भारतीय ग्राहकांना पहिल्यांदाच थ्री-डी प्रिंटींगची ओळख देणा-या मेघा भैया!

 भारतीय ग्राहकांना पहिल्यांदाच थ्री-डी प्रिंटींगची ओळख देणा-या मेघा भैया!

Sunday November 29, 2015,

5 min Read

थ्री डी प्रिंटींगच्या माध्यमातून वस्तूंची निर्मिती करणारी एक कंपनी इंस्टाप्रो थ्री डी (Instapro3D) ची संस्थापक मेघा भैया लहानपणापासूनच खूप चौकस आहे. बाहुल्यांशी खेळण्याच्या वयापासूनच डिस्कवरी वाहिनी आणि माहितीकोश तिचे सर्वात चांगले सोबती राहिले आहेत. तिच्या जीवनावर तिच्या वडिलांचा महत्वपूर्ण प्रभाव राहिला आहे. जेव्हा ती लहान होती, तेव्हापासूनच जर एखादे विद्युत उपकरण खराब झाले तर, ती नेहमीच तिच्या वडिलांना वेगवेगळ्या प्रकारचे औजार घेवून त्यांना चांगले करण्याचा प्रयत्न करत असताना बघत असे. याच आठवणींना उजाळा देवून हसत मेघा सांगतात की, अधिकाधिक वेळा त्या वस्तूंना चांगले करण्यात यश‍स्वी देखील होत असत. तंत्रज्ञानात त्यांची नेहमीच आवड राहिली आहे. मेघा अनेकदा आपल्या वडिलांसोबत कारखान्यात देखील जात असत. कारण, त्यांना यंत्र काम करताना बघण्या व्यतिरिक्त आपल्या वडिलांना ती दुरुस्त करताना आणि त्या बिघडल्यावर त्यांचे निवारण करताना देखील पहायची इच्छा असायची. त्या म्हणतात की, “माझ्या वडिलांनी देखील यासाठी मला कधीच टोकले नाही आणि त्यामुळेच आज मी जे काही आहे, ते त्यांच्याचमुळे आहे. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी जाणे, हा माझ्या जीवनातील अविभाज्य भाग आहे.

image


मागील उन्हाळ्यात मेघा महिलांसमोर सात‍त्याने येणा-या समस्येचे निराकरण करण्याच्या प्रयत्नात होत्या. उंच हिलची सँडल (स्टिलेट्टोज) घालणा-या महिलांसमोर एक समस्या नेहमीच येते, ती म्हणजे जेव्हा महिला अशा प्रकारची सँडल घालतात, तेव्हा कच्च्या रस्त्यावरून चालताना त्यांची सँडल माती किंवा गवतात फसते. याच समस्येचा उपाय शोधण्यासाठी त्या एका उत्पादनाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत होत्या. मेघा म्हणतात की, मला एक अशी हिल कॅप तयार करायची आहे, जी टाचेला कच्च्या रस्त्यात फसण्यापासून रोखण्यास सक्षम असेल. एकदा नक्षीकाम केल्यानंतर माझ्यासाठी त्याचा नमूना तयार करणे खूपच आव्हानात्मक होते. कारण, त्यासाठी मला अनेक महागड्या पारंपारिक उत्पादन करण्याच्या पद्धतींची मदत घ्यावी लागली. त्याचवेळी माझ्या डोक्यात थ्री डी प्रिंटींगचा विचार आला आणि मी या क्षेत्रात काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.

एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्याच्या आपल्या जुन्या सवयीमुळे त्या, ‘इंस्टाप्रो थ्री डी’ चा पाया घालण्यात यश‍स्वी झाल्या. मेघा म्हणतात की, आमचा विचार कुठल्याही वस्तूला प्रत्यक्षात तय़ार करण्याच्या प्रयत्नात असलेले निर्माता, विचारवंत आणि नक्षी काम करणा-यांमधील अंतराला कमी करण्याच्या उद्देशाने काम करण्याचे होते.

थ्री डी प्रिंटींग

मेघा यांच्या मते, भारतात आता थ्री डी प्रिंटींगची संकल्पना अद्याप हवी तशी उदयास आलेली नाही आणि ती लोकांमध्ये आपली जागा बनविण्यात अयश‍स्वी झाली आहे. मेघा म्हणतात की, हे तंत्रज्ञान खूपच रोमांचित करणारे आहे आणि मला जेव्हा याबाबत पहिल्यांदा माहित पडले तेव्हा वाटले की, ९० च्या दशकात बघितले जाणारे गमतीदार आरेखन वास्तवात बदल‍ले आहे. तुम्ही थ्री डी प्रिंटरच्या माध्यमातून जवळपास काहीही तयार करू शकता. मेघा यांनी या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रकल्पाचा पाया रोवला आणि सध्या त्या ४ तांत्रिक विशेषज्ञांच्या गटाचे नेतृत्व करत आहेत. इंस्टाप्रो थ्री डी एक सरकारी केंद्राच्या स्वरूपात चालविली जात आहे, जेथे मेघा आणि त्यांचा गट प्रोटोटाइप आणि डायरेक्ट डिजिटल संकल्पना तयार करण्यासाठी उत्पादनाचे रचनाकार आणि विकासक यांच्याव्यतिरिक्त विद्यार्थी, अभियंते, वास्तुविशारद, बेकर्स आणि सोनारांसोबत मिळून काम करत आहेत.

आपला रस्ता स्वत:च बनविणे

शाळेच्या दिवसांपासूनच मेघा यांची आवड विज्ञानाच्या विषयाकडे अधिक होती. मात्र, पदवी घेताना त्यांच्या कारकीर्दीने एक वेगळेच वळण घेतले. त्या म्हणतात की, मी वर्ष २०१२ मध्ये व्यवसाय क्षेत्रात लैंसेस्टर महाविद्यालयात पदवीधर झाले. या परिवर्तनाने माझी तांत्रिक गोष्टींमधील आवड अजिबात कमी झाली नाही. पदवी घेतल्यानंतर मेघा एलईडी लाइटींग आणि साइनेजच्या आपल्या कौंटुंबिक व्यवसायात सामिल झाल्या. मेघा यांनी स्वत:च्या बळावर काही करण्यापूर्वी पहिली तीन वर्षे येथे काम करण्याचा अनुभव घेतला. मेघा सांगतात की, “माझ्या वडिलांच्या कार्यस्थळी व्यवस्था आणि प्रोटोकॉल पहिल्यापासूनच अंमलात आण‍ण्यात येत होते आणि तेथे माझी ओळख केवळ त्यांची एक मुलगी म्हणूनच होती. मला माझी स्वत:ची ओळख निर्माण करायची होती आणि आपल्यामधील क्षमता व शक्तिला पारखायचे होते.” त्यावेळी त्यांचा तो निर्णय सोपा नव्हता, उलट ते त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे आव्हान होते. मेघा त्यावेळी २४ वर्षांची होत्या, आणि विवाह करण्याच्या वयात होत्या. अशातच त्यांना आपल्या आई-वडिलांना विवाह न करण्यासाठी मनविण्यात खूप मेहनत घ्यावी लागली. मेघा सांगतात की, “माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या शिक्षणाच्या बदल्यात मला काही अधिक सार्थक आणि आव्हानात्मक करायचे होते. अखेर त्यांनी मानले आणि त्यानंतर त्यांनी नेहमी मला मदत केली.

image


इंस्टाप्रो थ्री डी चा प्रारंभ करण्यामागे त्यांचा दृष्टिकोन भारतात थ्री डी प्रिंटींगसाठी एका मुलभूत पारिस्थितीजन्य तंत्राची निर्मिती करण्याचे होते. जेणेकरुन लोक नव्या उत्पादनाचा शोध, निर्मिती आणि त्याचे नक्षीकाम करण्यासाठी या शक्तिशाली तंत्राचा उपभोग घेण्यासाठी प्रेरित होऊ शकतील. इंस्टाप्रो थ्री डी च्या कार्याबाबत मेघा सांगतात की, त्यांनी आतापर्यंत कूलर मास्टर, एबीबी सोलर, मैक्केन हेल्थ, सीआयबीएआरटी यांसारखी काही बहुराष्ट्रीय संस्था आणि सेवाभावी संस्थांसोबत काम केले आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या पातळीवर अनेक प्रयोग देखील केले आहेत. हाताचे आणि पायाचे छाप थ्री डी प्रिंटिड स्मृतिचिन्हात परावर्तीत करण्याचा प्रारंभ त्यांच्याच एका प्रयोगाचा नमुना आहे. मेघा सांगतात की, कुटुंबात नविन बाळाचा जन्म हा त्याच्या आई-वडिलांसाठी खूपच भावनात्मक क्षण असतो. अशातच त्या अविस्मरणीय क्षणाला वास्तवात आयुष्यभरासाठी साठवून ठेवणे अमूल्य असते. आमची पहिली अशी कंपनी आहे, जी भारतात कागदावर घेण्यात आलेल्या हातांच्या छापाला थ्री डी प्रिंटिड स्मृतिचिन्हात बदलते.

image


आतार्यंत या थ्री डी तंत्राला एक प्रभावपूर्ण प्रतिक्रिया मिळाली आहे, त्या सांगतात की, कुठल्या प्रकारे या तंत्राचा प्रयोग संरक्षण, एयरोस्पेस, ऑटोमोबाइल, दागिने आणि चिकित्सा या क्षेत्रात केला जाऊ शकतो. मात्र हे अद्यापही ग्राहकांच्या व्यक्तिगत जीवनात सामील होण्यास अयश‍स्वी ठरले आहे.

आव्हाने आणि प्रेरणा

मेघा सांगतात की, उद्योजकतेचे क्षेत्र आव्हानात्मक असते. तुम्हाला अनेक गोष्टींना सांभाळत त्यांचे व्यवस्थापन करण्याव्यतिरिक्त वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण देखील शोधायचे असते. तुम्ही सलग विकासाची पुढील पातळी आणि सर्वात अधिक मुख्य गटाच्या निर्मितीबाबत अधिक चिंतित राहता. एक उद्योजिका म्हणून त्यांचा अनुभव खूपच मिश्र स्वरूपाचा राहिला आहे. अनेकदा अशीही वेळ आली, जेव्हा ग्राहकांनी एक महिला असल्यामुळे मेघा यांना कमी लेखले. मात्र अधिकाधिक प्रकरणात एक महिला असण्याचा फायदा देखील त्यांना झाला आहे. आपल्या समोर येणा-या आव्हानांमधून त्या त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाचा धडा घेण्यात यश‍स्वी झाल्या आहेत. ज्यानंतर त्यांनी काही चुकीचे करण्याची चिंता करणे बंद करण्यासोबतच जे चांगले होऊ शकते, त्याचा विचार करून आनंदी राहायला शिकले आहे. त्या म्हणतात की, अनेकदा मला असे वाटते की मी एकदम योग्य करत आहे. मात्र त्या व्यतिरिक्त जर आमचा प्लान ‘ए’ यश‍स्वी नाही झाला तरी, २५ दुसरे शब्द आहेत असाच मी सकारात्मक विचार करत आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत थांबायचे नाही.

दुरदृष्टी पाच वर्षापुढील विचार करण्याची

मेघा यांनी आता केवळ सुरुवातच केली आहे आणि त्या या तंत्राच्या भविष्यासाठी खूप उत्साहित आहे. त्या म्हणतात की, मला असे वाटते की, आम्ही अद्यापही या तंत्राच्या पृष्ठभागापर्यंतच पोहोचलो आहोत आणि आतापर्यंत या तंत्राच्या वास्तविक क्षमतांपर्यंत पोहोचलेलो नाही. मी भविष्यात देशातील प्रत्येक ग्राहकाजवळ व्यक्तिगत संगणकाप्रमाणेच एक थ्री डी प्रिंटर देखील बघू शकत आहे. येणा-या दिवसात त्या इंस्टाप्रो थ्री डी ला एक शानदाररित्या एकीकृत आणि स्थापित सरकारी केंद्राच्या रूपात बघतात, जेथे त्यांच्या मदतीने नक्षीकाम करणारे, निर्माता आणि अन्वेषक नवे प्रयोग करण्यात यश‍स्वी होतील.


लेखिका: तन्वी दुबे

अनुवाद : किशोर आपटे.