ब्रेग्झिट : वैश्विक धर्मवाद आणि स्थलांतराच्या वादातून धोक्याची घंटा ?

ब्रेग्झिट : वैश्विक धर्मवाद आणि स्थलांतराच्या वादातून धोक्याची घंटा ?

Tuesday June 28, 2016,

5 min Read

बर्लिनची भिंत कोसळणे ही अतिशय दुर्दैवी घटना होती. ग्रेट ब्रिटनने युरोपीय महासंघातून (युरोपियन युनियनमधून) बाहेर पडणे त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम देशावर, जागतिक बाजारपेठेवर होणार आहे खुद ब्रिटनलाही मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर नक्कीच मोठा परिणाम होईल. मोठ्या मंदी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जनमत चाचणीने जो कौल दिला यामुळे संपूर्ण जगाला मोठा धक्का बसला आहे. तज्ज्ञ मोठे संकट येण्याचे भाकीत करीत आहेत. भविष्यात अनिश्चित अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. याही पेक्षा वाईट परिस्थिती निर्माण झाली असती. गेल्या तीन दशकापासून सातत्याने गतिमान असलेल्या चीनची अर्थव्यवस्थेने नीचांक गाठलेला आहे. ब्राझील हा एका गंभीर राजकीय संकटात आहे. आणि भारत सुस्थितीत असल्याचा दावा करत असला तरी प्रत्यक्षात मात्र फारशी सकारात्मक परिस्थिती नाही.

image


हा जनमत कौल आर्थिक बाबींशी संबंधित नसून राजकीय कारण असल्याचे दर्शवत आहे. यातून तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. १. जागतिक स्थलांतर एक गंभीर समस्या आहे आणि सर्वात विकसित समाजाचा यात समावेश असल्याचे सांगितले जात असले तरी तशी वस्तुस्थिती नाही. २. श्रीमंत आणि गरीब यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. लंडन उर्वरित जनमत कौल नाकारलेल्या नागरिकांबरोबर आहे, पण लंडनपेक्षा कमी आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या भागात युरोपियन युनियनला फारसे चांगले भविष्य नाही. ३. जागतिकीकरण प्रक्रियेच्या तुलनेत कृत्रिमरीत्या तयार केलेल्या राजकीय अत्यावश्यक राष्ट्रवादाने अधिकच शिरकाव केलेला आहे.

भारत, सर्वात झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचा भारतीय आस्थापनेकडून दावा केला जात असला तरी युरोपीय महासंघातून बाहेर पडल्याची झळ भारतालाही सोसावी लागणार हे मात्र निश्चित. हे सारे अशा वेळी घडते आहे जेव्हा रिझर्व बँकेचे गवर्नर यांनी घोषणा केली आहे की, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा पदभार सांभाळण्यास किवा आणखी एक कार्यकाळ पूर्ण करण्यास इच्छुक नाही. त्यांना त्यांच्या आवडीच्या आर्थिक सल्लगार क्षेत्रात काम करायला आवडेल. रघुराम राजन सारख्या बँकिग क्षेत्रात सर्वात महत्वाच्या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा पदभार स्वीकारण्यास नकार देणे ही दुर्दैवी बाब आहे. माझ्या मते भारतीयांनी ‘ब्रेग्झिट’चा ( ब्रिटनने युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला ‘ब्रेग्झिट’ असे नाव देण्यात आले आहे.) गांभीर्याने विचार केला पाहिजे. यासारखे आणखी काही विभाजन होण्याचे हे संकेत आहे. ब्रिटन पाठोपाठ अन्य काही देशही बाहेर पडण्याची मागणी करू शकतात. या घटनेचा ब्रिटन, युरोप आणि भारतावरही परिणाम होऊ शकतो ?

अशा प्रकारचे विभाजन होणे म्हणजे प्रखर राष्ट्रभक्ती आणि विदेशी नागरिकांप्रती असणारे भय किवा द्वेष बाळगणे अशा प्रकारचे विश्लेषण करणाऱ्या तज्ज्ञांच्या मताशी मी सहमत नाही. अशा प्रकारचे विभाजन म्हणजे सर्वात गुंतागुंतीची सामाजिक आणि राजकीय समस्या निर्माण होणे, एवढी सरळ साधी वाख्या आहे. ही व्याख्या केवळ नैसर्गिकरीत्या खळबळ निर्माण करणारी नाही तर एक कठोर नकारात्मक वास्तव आहे.

ब्रेग्झिट हे प्रचंड धुसफूस निर्माण करणारे केवळ एक उदाहरण नाही. रिपब्लिक पक्षाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा विरोध पत्करून अमेरिकन अध्यक्षपदाच्या शर्यतीत असणे हेही या घटनेशी संबंधित आहे. फ्रान्समध्ये, सर्वात श्रीमंत मरीन ले पेन आगामी राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी जोरदार तयारीत आहे, त्यांचे भाग्य असल्यास त्याही राष्ट्रपती बनू शकतात. भारतात आधीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्व करत आहे. ज्यांना भारताला एक हिंदू राष्ट्र बनवायचे आहे. आयसिस, आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना जगभरात कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोणताही देश आणि कोणताही नागरिक आज सुरक्षित नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीचे साम्य आहे. विसाव्या शतकातील जगाच्या राष्ट्रांची एक ओळख म्हणून या सगळ्यांना त्या त्या राष्ट्राच्या विविध जाती धर्माच्या, सामाजिक गटाच्या पारंपारिक संस्कृती जपत विकास अपेक्षित आहे. ज्यामध्ये समानता, स्वतंत्रता आणि बंधुत्वाची भावना जपणे आवश्यक वाटत आहे.

मानवी क्रांती घडवण्यासाठी स्थलांतर हे एका इंजिनाप्रमाणे आहे. जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांच्या स्थलांतरामुळे स्वस्तात मजूरच उपलब्ध होत नाही तर त्यांच्या कडून नवनवीन कल्पनाही समोर येतात, नवीन प्रकारचे विचार समोर येतात. वेगवेगळ्या संकल्पना एकत्रित आल्यास नाविन्यपूर्ण गोष्टी साकारणे शक्य होते, प्रतिस्पर्धीचा सामना करणे, आव्हानं स्वीकारत प्रगती साधली जाते.

स्थलांतर दोन प्रकारचे असते – अंतर्गत स्थलांतर, जे देशांतर्गत मर्यादित असते आणि बाह्य स्थलांतर जे परदेशात केले जाते. भारतीय नवीनवीन संधीचा शोध घेण्यासाठी स्वतःच्या देशातील सुरक्षित सीमारेषां ओलांडून परदेशात जात आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार येथील नागरिक हे फक्त लखनऊ आणि पाटण्यामध्येच दिसत नाहीत तर केरळच्या समुद्रतीरी आणि बंगळुरूमध्ये रस्त्यावर दिसत आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी आधीच गर्दी केली आहे. याचप्रमाणे तामिळनाडू आणि केरळ येथील नागरिक दिल्लीच्या खान मार्केटमध्ये बटर चिकनचा स्वाद घेत आहेत, तर डोंबिवली मुंबईमध्ये वडापावचा स्वाद घेत आहे.

सत्या नाडेला आणि सुंदर पिचाई हे तरुण नेतृत्व माइक्रोसॉफ्ट आणि गूगलच्या सर्वात मोठ्या आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख आहे. इंद्रा न्युयी या पेप्सीच्या प्रमुखपदी आहे तर निकेश अरोरा हा गोल्डन बॉय काही दिवसांपूर्वी पर्यंत जपानी कंपनीच्या सर्वात अधिक गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या तीन प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक होता. हे केवळ पूर्व आणि पश्चिम स्थलांतरामुळे शक्य झाले आहे. या स्थलांतर प्रक्रियेमुळे दोन्ही बाजूंचा फायदा होतो. दुर्दैवाने, ब्रेग्झिटमुळे नवीन आव्हानं समोर उभी येऊन ठाकली आहे. जे सर्व जगाला सांगत आहे की स्थलांतर करणे हिताचे नाही. स्थलांतरितांना प्रवेश नाही. युरोपीय संघात स्थलांतरितांना मोकळीक हे मुख्य कारण असल्याने ब्रिटन युरोपीय महासंघातून “बाहेर” पडला आहे.

जेव्हा जगभरात लंडनचा महापौर म्हणून एका मुसलमानाच्या निवडणुकीच्या वेळी जल्लोष केला गेला होता, मात्र एका विशिष्ट समूहाच्या त्यांच्या विषयी नकरात्मक भावना होत्या. अशीच काहीशी कहाणी मजबूत पक्षबांधणी केलेल्या शिवसेनेची आणि राज ठाकरे नेतृत्व करत असलेल्या मनसेची आहे, जे गेले अनेक वर्षांपासून पक्ष चालवत आहे. साठ आणि सत्तरच्या दशकात बाळासाहेब ठाकरे दक्षिण भारतीयांची खुलेपणाने निंदा करत होते. त्यानंतर ते उत्तर भारतीयांची निंदा करू लागले. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी तर उत्तर भारतीयांविरोधात हिंसक पद्धतीचा अवलंब केला. भारतीय संविधानानुसार प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला भारतात कुठेही स्थलांतरित होण्याचा अधिकार दिलेला आहे, कायमस्वरूपी वास्तव्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र प्रत्येक वेळी “आम्ही आणि तुम्ही” असा वाद डोके वर काढत उग्र स्वरूप धारण करताना दिसतो. दिल्ली येथील उत्तर भारतीयांना इथल्या राजकीय नेत्यांनी अनेकदा कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करत नसल्याचे सांगत हिणवले जाते. भारतातील उत्तर-पूर्व राज्यांमध्ये स्थलांतरितांचा आणि स्थानिकांचा संघर्ष एक नवीन संकट डोके वर काढत आहे.

गावपातळीवर जागतिकीकरणाच्या या युगात “जमिनिप्रती आणि तिथल्या रहिवाश्याप्रती आदरयुक्त प्रेमाची भावना” असणे अत्यावश्यक असण्यावर माझे ठाम मत आहे. माणुसकी दृष्ट्या माणसाची ही एकमेव “ओळख” महत्वाची आहे. व्यक्ती किवा समूहाचे अंतर्गत स्थलांतर एका विशिष्ट मुद्द्यावर मान्य केले जाते, जिथे त्यांना कोणताही धोका पत्करावा लागत नाही किवा धमक्यांना सामोरे जावे लागत नाही.

भारतातील विविधता सर्वात मोठी शक्ती आहे. राजकीय कारण असो वा मानसिक कारण असो, विविधतेत एकता हीच एकमेव ओळख घेऊन आपण भारतीय उत्तम प्रकारे मार्गक्रमण करू शकतो. एक राष्ट्र म्हणून ब्रेग्झिटची करणे गांभीर्याने समजून घेऊ या आणि त्यामुळे ओढवणाऱ्या संकटाचा यशस्वीपणे सामना करू या.

(आशूतोष हे वरिष्ठ पत्रकार आणि आम आदमी पक्षाचे राजकीय नेते आहेत. या लेखात त्यांनी व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही.)