अक्षय कुमार तयार करणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत देणारे अॅप

अक्षय कुमार तयार करणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत देणारे अॅप

Friday February 03, 2017,

1 min Read

अक्षयकुमार हे सर्वज्ञात मानवतावादी आणि विचारवंत म्हणूनही प्रसिध्द आहेत, आणि याबाबत त्यांच्या ट्वीटर हँन्डलवरुन त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. त्यांनी यापूर्वी महिलांच्या सुरक्षेबाबत सांगितले आहे की, महिलांचा सन्मान हे आपल्या समाजाचे केवळ कर्तव्यच नाहीतर समाजात खोलवर ही गोष्ट बांधिलकी म्हणून रूजवली पाहिजे.


image


अक्षय कुमार यांनी सुचविले आहे की, सीमेवर कर्तव्य बजावताना शहिद होणा-या जवानांच्या कुटूंबाला मदत करण्यासाठी देशाने पुढाकार घ्यायलाच हवा. सरकारी मदत आणि आर्थिक सहाय्याच्या पलिकडे या कुटूंबाना जनतेने मदत आणि सहकार्य देवू केले पाहिजे. त्यांचा दृढ विश्वास आहे की, शूर सैनिकांच्या कुटूंबियाना मदत करणे ही केवळ सरकारचीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकांचे ते कर्तव्यच असायला पाहिजे. त्यांनी अशा प्रकारची मदत या कुटूंबाना द्यावी यासाठी संकेतस्थळ किंवा अॅपच्या माध्यमातून कधीही उपलब्ध होणारे व्यासपीठ असावे असेही मत व्यक्त केले होते. जेथे गरजू कुटूंबाना आर्थिक मदत देखील तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.

येथे तो व्हिडिओ उपलब्ध आहे ज्यात त्यांनी जनतेला आवाहन केले आहे की, त्यांना हे अॅप सुरु करण्यासाठी सहकार्य करावे, आणि भारतीय सैन्याच्या परवानगीने तसेच भारत सरकारच्या पाठिंब्याने ते स्वत:च ते तयार करणार आहेत. pic.twitter.com/3Y5NPmTJhg

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी [email protected] वर संपर्क साधा.