व्यवसाय म्हणजे नफा नव्हे तर उत्पादन !

व्यवसाय म्हणजे नफा नव्हे तर उत्पादन !

Saturday November 28, 2015,

5 min Read

“जेंव्हा मी अनेकांच्या डोळ्यात पहाते तेव्हा मला चैतन्य दिसते. जेंव्हा मी तुमच्या डोळ्यात पहाते तेव्हा मला एक प्रकारची खिन्नता दिसते, एक रिकामे भोक, मृत भाग” तुम्ही हे सांगू शकता का? की हे मी कुणाबद्दल बोलतो आहे ते ? ओळखा पाहू ! मी खात्रीने सांगतो तुम्हाला ते सांगता येणार नाही. त्या जॉन स्कली यांच्या पत्नी होत्या जे ऍपलचे सीईओ होते आणि ज्यांनी स्टिव्ह जॉब्ज यांना खूप लोकप्रियता मिळवून दिली होती. स्कली यांना हे माहित होते की, जॉब्ज यांचा कंपनीतील सहवास त्यांच्या वृध्दीसाठी हानीकारक आहे आणि अखेर त्यांना संचालक मंडळाला हे पटवून देता आले की, जॉब्जने सोडून जावे.

स्कली आणो जॉब्ज दोघेही उध्वस्त झाले आणि बैठकीनंतर खूप रडले. स्कली यांनी त्यांचा जय झाल्याने राजीनामा देण्याचे ठरवले होते, त्यांच्या पत्नीला विश्वासघाताने जॉब्जला फसवल्यासारखे वाटले आणि त्याच्या वागण्यातून ते दिसून आले होते. त्यांनी ठरवले की जॉब्जचे सांत्वन करावे. त्या जॉब्जला पार्किंग लॉटमध्ये भेटल्या. जॉब्जने त्यांच्याशी नजर देणे टाळले. त्यांनी त्याला समोर बघण्यास सांगितले आणि म्हणाल्या, “ मी बोलताना तू माझ्याकडे पाहणार नाहीस का? शेवटी त्याने पाहिले आणि हे वरील शब्द त्यांनी उच्चारले.


image


कुणालाही वाटेल की जॉब्ज निर्दय होता, त्याला रितीरिवाज नव्हते, प्रेम नव्हते, आणि असंवेदनशील माणुस होता जो एका उच्चजागी पोहोचला होता. शक्यता आहे की त्याच्या बाबत हे सारे खरे होते. तो काम करण्यासाठी सर्वात कठीण माणूस होता. तो फारच कमी वेळा छापील शब्द वापरत होता आणि उत्पादनांचा फारच कमी खाजगीत तसेच लोकांतही फेरआढावा घेत होता. त्याच्या सहका-यांमध्ये तो काही फार चांगला माणूस नव्हता. टिना रेडेस यांच्या बाबतीत जॉब्जने मान्य केले होते की, त्या अशा पहिल्या व्यक्ती होत्या ज्यांच्याशी त्याने खरे प्रेम केले, ज्यांना त्याने लग्नाबाबत विचारले आणि त्यांनी त्याच्याशी विवाह केला नाही. त्या म्हणाल्या होत्या की, “मी स्टिव्ह जॉब्जची चांगली पत्नी होऊ शकत नाही. जो आदर्श आहे. मी माझ्याच पातळीवर गुंतले आहे. आमच्या खाजगी भेटीत, मी त्याच्या निर्दयतेची बांधील नव्हते. मला त्याला दुखवायचे नव्हते. तसेच मला त्याचे समर्थनही करायचे नव्हते आणि त्याने इतरांना दुखावलेले पहायचेही नव्हते.” टिना यांना माहिती होते की स्टिव्ह यांना “नँरसिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर” अर्थात आत्ममोही व्यक्तित्व विकार होता.

तरीही तो असामान्य प्रतिभाशाली होता आणि असे लोक सर्वसाधारण माणसांसारखे नसतात. जॉब्ज रस्त्यात अनवाणी पायांनी चालणारा होता आणि अत्यंत यातानाकारक अशा त्याच्या आहार घेण्याच्या सवयीचे त्याने शेवटपर्यंत पालन केले. तो केवळ भाजीपाला आणि फळांवर जगत होता आणि काहीवेळा तो सप्ताहभर उपास करत होता. तो त्याची कार नेहमीच अपंगांच्या जागेत उभी करत होता. तुम्हाला माहिती आहे का त्याला त्याच्या पहिल्या कामात दिवसपाळीवरून काढून टाकले होते, कारण त्याच्या अंगाला दुर्गंध यायचा आणि अनेक दिवस तो आंघोळीविना राहायचा, त्याला डिओडोरेंट (दुर्गंधीनाशक ) वापरायलाही आवडत नव्हते. भारताच्या अरुंद रस्त्यांवर तो शांतीच्या आणि आत्मशुध्दीच्या शोधात भटकला होता आणि त्याचा आत्मचरित्रकार वॉल्टर इसाक्सनच्या नुसार त्याने ठरवले होते की, त्याला पुजेचे काहीच करायचे नव्हते आणि चर्चमध्ये पुन्हा जायचे नव्हते. जेंव्हा तो मृत्यूशय्येवर होता त्याने इसाक्सनला सांगितले होते की, “मी देवावर विश्वास ठेवण्यात फिफ्टी-फिफ्टी आहे.’”

मात्र एका बाबतीत तो ठाम होता की त्याचा जन्म जग बदलण्यासाठी होता आणि त्याने ते करून दाखवले. तो एक मुख्य कार्यकारी अधिकारी होता ज्याने कधीच नफ्यासाठी हावरेपणा केला नाही जसे बिल गेटसने केले. त्याच्याबद्दल त्याला फारच कमी आदर होता. कारण तो असे मानत होता की बिल गेटस याने त्याचे जीवन पैसा कमाविण्यात वाया घातले होते.जॉब्जचे म्हणणे कदाचित योग्यही नसेल. तो सुध्दा तितकाच श्रीमंत होता पण त्याने त्याच्या तत्वज्ञानाचा वापर व्यवसायातील क्रांतीसाठी केला. त्याने उत्पादने तयार केली आणि जग बदलले. बॉब डायलन त्याचे प्रेरणास्थान होते ज्याच्यावर तो श्रध्दा ठेवत होता. “जर तुम्ही जन्मत:च व्यस्त नसता, तर तुम्ही मरणात व्यस्त असता.” जेंव्हा जॉब्जला त्याच्या सहका-यांनीच हिणवले की त्याने अशी उत्पादने बनविली जी त्याच्याच आधीच्या उत्पादनाना मारक होती, तो म्हणला होता की, “जर तुम्हाला स्वत:ला वळवता येत नसेल, इतरांनाही येणार नाही” त्याचा व्यवसायाचा नियम होता की, स्वत:ला वळवण्याची भिती मनात बाळगू नका.

यात काही आश्चर्य नाही की संगीतक्षेत्रात आयपॉडने सतत बदल झाले आणि इंटरनेटचे विश्वही बदलले. त्याने ऍपलमध्ये १९९७मध्ये प्रवेश केला जेंव्हा ती दिवाळखोरीत चालली होती. आणि २०१०मध्ये तो मायक्रोसॉफ्टशी महसूलात स्पर्धा करत होता जी दोन दशकातील निर्विवादपणे महाकाय कंपनी झाली होती. आणि आज ऍपल हा खूपच मौल्यवान ब्रँड समजला जातो. इसाक्सन म्हणतात की शंभर वर्षे तरी आता जॉब्जचे नाव घेतले जाईल जेंव्हा एडिसन आणि फोर्ड इत्यादींचा या शतकाचा विचार केला जाईल. आणि त्याचे रहस्य होते त्याचे नवी उत्पादने बनविण्याचे वेड. सर्वांच्या पुढे जाण्याचा तो सातत्याने विचार करत होता. संशोधन, संशोधन आणि संशोधन हाच त्याचा ध्यास होता.

जेंव्हा सारेजण एका खुल्या पध्दतीबाबत बोलत होते आणि मायक्रोसॉफ्टला विंडोजमध्ये यश मिळाले होते, जॉब्जला मात्र प्रत्येकवेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्हीतल्या नाविन्याचा ध्यास होता. तो एक कठोर परिश्रम करणारा उत्पादन कर्ता होता. त्याच्यासाठी उत्पादन विकास करणे म्हणजेच शास्त्र आणि कला होती शेवटी तो व्यवसाय होता. त्याच्यासाठी उत्पादन तयार करणे म्हणजे पिकासोसारखे पेंटिंग तयार करण्यासारखे होते. आणि अडचणीतून मार्ग काढण्यात त्याची हातोटी होती. आयफोन आणि आयपँड या वापरण्यास सोप्या तंत्रांच्या गोष्टी होत्या, युजर फ्रेंडली असणा-या. सौंदर्याची उपासना त्याच्या रक्तातच होती आणि त्याने त्याच्या सहका-यांना त्या गोष्टींचे वेड लावले ज्या आगळ्या होत्या. आणि त्याने त्यांना याचा आग्रह धरला जरी त्यांनी त्याला ह्रदयशुन्य, निर्दयी समजले तरी.

सध्याच्या काळात विक्री प्रतिनिधी राजे आणि राण्या आहेत. त्यांचीच सर्वत्र सत्ता चालते. जॉब्ज त्यांचा मत्सर करत असे. तो म्हणत असे की, “ जेंव्हा विक्रीतील लोक कंपनी चालवतात, उत्पादन करणाऱ्यांकडे जास्त लक्ष देत नाहीत आणि अनेक जण सोडून जातात." अशा विक्री प्रतिनिधींमुळे मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएमचा बाजारभाव कमी झाल्याचे उदाहरण त्याने दिले. त्याने स्थितीवादासमोर बंड केले. ग्राहकांना हवे ते देण्याच्या बाजाराच्या वृत्तीचा त्याने विरोध केला. जॉब्ज फोर्ड सारखाच प्रेषितवादी होता. ‘ ‘लोकांना ते माहिती नाही जोवर तुम्ही ते सांगत नाही” अशा मताचा तो होता. पण तो स्वत: देखील एक विक्री प्रतिनिधी होता. त्याने बाजारात आणलेल्या प्रत्येक उत्पादनाला एखाद्या जादुगाराप्रमाणे विकले. असे उत्पादन जे पूर्वी कधीच निघाले नव्हते. त्याने बाजारात लाटा निर्माण केल्या. पण हा विक्री प्रतिनिधी वेगळाच होता. त्याला स्टिव्ह जॉब्ज म्हणतात. एक विचित्र एक धडाडीचा. कारण जे लोक धडाकेबाज असतात ते विचारही तसाच करतात आणि तेच जग बदलू शकतात. त्यांच्या पैकीच तो होता” म्हणून मी स्कली यांच्या पत्नीशी असहमत आहे, जॉब्ज काही तसा माणूस नव्हता जसा त्या समजत होत्या. तो स्टिव्ह जॉब्ज होता. एका प्रकारचा त्याच्या सहका-यांना न उमगलेला "भावशून्य" आणि नेहमीच शोधातील वास्तव शोधताना अचूकतेचा वेध घेणारा.


मूळ इंग्रजी लेखक : पत्रकार आशुतोष आणि आम आदमी पक्षाचे नेते

अनुवाद : नंदिनी वानखडे -पाटील

    Share on
    close