निती आयोग या वर्षभरात आणखी हजार संशोधनात्मक प्रयोगशाळा स्थापणार!

निती आयोग या वर्षभरात आणखी हजार संशोधनात्मक प्रयोगशाळा स्थापणार!

Monday June 19, 2017,

3 min Read

निती आयोगाने हजार अटल टिंकरींग लँब्ज (एटीएल- प्रयोगशाळा) उभारण्याचे ठरविले आहे, ज्यातून संशोधनाला चालना मिळेल, देशभरातील शाळांमधून या वर्षाच्या शेवटापर्यंत सुमारे १५००अशा प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत, अशी माहिती अधिका-यानी दिली.

या प्रयोगशाळांचा उद्देश, सध्याच्या शिक्षण पध्दतीच्या विपरीत नव्या शोधांना चालना देण्यासाठी शालेयस्तरापासून मुलांच्या अंगभूत गुणांचा विकास व्हावा असा आहे, असे निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले. ते म्हणाले की, “ भारताने जागतिक संशोधनपर कार्याच्या सूचीत गेल्या दोन वर्षात २१व्या जागी उडी घेतली आहे. या प्रयोगशाळांचा हेतू हा असेल की, संशोधनाला प्रोत्साहन देण्याचे वातावरण तयार करणे आणि ते देखील कटाक्षाने शालेय स्तरापासूनच”


 अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती योग

 अमिताभ कांत, मुख्य कार्यकारी अधिकारी, नीती योग


या करीता सर्व खाजगी सरकारी शाळांकडून अर्ज मागविण्यात येत असून त्यांच्या वास्तूमध्ये निती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशन अंतर्गत या प्रयोगशाळा निर्माण करायच्या आहेत. असे ते म्हणाले.

“ यंदा आम्ही मागील वर्षीच्या ४५७ शाळांशिवाय आणखी हजार शाळांमध्ये ही योजना सुरु करत आहोत. जर आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला तर या मध्ये वाढ करण्याचा विचार देखील आम्ही करू” ते पुढे म्हणाले.

मागील वर्षी, या योजनेत १३ हजार अर्ज आले, त्यापैकी केवळ ४५७ जणांना त्यातून स्पर्धात्मक पध्दतीने निवडण्यात आले होते. या समर्पित भावनेने करायच्या कामी सहावी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना संधी देण्यात येणार आहे. ज्यात त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देवून त्यांनी कल्पना साकाराव्या, त्यांचे आराखडेत तयार करावे, नमुने तयार करावे, त्यासाठी त्यांना शाळेने सहकार्य करावे म्हणून शाळांना वीस लाख रूपये पाच वर्षांपर्यंत या प्रयोगशाळा चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत, त्यात त्यांनी साधन सामुग्री थ्री डी प्रिंटर आणि अत्याधुनिक साहित्य निर्माण करावे अशी संकल्पना आहे.

यासाठी नियोजन करणारी समिती ऑनलाइन वरून संपर्क साधेल, मार्गदर्शन करेल आणि या प्रयोगशाळांना यशस्वी करण्याचा प्रयत्न करत राहील. निती आयोगाने मेंटर इंडिया हा कार्यक्रम देखील तयार केला आहे, या कार्यक्रामातून नेतृत्व करणा-यांना संधी देण्यात येणार असून त्यांनी विद्यार्थी आणि तरूणांना या प्रयोगशाळामंध्ये जावून आपल्या कडील ज्ञान द्यावे, ज्यातून स्वयंप्रेरीत मार्गदर्शकांचे असे जाळे देशभर तयार केले जाणार आहे जे सर्व प्रकारच्या विषयांचे जाणकार आहेत आणि त्यांचे ज्ञान इतरांना देवू इच्छितात. असे कांत म्हणाले.

ते म्हणाले की, “ दि मेंटॉर इंडिया मिशन मधून प्रशिक्षण देणा-या संस्थामधून चांगल्या प्रकारचे शिक्षक आणि मार्गदर्शक अनुभवी तज्ञ आणि जाणकार यांना संधी मिळणार आहे. काही तास ते स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी जावून आपल्या ज्ञान आणि मार्गदर्शनाचा लाभ देतील, त्यातून संशोधन करणारे विद्यार्थी आणि तरूण यांना दिशा, अनुभव आणि सराव मिळेल आणि त्यांच्यातील नवी कौशल्य तयार होतील”, ते म्हणाले.

या सा-या गोष्टी संशोधनाचे वातावरण तयार करण्यासाठी करण्यात येणार असून ज्यातून देशासमोर असलेल्या समस्यांचे निराकरण आपल्याच तरूण संशोधकांच्या बुध्दिमत्तेतून करता येणार आहे. ज्यातून शुध्द पिण्याचे पाणी चोवीस तास देणे, वीज देणे आणि मुलभूत सुविधांचा विकास करून देश सक्षम बनविण्याचे काम करता येणार आहे.