भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या 'आम्ही उद्योगिनी'च्या गटाची दुबईत 'बी टू बी मिट'

0

महिला उद्योजकता क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असलेल्या ‘आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान’च्या वतीने दुबई, संयुक्त अरब अमिरातीसाठी महिला उद्योजकांच्या गटाचा दौरा गेले काही वर्ष आयोजित केला जातो. भारताचे प्रतिनिधीत्व करणा-या या आम्ही उद्योगिनीच्या गटाला दुबईत बी टू बी मिट, एक्सेलसियर हॉटेल येथे बूर दुबई असोसिएशन आणि महाराष्ट्र सरकार तसेच इंडो-अरब चेंबर ऑफ कॉमर्स आणि आखाती मराठी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमात प्रवासी सहभागिता म्हणून हानुका मताला यांचे सहकार्य लाभले.


'आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान' हि संस्था गेली २० वर्षे महिलांमध्ये उद्योजकतेचे बीज वाढविण्याचा दृष्टीने मोठे योगदान करते आहे. चर्चा सत्रे, परिसंवाद, उद्योजकता कॉन्सिलिंग, अभ्यास दौरे परिषद अशा माध्यमातून रचनात्मक काम विनामूल्य करीत असते. महिला उद्योजकांनी बनविलेल्या विविध उत्पादनांना प्रदर्शनाचा द्वारा बाजारपेठ मिळवून देण्याची मोलाची कामगिरी संस्था करीत असते. 


महाराष्ट्र व भारतातील महिला उद्योगिनींनी तयार केलेल्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान निर्माण व्हावे ह्या हेतूने गेली कित्येक वर्षे 'आम्ही उद्योगिनी' मार्फत दुबई येथे बी टू बी (बिझनेस टू बिझनेस मीट) चे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी बी टू बी चे आयोजन २४-२८ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत दुबई येथे करण्यात आले होते. फुजिराह चेम्बर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ऍग्रीकल्चर , फुजिराह येथे उद्योजकांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्योजकांना तेथील उद्योगाची पाहणी करण्यास मिळाली आणि आखाती देशातील उद्योग क्षेत्रातील संधीची माहिती मिळाली. मर्यादित जागा असल्यामुळे या उपक्रमाचा लाभ ३५ महिला उद्योजकांना यंदा मिळवता आला.