भारतातील या विद्यापिठाने तृतीयपंथीयाना शुल्कमाफी दिली आहे!

0

तामिळनाडू मधील मनोनमनियम सूंदरानार विद्यापिठाने (MSU) प्रथमच तृतीयपंथीयांना सर्व प्रकारच्या मोफत शिक्षणासाठी दरवाजे उघडे केले आहेत. यामध्ये पदवीपर्यंतचे आणि अगदी डॉक्टरेटपर्यंतचे सारे शिक्षण मोफत दिले जाणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून ही योजना लागू झाली आहे, त्यामुळे तृतीयपंथी समाजाच्या लोकांच्या जीवनात शैक्षणिक आणि पर्यायाने आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा झाला आहे.


MSU ची स्थापना १९९० मध्ये झाली आणि त्यांच्याशी सलग्न महाविद्यालयातून ६५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यापिठाचे कुलगुरू के. भास्कर यांनी या उपक्रमामागचा हेतू विशद करताना सांगितले की, “ समाजाने उपेक्षा केल्यानंतर, अगदी त्यांच्या पालकांनी देखील हेळसांड केल्यानंतर, तृतीयपंथीयाना रस्त्यांवर भिक मागण्याशिवाय कोणताच पर्याय शिल्लक नसतो. जर आपण त्यांना अनुकूल स्थिती निर्माण करू शकलो, चांगले शिक्षण देवू शकलो,त्यांना चांगल्या प्रकारचे जीवन जगण्याची क्षमता मिळवून देता येवू शकेल. जेणे करून ते सरकारी किंवा खाजगी ठिकाणी नोकरी करतील. त्यामुळेच एमएसयू ने हे पाऊल उचलले आहे.”


प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या आहेत की, सर्व महाविद्यालयातून अशा विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या बाथरूम्सची सुविधा निर्माण करून द्यावी. जेणे करून हे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक आणि त्यांना भेटायला येणारे पाहूणे यांची सोय होणार आहे. तामिळनाडूने काळाच्या पुढे पाऊल टाकत तृतीयपंथी समाजाच्या भल्यासाठी महत्वाचे पाऊल टाकले आहे. मग ते मागील वर्षी पहिल्या पोलिस अधिका-यांची नियुक्ती असू दे किंवा २००९ मध्ये तृतीयपंथीयाना परेडचे यजमान पद देण्याचा निर्णय असू दे.

या बाबतच्या एका वृत्तात म्हटले आहे की,अशा प्रकारच्या उपक्रमाबाबत विद्यापिठाला विश्वास आहे की, “ तृतीयपंथी समाजातील सालेम येतील व्यक्ती पहिल्यांदाच पोलिस उपनिरिक्षक होवू शकते याचा अर्थ तामिळनाडू मध्ये त्यांना योग्य संधी मिळाली तर जीवनात प्रगती करण्यास ते सक्षम आहेत असा होतो. आम्ही शुल्क माफी जाहीर करून समानतेच्या पातळीवर एमएसयू तृतीयपंथी समाजाच्या भल्यासाठी अग्रेसर आहे हेच सांगू शकतो. त्यांच्या सन्मानपूर्वक जीवनाची आम्ही हमी देतो आहोत.”

MSU' चा हा उपक्रम सकारात्मकतेच्या दिशने टाकलेले पाऊल आहे, हे अश्वस्थ करणारा की प्रत्येक मानवाला प्रगती करण्याचा समान अधिकार असला पाहिजे.

(थिंक चेंज इंडिया)