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या देशाचं प्रतिनिधित्व करताय.”

सानिया मिर्झा सांगते,” लहानपणापासून माझं ऑलंपिक आणि विंबल्डनमध्ये खेळण्याचं स्वप्न आहे. या मोठ्या मंचावर भारताची सानिया मिर्झा अशी उद्घोषणा होताना ऐकणं माझ्यासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट आहे. ही गोष्ट विचार करुन आणखी आनंद होतो की संपूर्ण देश माझ्याबरोबर आहे आणि मी जागतिक स्तरावर अव्वल आहे. हेच माझं सर्वात मोठं यश आहे.” 


यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा

आता वाचा संबंधित कहाण्या :

त्रासदायक बालपणापासून भारतासाठी खेळण्यापर्यंत : सुरेश रैना एक कहाणी

भारतीय महिला क्रिकेटचा चमकता तारा : मिताली राज!

जळगावच्या मराठमोळ्या अनिमा पाटील-साबळे ठरणार तिस-या भारतीय 'अंतराळ वीरांगना'

    Share on
    close