मुंबईच्या 'बीकेसी'त झाला ग्लोबल सिटीझन महोत्सव : पक्षीय मतभेद सारुन युवानेते एकत्र!

0

मुंबईच्या तरुणाईने ग्लोबल सिटीझन महोत्सवमध्ये ‘कोल्ड प्ले’ या जागतिक किर्तीच्या वाद्यवृंदाचा आनंद अनुभवला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या तरुणाईला संबोधित करताना ही तरुणाईची उर्जा देशासमोरच्या समस्याशी लढताना मला स्फूर्ती देते असे सांगितले. खांद्याला खांदा लावून देशातील सफाई करु असे आवाहन मोदीं यांनी या तरुणाईला केले.‘कोल्डप्ले’ बँडच्या कार्यक्रमावेळी मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

देशातील ‘स्वच्छ भारत’ अभियानाप्रमाणे तरुणाईने काळ्यापैशाच्या सफाईमध्ये देखील सरकारची साथ द्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणाईला केले आहे. ‘ग्लोबल सिटिझन’ या संस्थेसोबत सुरेल प्रवास करणारा ‘कोल्डप्ले’ हा बँडच्या पहिला कार्यक्रम मुंबईत काल १९ नोव्हे.२०१६ या दिवशी सादर झाला. दोन वर्षापूर्वी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचा सुंदर सोहळा अनुभवला होता, त्या आठवणी जाग्या झाल्या. तुमच्यापैकी अनेक तरूण माझ्याशी मोबाइल अॅपद्वारे जोडले गेले आहेत. असे सांगत तरुण वर्गाकडून मला शक्ती मिळते’ असेही मोदींनी म्हटले.

या कार्यक्रमात यावेळी आणखी एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली ती म्हणजे वेगवेगळ्या राजकीय पक्षातील युवा नेतृत्व यावेळी एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले. भाजपा खासदार पूनम महाजन, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा राजकारणातील हे युवा नेतृत्व एकमेकांमधील मतभेद विसरुन व्यासपीठावर एकत्र आले. यावेळी महिला सशक्तीकरण, स्वच्छता आणि शिक्षणासाठी पक्षीय मतभेद बाजून सारुन एकत्र येण्याचा संदेश या तिन्ही युवा नेत्यांनी ग्लोबल सिटीझन महोत्सवादरम्यान दिला.

ग्लोबल सिटीझन : अस्वच्छतेविरुद्धचा सामना जिंकायचा आहे - सचिन


- अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढले असून देशभरात सर्वाधिक मृत्यू त्यामुळेच होतात, असे सांगत ' अस्वच्छतेविरोधातील हा सामना आपणा सर्वांना जिंकायचाच आहे' असे आवाहन क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने केले. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ' ग्लोबल सिटीझन' महोत्सवादरम्यान सचिनने तरूणांशी संवाद साधला.

यावेळी त्याने तरूणांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. ' देशामध्ये आजही डायरिसारख्या अनेक संसर्गजन्य रोगांमुळे अनेकांचे प्राण जातात. हे थांबवायचे असेल तर आपणा सर्वांना मिळून अस्वच्छतेविरोधातील मोहिम तीव्र करून लढा द्यावा लागेल. हे सहज शक्यही आहे, त्यासाठी केवळ दोन गोष्टी कराव्या लागतील. १) काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आणि २) शौचाला जाऊन आल्यानंतरही हात स्वच्छ करणे' असा कानमंत्र देत सचिनने हा सामना सर्वांना जिंकायचाच आहे असा निर्धार व्यक्त केला. तरूणांनीही आपल्या लाडक्या आयकॉनच्या नावाचा जयघोष करतानाच अस्वच्छेतेविरोधात लढा देण्याची प्रतिज्ञा केली. जगाला वेड लावणाऱ्या या बँडने मुंबईच्या पाश्चात्य संगीतप्रेमींमध्येही उत्साहाची लाट उसळली.