एक चहा बनविणारा बनला चार्टर्ड अकौंटंट, महाराष्ट्र सरकारच्या 'कमवा आणि शिका' योजनेचा ब्रांड एम्बेसडर !

0

जे लोक अपयशानंतर जीवनात संसाधनांच्या कमतरतेमुळे रडतात, ते खरं तर आपल्या संसाधनांवर नव्हे तर स्वतःच्या कमतरतेवर रडतात, ते स्वतःच्या चुका लपवितात. त्यांच्या मेहनत करण्यात एक कमतरता अशी राहते, ज्यामुळे ते आपले लक्ष्य गाठू शकत नाहीत. आता अशी एक कहाणी सांगणार आहोत, ज्यानंतर विश्वास बसेल की, हिम्मत हारू नये, मन लावून योग्य दिशेने परिश्रम करत रहावे, तेव्हा निश्चितच लक्ष्य गाठले जाऊ शकते.

ही कहाणी २८वर्षांच्या सोमनाथ गिराम यांची आहे. त्या सोमनाथ गिरामांची, ज्यांना लोक काही दिवसापूर्वीपर्यंत चहा विकणारा म्हणून ओळखत होते. ते सोमनाथ, ज्यांच्या दुकानावर लोक चहा प्यायला जायचे आणि आपल्या आवडीचा चहा बनविण्याचे पैसे द्यायचे आणि तेथून निघून जायचे. ते सोमनाथ, ज्यांना कुणीही हे कधीच विचारले नाही की, त्यांना आयुष्यात काय करायचे आहे? मात्र काही दिवसातच असे काय झाले, ज्यामुळे त्यांची ओळख बदलली...? हो, आता त्यांची चहा बनविणारा ही ओळख बदलली आहे. आता नव्याने ऐका त्यांची ओळख. नाव – सोमनाथ गिराम, सनदी लेखापरीक्षक. (चार्टर्ड अकौंटंट) पुण्याच्या सदाशिव पेठ येथे चहा विकतात, मात्र चहा विकता विकता त्यांनी असे काहीतरी करून दाखविले की, आज त्यांना भेटायला मोठी लांब रांग लागली आहे. मात्र, लोकांची ही रांग चहा पिण्यासाठी नव्हे तर, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आहे. सोमनाथ गिराम आता चहा विकणारे नव्हे तर, चार्टर्ड अकाउंटंट बनले आहेत. चार्टर्ड अकाउंटंट सोमनाथ गिराम. काल पर्यंत लोकांना चहा बनवून विकणारे, साधारण दिसणा-या या चहा विकणा-याने खूपच कठीण समजली जाणारी ‘सीए’ ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सोमनाथ यांना अंतिम परीक्षेत ५५ टक्के गुण मिळाले.

असे म्हणतात की, जेव्हा सुख येते, तेव्हा ती केवळ घरातील दरवाजातूनच येत नाही तर, जेथून त्याला संधी मिळते तेथून ते घरात येते. सोमनाथ गिराम यांच्यासाठी दुप्पट सुखं एकत्र आली. इकडे सीए चा निर्णय आणि दुसरीकडे राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र सरकारचा (अर्न एंड लर्न) ‘कमवा आणि शिका’ योजनेचा ब्रांड एम्बेसडर (राजदूत) म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली. आता सोमनाथ गिराम केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर, संपूर्ण देशातील अशा विद्यार्थ्यांचे आदर्श बनले आहेत, जे संसाधनांच्या कमतरतेमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत. मात्र शिक्षण सोडू देखील इच्छित नाहीत. राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले की, ही खूपच आनंदाची बाब आहे की, एक चहा विकणा-याने सीए सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आहे, आम्ही त्यांचा सत्कार केला आहे. शिक्षण मंत्री तावडे यांनी सांगितले की, “सध्या देशात चहा विकणा-यांसाठी चांगले दिवस आहेत, नरेंद्रजी पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचले, तर सोमनाथ यांनी सीए सारख्या कठीण परीक्षेत यश संपादन केले आहे”. तावडे यांनी सांगितले की,

“सीए ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला की, आम्ही सोमनाथ यांना ‘लर्न एंड अर्न’ योजनेचा ब्रांड एम्बेसडर बनवू, जेणेकरून अशा अनेक विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळेल”.

महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील एक लहानसे गाव सांगवीला राहणा-या सोमनाथ यांच्यात लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. मात्र गरिबीमुळे त्यांचे शिक्षण होऊ शकले नाही. घरातील गरिबी दूर करण्यासाठी सोमनाथ यांना पैसे कमविण्यासाठी गावाबाहेर पडावे लागले. असे म्हणतात की, गरीबीची भूक खूपच भयानक असते. अशातच त्यांना जेवण देखील मिळाले नाही तर, समोरचा काहीही करण्यासाठी तयार होतो. जेव्हा सोमनाथ यांना काही समजले नाही तेव्हा, त्यांनी पुण्याच्या सदाशिव पेठ भागात एक लहानशी चहाची टपरी उघडली. त्यामुळे कसे- बसे सोमनाथ आणि त्यांच्या घरातल्या लोकांचे जीवन चालायला लागले. मात्र सोमनाथ यांच्यात शिक्षणाची जी जिद्द होती, ती विषम परिस्थितीत देखील जिवंत होती. चहाच्या दुकानामुळे थोडे पैसे येऊ लागले, तेव्हा शिक्षणाची त्यांची उत्कट इच्छा अजून वाढायला लागली. सोमनाथ यांनी एक लक्ष्य निश्चित केले. सीए करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कठोर परिश्रम करणे सुरु केले. दिवसा अभ्यासासाठी वेळ मिळाला नाही तर ते रात्री रात्री जागून परीक्षेची तयारी करत असत आणि त्याचे नोट्स बनवत असत.

या कहाणीला देखील वाचा :

दिल्लीमध्ये अशी बँक जिथे रुपये-पैसे नाही, ‘रोटी’ केली जाते जमा, गरजूंना दिले जाते भोजन !

‘युअर स्टोरी’शी संवाद साधताना सोमनाथ गिराम सांगतात की,

“मला हा विश्वास होता की, सीए ची परीक्षा नक्की उत्तीर्ण करेन. असे असूनही सर्व बोलायचे की, हे खूपच कठीण आहे, मी करू शकणार नाही. काही लोकांनी तर हे देखील सांगितले की, चार्टर्ड अकाउंटेंट बनण्यासाठी चांगले इंग्रजी येणे गरजेचे आहे. कारण मला, मराठी व्यतिरिक्त चांगली हिंदी देखील येत नव्हती. मात्र, मी हार पत्करली नाही. प्रयत्न करत राहिलो. पहिले मी बँकिंग एंड फायनान्स मध्ये मराठी माध्यमातूनच बीए उत्तीर्ण झालो. आणि आज माझे स्वप्न पूर्ण झाले”.

एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या सोमनाथ यांचे पिता बळीराम गिराम एक सामान्य शेतकरी आहेत. महाराष्ट्रात शेतक-यांची खराब परिस्थिती चांगलीच माहित असलेल्या, सोमनाथ यांनी पहिल्यापासूनच विचार केला होता की, आपल्या आर्थिक परिस्थितीला मजबूत करण्यासाठी काहीतरी मोठे करावे लागेल. आणि येथूनच त्यांचा सीए बनण्याचा प्रवास सुरु झाला. २००६ मध्ये सोमनाथ आपले गाव सांगवी येथून पुण्याला गेले, जेथे त्यांनी साहू महाविद्यालयातून बीए ची परीक्षा उत्तीर्ण केली. बीएची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर सीए करण्यासाठी आवश्यक आर्टिकलशिप सुरु केली. त्या दरम्यान त्यांना आर्थिक चणचण जाणवू लागली. सोमनाथ यांनी ‘युअर स्टोरी’ला सांगितले की,

“एक अशीही वेळ आली जेव्हा मला वाटले की, मी आता सीए नाही करू शकत. आर्थिक परिस्थिती खूपच खराब झाली होती, घरच्यांसाठी देखील खूपच समस्या निर्माण झाली. मात्र मी हिम्मत हारली नाही आणि चहाचे दुकान सुरु केले. चहाच्या दुकानाने पुण्यात राहण्यासाठी खर्चाची चिंता दूर केली आणि माझे सीए बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले”.

राज्य सरकारकडून ब्रांड एम्बेसडर म्हणून नियुक्त करण्यात आल्यावर ‘यूअर स्टोरी’ला आपल्या प्रतिक्रिया देताना सोमनाथ यांनी सांगितले की,

‘मी खूप खुश आहे की, राज्य सरकारने मला “कमवा आणि शिका” (अर्न एंड लर्न) योजनेचे ब्रांड एम्बेसडर म्हणून नियुक्त केले आहे.”

आपल्या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबियांना देताना सोमनाथ सांगतात की, त्यांच्या यशामागे कुटुंबियांचे मोठे योगदान आहे, त्यांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. आज सोमनाथ यांच्या डोळ्यात त्यांचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतरची निश्चिंतता बघितली जाऊ शकते. खूप मोठ्या प्रवासानंतर सोमनाथ यांनी यशाचे झेंडे रोवले आहेत, पुढे जाऊन सोमनाथ यांचा गरीब मुलांना शिक्षणात मदत करण्याचा संकल्प आहे.

सोमनाथ यांच्या या जिद्दीला सलाम, जीवनात त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

लेखक : निरज सिंग

अनुवाद : किशोर आपटे.

अशा अजून प्रेरणादायी कथा वाचण्यासाठी आमच्या पेज Facebook ला लाईक करा

आता वाचा या संबंधित कहाण्या :

बालपणी पुस्तकांना वंचित राहिलेल्या, आज 'रिड इंडियां'च्या संचालिका! गीता मल्होत्रांचा अनोखा जीवनप्रवास!

एका गरीब कामगाराच्या मुलीचा वयाच्या १५ व्या वर्षी पीएचडीसाठी प्रवेश !

डोळे गेले, पण दृष्टी यशाच्या वाटेवरच... आशिष गोयल जगातले पहिले ‘ब्लाइंड ट्रेडर’