जेन मॅसन एक प्रवास : वकील, योगगुरू ते चाॅकलेट मेकर

0

कॅडबरी, चाॅकलेट सॉस किंवा चाॅकलेट मेवा असो त्यातला महत्वाचा घटक म्हणजे चाॅकलेट,पण चाॅकलेट खाण्याला काही मर्यादा आहेत त्यातील कॅफेन आणि मेदामुळे. परंतु यासंदर्भातील नवीन शोधामुळे आता आपण मनसोक्त चाॅकलेट खाऊ शकतो. जर 'कोको ' हा शब्द एकून तुमच्या तोंडाला पाणी सुटत असेल तर तुमचं स्वागत आहे एका खाद्यपर्वणीसाठी.

जेन मॅसनचा जन्म ऑस्ट्रेलियातील सिडनीत झाला. तिने वयाच्या तेविसाव्या वर्षी पहिला प्रवास केला आणि तेथून पुढे व्यवसायाच्या निमित्ताने ती जगभर फिरली. योगगुरू आणि स्वयंपाकी होण्याअगोदर तिने वकिलीचं शिक्षण घेऊन वकिलीही केली. मग ती ऑरोविलला (योगाकेंद्र) चाॅकलेट बनवायला शिकली. ती म्हणते, " मी भारतात आले ते योगा आणि ऑरोविलसाठी. मी शाकाहारी आणि आरोग्य जपणारी असल्याने इथले चाॅकलेट खाऊ शकत नाही कारण त्यात भरपूर प्रमाणात दूध आणि साखर असते, तसेच हे पदार्थ शाश्वत आणि नैसर्गिक प्रक्रिया वापरात नाही ज्याला मी महत्व देते.


मॅसन आणि कंपनी

मॅसन आणि कंपनी ही तामिळनाडू योगाकेंद्रातील कोको बियांपासून शाकाहारी कॅडबरी बनवणारी कंपनी आहे. कोको बियांपासून निष्णात कारागीर हाताने चाकलेट बनवतात. ह्यात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने चांगली गुणवत्ता राखून प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. आमच्या शेतकऱ्यापासून ते उत्पादन विक्रीपर्यंत आम्ही एक पुरवठा साखळीही राबवतो, विशेष म्हणजे आम्ही काहीही वाया न घालवता नैसर्गिक शेतीशी थेट संबंध असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करतो.

सभोवतालच्या खेड्यातील पाच महिलांचा समूह त्यांच्याकडे कार्यरत आहे. फक्त महिला कामावर ठेवल्याने सुरक्षित आणि निकोप वातावरण राहतं, जिथं त्यांना स्वायत्ता, जबाबदारी आणि संधी ही त्रिसूत्री व्यक्तिमत्व विकासासाठी उपयोगी पडते तसंच कठोर मेहनत करणाऱ्यांना बक्षीसही दिलं जातं.


नैसर्गिकतेची आवड

जेनला वाटतं की सेंद्रीय मालाला नक्कीच चांगला भाव मिळायला लागलाय, पण तरी अद्यापही  शेतकऱ्याला त्याच्या मालाला ओळख आणि दुकान मिळवण्यासाठी खूप झगडावे लागते जेन म्हणते " खूप चांगला अनुभव आहे निसर्ग (सेंद्रीय) शेती करणाऱ्यासोबत काम करण्याचा कारण त्यांनादेखील काहीतरी वेगळं किंवा चांगलं करायचं आहे. ते जुन्या सवयी बदलून नवीन कल्पना स्वीकारायला तयार आहेत. सेंद्रीय कोको बियांना आणि रासायनिक बियांना सारखाचं भाव मिळतो हे पाहून मला दु:ख होतं. आम्हाला आशा आहे कोको मालाला भारतात योग्य भाव मिळेल, बाजार मिळेल आणि हे सगळं बदलेल."

अडचणी

जेनसाठी भाषिक अडचण ही खूप मोठा अडथळा होती. ती देशभरात माल पुरवते मग तो कच्चा माल असो वा पक्का आणि मग भाषिक अडचणीमुळे हे सगळं कठीण होऊन बसतं. तिला विश्वास आहे की भारतात खूप संधी आहेत चांगल्या मनोवृत्तीच्या माणसांसाठी पण तुमची इच्छाशक्ती  प्रबळ हवी.

" चांगल्या दर्जाच्या कोको बिया शोधणं म्हणजे एक मोठ्ठ आव्हान आहे ....आम्ही आमचं चाॅकलेट बनवायला दुय्यम दर्जाच्या कोको बिया वापरत नाही आम्हाला खूप वर्ष लागलेत शेतकरी शोधायला, भागीदार बनवायला आणि एक नातं बनवायला, ह्यात आम्ही बराचं वेळ खर्च केलाय."

नवीन वाटचाल करतांना

जेन म्हणते ,"भारतातील लोकांचा डार्क चाकलेट बनविण्याचा दृष्टीकोन बदलण्यापासून ते लोकांना उत्तम दर्जाचे चाकलेट देणं हा मूर्खपणा आहे की काय ? असं सुरवातीला वाटलेलं, पण नाही, डार्क चाॅकलेटला चांगला प्रतिसाद आणि मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले. " तिचा प्रवास खडतर होता पण ती एका हुशार विद्यार्थिनीसारखी दरदिवशी शिकतेय आणि भविष्याबद्दल खूप उत्साहीदेखील आहे.

एक गोष्ट जी तिला चालना देते ती म्हणजे चाॅकलेट आणि स्त्रीकामगार, ज्या खूप मेहनती आहेत आणि ती म्हणते, मला गर्व आहे त्यांच्या कामाचा..... जे मला खूप आनंद देते.

मी भाग्यवान आहे म्हणून मला असा चांगला समूह मिळालाय. तिला वाटतं उद्योग जगतात स्त्री असुरक्षित आहे पण ती भाग्यवान आहे कारण तिच्या वाढीस आणि विस्तारात तिला ह्या जगातल्या माणसांचा आधार मिळालाय.

मला वाटतं उद्योग जगतातील स्त्रियांना काही कमी अडचणी नाही. त्यांच्या  अडचणी वेगळ्या आहेत. एक वेगळं स्वातंत्र्य मिळतं जेव्हा तुम्ही उद्योगी बनता आणि इथं तर पुरुषांचा घोळका पण नाहीये, असुरक्षितता नाहीये. ह्याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना समाजातील रूढी परंपरांच्या अडचणींना सामोरे जावे लागत नाही. ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या कामावर, त्यांच्याकडून असणाऱ्या अपेक्षांवर आणि पर्यायाने त्यांच्या यशाच्या मुल्यमापनावर होतो, हेही ती नमूद करते.


लेखिका : दिव्या चंद्रा

अनुवाद : शिल्पा खरे