चेन्नईच्या या तरुणाला भेटा ज्याने त्याच्या आजोबांना हा हातपंखा भेट दिला!

0

देशात वीज टंचाईच्या समस्येशी अनेक लोक झगडत असतात. लघुउद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसतो कारण त्यापैकी अनेकांना जनरेटर्स आणि इनव्हर्टर्स परवडत नाहीत.

आपण सर्वजण, काहीवेळा, मागच्या पिढ्यांच्या काळात त्यांनी काय त्रास भोगला असेल याची कल्पना करतो. चेन्नईच्या या तरुणाने सहजपणे विचार केला आणि त्याच्या आजोबांसाठी जे हातमागावर काम करतात, त्यांच्यासाठी हातपंखा तयार केला. अलिकडेच त्यांने त्याबाबतचा व्हिडिओ फेसबुक वर वितरीत केला. त्यात त्यांचे आजोबा काम करताना दिसत होते.


दिनेश जीएस हा अभियांत्रिकीचा  विद्यार्थी आहे. त्याच्या बालपणात त्याने  आजोबाना पाहिले आहे ते हातमागावर काबाडकष्ट करतानाच, त्यावेळी चेन्नईत विज भारनियम नेहमीचे होते. आजोबांना काहीतरी चागली मदत करावी असे वाटल्याने दिनेश यांनी हातमागालाच पंखा बसवला जो हाताने चालवता येतो, त्यामुळे त्यांच्या आजोबांना थंड वाटते.