भेटा या १७ वर्षीय कन्येला जिने दहा लाख रूपये गोळा केले लेह, लडाख मध्ये ग्रंथालय सुरू करण्यासाठी!

0

१७ वर्षांची मुलगी अनन्या सालुजा हिला अमोघ आनंद झाला आहे, कारण काही लोकांच्या चेह-यांवर तिने हास्य फुलवले आहे. यातूनच तिने प्रेरणा घेतली असून वर्षभर गरजूंना मदत करण्याचा संकल्प केला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अनन्या स्वयंसेवक म्हणून लेह लडाख मधील गावात गेली आणि तिने काही निधी संकलन तेथील ग्रंथालयाच्या मदतीसाठी सुरू केले जेणेकरून शाळाबाह्य मुलांना याचा उपयोग होवू शकेल. अनन्या हिला यामध्ये यश येत असून आता पर्यंत तिने दहा लाख रूपयांचा निधी जमा केला आहे.


दोन वर्षांपूर्वी अनन्या ही साधारण विद्यार्थीनी होती, जिला केवळ चिंता होती तिच्या अभ्यास आणि परिक्षांची सध्या ती मोलसरी गुरूग्राम येथे श्रीराम स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे. आणि १५ वर्षाची असताना तिला शाळाबाह्य मुलांना शिकवण्याची संधी मिळाली जो शाळेच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाचा भाग होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर, तिला अस्वस्थ वाटले आणि स्वत:हून हे काम सुरू ठेवण्याचे तिने ठरविले. याबाबतच्या वृत्तानुसार, अनन्या म्हणाली की, “ कार्यक्रमा दरम्यान मी माझ्या मुलींच्या खूप जवळची झाले, त्यांच्या चेह-यांवरचा तो आनंद पाहून मला ही संकल्पना जगात सर्वोत्तम असल्याचे जाणवले. मला वाटले की, मला इथेच थांबता येणार नाही.”

तिला १७००० फूट फाऊंडेशन (17,000 ft Foundation) बद्दल माहिती मिळाली, जे सुजाता साहू चालवितात, ज्या तिच्या माजी शिक्षिका आहेत. तिने त्यांना संपर्के केला आणि काही सेवा करता येईल का यासाठी विचारणा केली, आणि लडाखला जाण्याचा निर्णय घेतला.

उन्हाळ्यात तिने लेह लडाखला भेट दिली, जो आता तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. तिने २०१५ मध्ये ज्या गावांना भेटी दिल्या त्यात लिक्टसे, तूरटूक आणि तियालिंग यांचा समावेश होता. तेथे मुलांना तिने शिकवले. २०१६च्या उन्हाळ्यात तिने लेह जिल्ह्यात माथो येथे भेट दिली जेथे तिने मुलांसाठी खेळाचे मैदान तयार करण्यात पुढाकार घेतला. एका वृत्तानुसार अनन्या म्हणाली की, “ मी असामान्य काम करणारे सेवाभावी संस्थांचे लोक पाहिले, आणि तरीही मी दरवर्षी काही आठवड्यापेक्षा जास्त काही देवू शकले नाही. मग मी वेगळ्या प्रकारे त्यांना मदत करायचे ठरविले. मी त्यांना मदत करण्यासाठी निधी संकलन करण्याचे ठरविले, जेणेकरून त्यांना लेह जिल्ह्याच्या बाहेरच्या भागात विस्तार करता यावा आणि लडाखच्या कारगिल जिल्ह्यात ग्रंथालयाचा विस्तार करता यावा.

अनन्या हिच्याकडे सध्या १९ ग्रंथालये स्थापन करता येतील इतका निधी जमा झाला आहे. तिच्यासाठी ही तर केवळ सुरुवात आहे. तिने तिचे प्रयत्न सुरूच ठेवायचे ठरविले आहे आणि काश्मीर मधील मुलांसाठी शक्य ते सारे करण्याचे ठरविले आहे. (थिंक चेंज इंडिया)