आशियाई सिनेमाच्या विकासासाठी 'इंडीवुड फिल्म कार्निवल'

आशियाई सिनेमाच्या विकासासाठी 'इंडीवुड फिल्म कार्निवल'

Saturday April 02, 2016,

3 min Read

गेल्या काही वर्षांपासून दक्षिण आशिया हे सर्वच क्षेत्रात एक मोठं मार्केट तयार झालं आहे. जगावर मंदीचं सावट असताना दक्षिण आशियात मात्र अर्थव्यवस्थेचा वेग मात्र चांगला आहे. युरोप आणि अमेरिकेपेक्षा इथल्या देशांमधली आर्थिक प्रगती  योग्य दिशेने होत आहे. सिनेमा या माध्यमात मात्र दक्षिण आशिया देशांच्या सिनेमांचा प्रसार व्हायला हवा तसा झालेला नाही. बरं या देशांमध्ये डायस्पोरा (मूळ स्थानापासून स्थलांतर करणे) ही संकल्पनाही तेवढी विकसित झालेली नाही. कारण आशियातून युरोप आणि अमेरिकेत जेवढे लोक जातात तेवढे आशियाई देशांमध्ये जात नाही. त्यामुळे आशियाई देशांवर हॉलीवुडचं प्रभुत्व आहे. चीन, कोरिया आणि इंडोनेशिया आदी देशांनी सिनेमांचे विषय आणि तांत्रिक बाबीमध्ये हॉलीवुडवर कुरघोडी केली असली तरी आशियाई देशांमध्ये आशियाई फिल्म मार्केट तयार झालेलं नाही. यामुळेच इंडिवुडनं आता सिनेमाच्या माध्यमातून आशियाई देशांना एकत्र आणण्याचा आणि त्याद्वारे एक नवं आशियाई फिल्म मार्केट तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.

image


इंडिवुड फिल्म कार्निवलचं हे दुसरं वर्षे आहे. मागच्या वर्षी कोचिन इथं इंडिवुड फिल्म कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यंदा हैद्राबाद इथं इंडिवुड फिल्म कार्निवलचं आयोजन करण्यात आलं  आहे. त्यामुळे भारतातले छोटे प्रोडक्शन हाऊस आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना आशियाई मार्केट काबीज करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. 

image


ऑल लाईट्स इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हा या इंडिवुड फिल्म कार्निवलचा भाग आहे. या फिल्म फेस्टीवलद्वारे भारत आणि इतर आशियाई देशातल्या नव्या सिनेनिर्माते आणि दिग्दर्शकांना एकत्र आणून आशियाई सिनेमाची इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथं इंडिवुड फिल्म मार्केट युरोप फिल्म मार्केटच्या धर्तीवर आयोजित केलं जातं. म्हणजे आशियाई देशातले सिनेनिर्माते, वितरक, कलाकार यांना एक व्यासपीठ मिळवून देऊन त्याद्वारे नव्या अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जातोय.

image


श्याम कुरुप, फिल्म मार्केट व्यवस्थापक यांच्या मते, “आशियाई सिनेमा जगभरात पोचलाय खरा पण तो आशियातल्या देशांमध्येच प्रदर्शित होत नाही. हॉलीवुडचे सिनेमे इथं रिलीज होतात. पण तिथं कुठला चीनी, कोरियन किंवा इंडोनेशियन सिनेमा रिलीज झाल्याचं तुम्ही ऐकलंय का? मागणी नाही असं नाही. या सिनेमांना मागणी आहे पण थिएट्रिकल रिलीजसाठी आशियातल्या सिनेमांना तेवढं महत्त्व दिलं जात नाही. अश्यावेळी मग डिव्हीडीचं मार्केट इथं विकसित झालंय. शिवाय अवैधरित्या इंटरनेटद्वारे हे सिनेमे डाऊनलोड करुन पाहण्याची संख्याही जास्त आहे. आमचा प्रयत्न असा आहे की आशियाई सिनेमांची आशियात एक स्वतंत्र अशी इकोसिस्टम तयार करणं. आम्ही आशियातल्या देशांना सिनेमाच्या माध्यमातून जोडतोय. सिनेमा क्षेत्रातल्या स्टार्टअपकडे कुणीच लक्ष देत नाही. त्याची एक विशिष्ट इकोसिस्टम आहे. तिच्याकडे गंभीरतेनं पाहिलं पाहिजे कारण भारत असो किंवा इंडोनेशिया किंवा मग चीन इथं नव्या दमाच्या इंडिपेन्डंट फिल्ममेकरची संख्या वाढतेय. त्यासाठी इंडिवुड हे एक मोठं व्यासपीठ होतं.” 
image


फिल्म मार्केट मध्ये ७५ पेक्षा जास्त स्टॉलस् उपलब्ध आहेत. सिनेमाच्या वितरण आणि प्रोडक्शन क्षेत्रातल्या कंपन्या इथं येतायत. जगभरातले ब्राँड भारतात आणण्यात येत आहेत. हे मार्केट एकमेकांची ओळख करुन घेऊन त्याद्वारे नवे सिनेमाचे करार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात येतोय.  

image


आशियाई सिनेमांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ऑल लाईट्स इंडिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ४७ देशांचे १३७ सिनेमे गेल्यावर्षी दाखवण्यात आले. यंदा ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय सिनेमातल्या स्टार्टमला चालना देण्यासाठी थेट इंडस्ट्रीतल्या मोठ्या प्लेअर्सशी त्यांची सांगड घालून देण्याचं काम करण्यात येतंय. हे करताना आशियातलं सिनेमाचं मार्केट विकसित होऊनही पूर्ण इकोसिस्टम समृध्द करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. याव्दारे स्क्रिप्ट डेवलेपमेन्ट, कोप्रोडक्शन आदींसाठी प्रयत्न केले जातायत. शिवाय नव्या संकल्पनांचं स्वागत केलं जातंय. चर्चासत्रं आणि गेट-टुगेदरच्या माध्यमातून आशियाई सिनेमांना नवीन भरारी देण्याचा हा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे. यामुळे आशियाई सिनेमाक्षेत्रातल्या नव्या स्टार्टअप्सना नवीन जमीन मिळणार आहे हे मात्र निश्चित.

image


image


image


image