गौर यांच्याकडून शिका, समाजसेवेपेक्षा कोणतीही मोठी सेवा नाही.

गौर यांच्याकडून शिका, समाजसेवेपेक्षा कोणतीही मोठी सेवा नाही.

Friday November 06, 2015,

2 min Read

ऍना गौर यांचा जन्म जरी भारतात झाला तरी शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या आणि तेथे त्या सुमारे दहा वर्षे राहिल्या. टेक्सास विद्यापीठ, ऑस्टीन आणि रेड मँककोंब्स स्कूल ऑफ बिझनेस मध्ये शिक्षण घेतल्यानंतर ‘एन्सर्ट ऍंड यंग मध्ये त्यांनी सुमारे दशकभर काम केले. पण नंतर त्यांनी आणखी काहीतरी करण्याचा निश्चय केला, काहीतरी असे ज्याचा संबंध थेट समाजाशी असेल. ज्याचा काही सामाजिक प्रभाव असेल, ऍना अश्या एखाद्या संधीचा शोध घेत होत्या. तेंव्हा त्यांना ‘विल्लग्रो; च्या सामाजिक फेलोशिप कार्यक्रमात अशी संधी असल्याची शक्यता दिसली. हा कार्यक्रम एक वर्षाच्या कार्यकाळासाठी सामाजिक उद्यमींना भारतातच असे व्यासपीठ प्रदान करतो, जिथून त्यांना सामाजिक क्षेत्रात अधिक योगदान देता येऊ शकेल. एक कठोर प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऍना यांची या कार्यक्रमासाठी निवड झाली आणि सप्टेंबर२०१२ मध्ये त्या भारतात परत आल्या. खरेतर त्यांची निवड या फेलोशिपसाठी वर्षाच्या सुरुवातीलाच झाली होती आणि जुलै२०१२मध्ये त्यांनी नोकरी सोडली.

या कार्यक्रमात पहिल्या महिन्यात सर्व आठ अध्ययनकर्त्यांचे कार्यक्रमाच्या विषयाबाबत ओळख-आकलन करून दिेले जाते. हा महिना सर्व सहकारी ‘विल्लग्रो;च्या चेन्नई येथील कार्यालयात व्यतीत करतात. परिस्थितीनुसार या एका महिन्यात गावांचे दौरे, काही यशस्वी उद्योजकांच्या भेटीगाठी, आणि नेटवर्किंगचा समावेश असतो. आणि त्याच दरम्यान ऍना यांची भेट एका तीन वर्ष जुन्या कंपनी ‘सस्टेन टेक’ सोबत झाली. ही कंपनी ‘पायरो’ नावाने पर्यावरण पूरक इंधन कुशल व्यावसायिक उपयोगाच्या स्वयंपाकाच्या स्टोवचे वितरण करते. विचारांतील साम्यामुळे ऍना यांनी ‘सस्टेन टेक’ च्या व्यापारी कक्षातील सर्व आर्थिक बाबी हाताळण्यास सुरुवात केली. सध्या त्या ‘सस्टेन टेक’च्या संपूर्ण वित्तीय कक्षाची जबाबदारी सांभाळतात.

ऍना गौर

ऍना गौर


मदुराई मध्ये आपल्या मुख्यालयासोबतच ‘सस्टेन टेक’चे कार्यक्षेत्र मुख्यत: तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांत आहे. त्यांची निर्मिती असलेल्या ‘पायरो स्टोव’चे उत्पादन बाहेरून (आऊटसोर्सिंग)केले जाते. परंतू त्याचे विपणन आणि वितरण यांची पूर्ण जबाबदारी सस्टेन टेक’ची आहे. ऍना सांगतात की, “मी या कंपनीसोबत मागच्या सात महिन्यांपासून काम करते आणि इथला माझा अनुभव विलक्षण राहिला आहे”.

जेंव्हा त्यांनी हा निर्णय घेतला होता तेंव्हा त्यांना अनेक शंकाकुशंका होत्या; परंतू त्यांच्या इथे आल्यानंतरच्या काळात ‘विल्लग्रो’ने त्यांच्या सा-या शंकाचे निराकरण केले होते. सर्व अध्ययनकर्त्यांच्या राहणे, प्रवास तसेच भोजनाची व्यवस्था इत्यादी करतानाच ‘विल्लग्रो’हे देखील पाहते की, त्यांच्या शोधप्रबंधासाठी अनुकूल स्थिती तयार होऊ शकेल. “६०-७०टक्के” ‘विल्लग्रो फेलो’नी (आता पर्यंत पाच संच(बँच) पूर्ण झाले आहेत.)भारतातील त्याच क्षेत्राला आपला व्यवसाय म्हणून निवडणे पसंत केले आहे, जे या फेलोशिपच्या निमित्ताने जोडले गेले होते. “ मी सुध्दा असेच करण्याची अपेक्षा करते” ऍना सांगतात.

प्रत्येक फेलोचा कुणी ना कुणी मार्गदर्शक आहे. जो त्यांचा मार्गदर्शकच नव्हेतर प्रेरणास्त्रोत देखील आहे. “संपूर्णत: ‘विल्लग्रो’चा माझा अनुभव वास्तविकरुपाने सकारात्मक राहिला आहे. यामध्ये मला जीवनासाठी नवा दृष्टीकोन मिळवता आला आहे”. शेवटी ऍना सांगतात.

जर तुम्हाला ‘विल्लग्रोफेलोशिप’करिता अर्ज करायचा असेल तर कृपया इथे क्लिक करा- http://www.villgro.org

सूचना(डिस्क्लेमर)-‘योर स्टोरी’ ‘विल्लग्रो फेलोशिप कार्यक्रम’चा सहयोगी आहे.