'फिटनेसकौर' २१वर्षीय तरुणीचा फिटनेस मंत्रा !

0

गुरुप्रित कौर या २१वर्षांच्या युकेस्थित शिख कन्या आहेत, ज्यांनी  सोशल मिडीयाच्या  माध्यमांतून त्यांच्या फिटनेस गेम मुळे खूप नाव कमाविले आहे. इंन्स्टाग्राम आणि फेसबुक हँडलवर जावून ‘फिटनेस कौर’ ने सा-या जगभरात नाव लौकीक मिळवला आहे, याचे कारण त्यांचा शरिरोपयोगी व्यायाम, वजन कमी करण्याचे तंत्र आणि योगा हे आहे.


Image source: Daily Bhaskar
Image source: Daily Bhaskar

त्यांचे इंन्स्टाग्रामवरील छायाचित्र हेच दाखवते आहे की त्या काहीतरी वेगळा कठीण व्यायाम करत आहे, ज्यात पूश अप्सचा (दंडबैठका),पुल अप्स, रिंग डिप्स, हॉरीझोंटल प्लांन्क्सचा  समावेश आहे. इन्स्टाग्रामवरील १७ हजार फॉलोवर्स दररोज हजारो लाईक्स त्यांना पाठवत असतात, त्यातून त्यांच्या फिटनेस बाबतच्या नव्यानव्या कल्पना त्या पोहोचवितात. त्यामुळे त्या सोशल मिडीयातील संवेदना झाल्या आहेत.

इंग्रजी आई आणि पंजांबी वडिलांच्या पोटी जन्मलेल्या, गुरुप्रित यांचा त्यांच्या शिख असण्याशी कायम संबंध राहिला. त्या वारंवार भारतात येत राहिल्या,  सुवर्ण मंदीरात जीवनातील वेगळे क्षण त्यांनी अनुभवले. अमृत संचार मध्ये नाव लिहिताना त्यांना वाटले की, फिटनेसची नित्यकर्म त्याच्या मन, बुध्दी, शरीराला व्यापून राहिली आहेत. पारंपारिक शिख रिवाजानुसार सुरु असलेल्या ‘शबद’ (शिख मंदीरातील संगीत)ने या भावनिक महिलेच्या मनात वेगळेच आधुनिक संगीत निर्माण केले. शबदच्या भावमय वातावरणातील सूरांनी त्याच्या मनातल्या प्रेरणा जाग्या केल्या, आणि त्यांच्या शारीरिक आणि मानसिक चेतना भरल्या. येथे इंन्स्टाग्राम प्रोफाइलवरील व्हिडिओ आहे.

कौर यांचा जन्म अनैसर्गिक स्थितीत झाला आणि त्यांना त्यामुळे निराश करणा-या अनुभवांना सामोरे जावे लागले. त्यांना सांगण्यात आले की, त्या मुलगी आहेत, त्यामुळे त्यांना हे करावे ते करु नये असेही वारंवार टोकण्यात आले. या प्रकारच्या हाताशेमुळे, खाली खेचण्याच्या प्रवृत्तीमुळे, त्यांच्यातील फिटनेसच्या बाबींवर त्यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली. आणि वयाच्या १७व्या वर्षी एक नव्या प्रकारचा प्रवास सुरु केला. त्यांनी आता सा-या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि दाखवून दिले आहे की स्त्री आणि पुरुष असा भेद करणे योग्य नाही. जिद्द आणि योग्य दिशा असेल तर जगात अशक्य असे काहीच नाही हेच त्यांनी दाखवून दिले आहे.

या सारख्याच आणखी काही कहाण्या तुम्हाला माहित असल्यास आम्हाला कळवा. यासाठी marathi@yourstory.com वर संपर्क साधा.